Thursday, 15 April 2021

शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) आणि काही प्रश्न.


 शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) आणि काही प्रश्न.

 विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संगीत,क्रीडा,सृजनशीलता, नेतृत्व,वक्तृत्व,चित्रकला यासह इतर क्षेत्रातील सर्वांगिन गुण आणि कौशल्यावर शिष्यवृत्ती परीक्षा आहे काय? तर याच उत्तर नाही असं आहे.(२१  व्या शतकात तरी स्कॉलर शब्दाची व्याप्ती खुप मोठी असलीच पाहिजे..)

या  प्रक्रियेतून जो केवळ अभ्यासात हुशार त्यालाच स्कॉलरशिप मिळणार.

 स्कॉलरशिप  परीक्षेत आपण सर्व विद्यार्थ्यांना पास करणार आहोत का? याचंही उत्तर नाही असआहे. परीक्षेचा निकाल पात्र किंवा अपात्र असा येणार.. याचा दुसरा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आपण पास करत आहोत ( इयत्ता पहिली ते आठवी) त्या विद्यार्थ्यांना मात्र स्कॉलरशिप परीक्षा अपात्र ठरवणार. विद्यार्थ्यांच्या बालमनाचा विचार करूनच विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीच्या वर्गात पास करण्याचा निर्णय घेतला आहे कारण विद्यार्थी नापास झाल्यावर त्याच्यात न्यूनगंड वाढीस लागून विद्यार्थी एकंदरीतच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार करता आपण मूल्यमापनात विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमांकही काढत नाही कारण विद्यार्थ्यांमध्ये मी पहिला दुसरा तिसरा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. मग स्कॉलरशिप परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या  मनावर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही.  म्हणजेच कॉलरशिप परीक्षा ही मूल्यमापनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या तत्वाशी पूर्णतः विसंगत आहे.हे सारं मुल्यमापनातील विसंगती स्पष्ट करण्यास पुरेस आहे. 

शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात ?

शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धापरीक्षा असू शकतात परंतु शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात किंबहुना सक्तीच्या तरी नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे.

मुळातच शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच.आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो.

 विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन  शिक्षका पेक्षाही सुलभकाचे काम करायचे आहेे. शिक्षण घेतांंना विद्यार्थ्यांनी ते सहज आणि आनंददायी पद्धतीने घेणे अपेक्षित आहे स्पर्धा म्हटली की ताण तणाव येणारच किमान स्पर्धेचा ताण तणाव घेणे तरी ऐच्छिक असाव. शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन अर्थात स्पर्धा नाही, म्हणून शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात की नसाव्यात, की त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्रित विचारांनी ऐच्छिक  असाव्यात याचा विचार करणेही आवश्यक आहे.

व्यवसायिक शिक्षण असावे शिक्षणाच्या स्पर्धेतून निर्माण होणारं शिक्षणाचे व्यवसायीकरण असू नये.

खरे म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मोफत किंवा अत्यंत माफक असल्या पाहिजे, शिक्षणातील स्पर्धांमुळे शिक्षणात व्यवसायीकरण झाले आहे. एवढ्या शिक्षणातील स्पर्धा असल्यावरही आज देशात आरोग्य सुविधांमध्ये काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये  देशात असल्यावरही गणपती आणि दिवाळीला आपण लाइटिंग चायनाचीच घेतोय, बाजारातील साध्या वीस ते पंचवीस रुपयाच्या पायतानापासून महागड्या वस्तू मोठ्या प्रमाणात आपण परदेशातून आयात करतोय आपल्या देशाच्या एकूण आर्थिक बाबतीत अनेक घटकांचा समावेश असला तरी शिक्षण हा महत्वाचा घटक त्याच्या मुळाशी आहे. 

कारण विकसित देशांमधील आर्थिक वृद्धी शैक्षणिक ध्येयधोरणांवर आधारित आहे आणि शैक्षणिक धोरणात कौशल्यास महत्त्व आहे, शिक्षणातील स्पर्धेस नाही, म्हणून आपण ज्या देशातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात करतोय त्या देशातील शालेय विद्यार्थी सुद्धा घरातील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कामे स्वतः करु शकतात. आपल्याकडे मात्र आपण दैनंदिन उपयोगात येणारे व्यवहारिक काम न करता किंवा करू देता केवळ परीक्षेसाठी उपयोगी असणारे मार्क्स वाढवून देणार या घटकांचा अभ्यास करतो.शिक्षणातील स्पर्धेतून वैद्यकीय प्रवेश - त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा - आणि मग आता औषध उपचार मिळण्यासाठी रांगेत उभा राहून उपचार घेण्याची स्पर्धा... अशा दृष्टचक्रात आपण कसे अडकलो आहोत याचाही विचार करावा लागेल...✍️

- शैलेश शिरसाठ,जळगाव.(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून) 

6 comments:

  1. Absolutely correct!!👍🏻✅

    ReplyDelete
  2. प्रिया शैलेश आपल्या देशात शिक्षणाचा बट्ट्याबोळ हा फार पूर्वीपासून झालेला नव्हे तर केला गेला आहे सुरुवातीला संपूर्ण ज्ञान संस्कृत मध्ये व त्यावर सुद्धा ठराविक वर्गाचे वर्चस्व त्यानंतर इंग्रजांची सत्ता लॉर्ड मेकेल याने भारतात माणसाला गुलाम बनवणारी शिक्षण प्रणाली सुरू केली जी आजही चालू आहे वाताच्या सत्ताधार्यांना सुद्धा ती प्रामाणिकपणे बदलण्याची गरज वाटत नाही आणि आत्ता केंद्राने त्यात बदल सुचवलेला आहे तो आपण जाणतोच मुलांना अजिबात स्वतःचा विचार व स्वतःची ओळख व्हायला नको असाच प्रयत्न त्यातून दिसतो कारण एकच सत्ताकारण

    ReplyDelete
  3. Yes I agree with this but to certain extent that competitions must not be at primary level but at swcondary level to develop creativity.

    ReplyDelete