Saturday 23 March 2024

प्रिय नातवंडांनो
आज शहीद दिवस त्यानिमित्त महान क्रांतिकारकशहीद भगतसिंग यांनी ५,६ ऑक्टोबर १९३० रोजी लाहोरच्या तुरुंगात लिहिलेल्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर २७ सप्टेंबर १९३१ रोजी लाहोरच्या 'द पीपल' या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या 'Why am I an Atheist' अर्थात 'मी नास्तिक का आहे' या निबंध लेखाच्या रूपांतरित झालेल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात.७ ऑक्टोबर १९३० रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना जॉन साॅन्डर्सच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि २३ मार्च १९३१ रोजी त्यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. 'मी नास्तिक का आहे' हे पुस्तक तुम्ही वाचले असल्यास चांगलेच
पण वाचले नसेल तर आवर्जून वाचावे आणि आपल्या देशाचे
महान क्रांतिकारक सुपुत्र भगतसिंग यांचे विवेकी विचार जाणून घ्यावेत
यासाठी हा पत्र प्रपंच...✍️
तुमचा आजोबा
'शैलेश कमल'
"असेलही माझे आयुष्य चार दिवसांचे पण,माझ्या आकांक्षेची मशाल शेवटचा श्वास असेपर्यंत माझ्या हृदयात पेटती राहील आणि उद्या जरी मी नसलो तरी माझ्या आकांक्षा देशाच्या आकांक्षा होऊन साम्राज्यवादी आणि भांडवलदारी शोषणकर्त्यांचा शेवटपर्यंत मुकाबला करीत रहातील.
माझा माझ्या देशाच्या भवितव्यावर विश्वास आहे. मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पहातो आहे. माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे. म्हणून मी आशावादी आहे. प्रेषितांविषयी बोलावयाचे झाल्यास, जर त्यांनी पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तर आज जगाची अशी दुर्दशा दिसली नसती जी आपण आज पहात आहोत.प्रेषितांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याऐवजी आकाशात स्वर्ग दाखविला. म्हणून ते निर्माते होऊ शकत नाहीत.
आजचा नवा मानव हवेत महाल बांधू इच्छित नाही. त्याने आपल्या स्वर्गाचा पाया पृथ्वीच्या याच भक्कम जमिनीवर खणण्यास सुरुवात केली आहे. आजचा प्रत्येक मानव प्रेषित आहे. म्हणून माझा मानवावर विश्वास आहे.”
भगतसिंग
लघुकथा.
प्रवासादरम्यानचा एक किस्सा...
रेल्वेने प्रवास करत असताना एक अंध पती-पत्नी रेल्वेत भिक्षा मागत होते त्यांच्यासोबत असलेला त्यांचा एक आठ वर्षाचा मुलगा देखील अंध होता.
माझ्या कंपार्टमेंटमधे प्रवास करणाऱ्या अत्यंत धार्मिक सहप्रवाशाने त्याच्या सहा वर्षाच्या मुलाकडे बघत देवाचे आभार मानले की, माझ्या परिवारावर कुठलेही संकट नाही. हिंदी भाषिक तो प्रवासी मला सांगू लागला "मैं बचपन से ही सभी भगवानों की भक्ति रहा हूं और मैं भगवान की हरदिन आराधना करता हूं और इसलिए मैं और मेरा परिवार सुरक्षित है।" त्याच्या मुलाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, " अंकल आप गॉड को थैंक यू नहीं बोलोगे ? त्या मुलाच्या वडिलांकडे पाहत मी त्या मुलालाही म्हणालो की, बेटा अगर भगवान सचमुच है तो, बेटा मैं भगवान से थैंक यू तो कहूंगा पर यह जरूर पूछूंगा की जो लोग नहीं देख पा रहे हैं और बेहद गरीबी में जी रहे हैं इन लोगों की जिंदगी में इतनी मुश्किले क्यों है ? यह क्यों नहीं देख सकते सुंदर दुनिया ? आप तो दयालु हो क्या आपको इन पर दया नहीं आती ?
मी असं म्हटल्यावर रेल्वेच्या आमच्या कंपार्टमेंट मध्ये शांतता पसरली....
मग आमच्या कंपार्टमेंट मध्ये एक बाबा महाराज आले त्यांच्या गळ्यात फोटो होता आणि ते बाबा महाराज सांगत होते की जर तुम्ही मला या देवासाठी पैसे दिले तर तुमच्या आयुष्यात कुठलेही दुःख राहणार नाही आणि तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील कारण माझ्या गळ्यातील हा देव नवसाला पावणारा आहे...
मग पुन्हा रेल्वेच्या आमच्या कंपार्टमेंट मध्ये शांतता पसरली आणि रेल्वे बोगद्यामधून जात असल्यामुळे अंधारही पसरला.....

Wednesday 20 March 2024

143 देशातील आनंदी राष्ट्रांच्या यादीत भारत 126 क्रमांकावर🤔😔 जागतिक आनंद दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙂

Monday 18 March 2024

 इस सिक्के की मदत से मै 'राज' कर सकता हु।

अति लघुकथा.

आटपाट नगर होते तिथे एक राजा राज्य करत होता राज्यात त्याच्या विषयी नाराजी निर्माण होत असल्यामुळे त्याला चिंता होती.राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे रस्त्यावर चालत असताना त्याला पाच पैशाच एक नाणं (सिक्का) दिसल त्याने हिंदीत विचार केला की, "इस सिक्के की मदतसे मै 'राज' कर सकता हु।" पाच पैशाच एक नाणं उचलण्यासाठी राजा वाकला परंतु राजाच्या नकळत त्याच्या खिशात पूर्वी असलेला एक रुपया खाली पडला आणि पाच पैसे उचलण्याच्या नादात राजा एक रुपया गमावून बसला.

- ✍️ शैलेश.

Friday 15 March 2024

 The show must go on...म्हणत पुन्हा 'लादलेल्या' युद्धासाठी सज्ज.




Sunday 10 March 2024

 

.

क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी देशातील पहिली सार्वजनिक आणि मोफत शाळा सुरू केली. त्या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी अध्यापनाचे काम केले.
ज्ञानाचे महत्त्व सांगताना सावित्रीआई फुले लिहितात..
"ज्ञान नाही, विद्या नाही।
ती घेणेची गोडी नाही।
बुद्धी असून चालत नाही।
तयास मानव म्हणावे का?।"
मानव हा बुद्धी ग्रहण करण्यास लायक आहे, त्यामुळे त्याने ज्ञानार्जन केले पाहिजे, मानव जर ज्ञानार्जन करत नसेल, बौद्धिक चिकित्सा करत नसेल तर त्याला मानव तरी का म्हणायचे? असा प्रश्न देखील सावित्रीआई विचारतात.
सावित्रीबाई फुले मराठीचा अभिमान बाळगला आणि इंग्रजी भाषेचे महत्व सांगणारी कविताही लिहिली. त्यात त्या लिहितात..
"इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी ।
शूद्रांना उद्धारी । मनोभावे ।"
इंग्रजी भाषेत शिक्षण घेतले तर तुमच्या पिढ्यानपिढ्याचे कल्याण होईल, असे सावित्रीआई फुले यांचे मत होते.ते मत आज खरं ठरले आहेत.इंग्रजी भाषा शिकल्यामुळे अनेक लोक प्राध्यापक ,डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालेले आहेत आणि म्हणुनच विद्येची खरी देवता सावित्रीआई फुले.
सावित्रीआई फुले अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला,केशवपन पद्धतीला विरोध केला. सत्यशोधकांनी विधवा बालिकांचा आक्रोश कवितेतून पुढीलप्रमाणे व्यक्त केला आहे.
"काहो आण्णा, मी तुमची लाडकी ।
का करिता मला बोडकी ।।"
आणि म्हणुनच विद्येची खरी देवता सावित्रीआई फुले.
सावित्रीआई फुले या पुरोगामी विचारांच्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, नवस सायास इत्यादी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला. जगद्गुरु संत तुकोबारायांप्रमाणेच त्या म्हणतात.
"धोंडे मुले देती,नवसा पावती लग्न का करती नारी नर?" अर्थात नवसाने मुलं होत असतील तर मग लग्नाचीच गरज काय? असा ज्ञानाच्या जोरावर परखड विवेकी सवाल त्या धर्मांध,अविवेकी सनातन व्यवस्थेला करतात.
प्रश्न विचारायची हिम्मत,शक्ति त्यांच्याकडे होती. म्हणुनच त्या आधुनिक भारताच्या आदिशक्ती आणि विद्येची खरी देवताही.
ज्योतिबांनी सावित्रीआई फुले यांच्यासाथीने बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करून निराधार बालकांना आणि महिलांना आधार दिला. त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थाना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता त्यांनी निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले. दत्तक पुत्र यशवंताला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले.
सकाळी उठल्याबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे. त्यांचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाला सुरुवात करावी, असे सावित्रीबाई फुले एका काव्यातून सांगतात
"छत्रपती शिवाजींचे । प्रातःस्मरण करावे।
शूद्रादि अतिशूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे।"
महाराणी ताराराणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा सावित्रीआई फुले यांना मोठा अभिमान वाटत असे.ताराराणीच्या कार्याची आणि शौर्याचे वर्णन त्यांनी एका काव्यातून केले आहे.
" ताराबाई माझी मर्दिनी। भासे चंडिका रणांगणी।
रणदेवी ती श्रद्धास्थानी। नमन माझिये तिचिया चरणी।"
त्यांच्याच या काव्यपंक्तींचा आधार घेऊन असे म्हणावेसे वाटते की
" सावित्रीआई माझी रणरागिनी। भासे चंडिका रणांगणी।
रणदेवी ती श्रद्धास्थानी। नमन माझिये तिचिया चरणी।"
अशा शिक्षिका,प्रबोधनकार लेखिका क्रांति ज्योती सावित्रीआई फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
Video Courtesy and Special Thanks वूमन की बात  

Monday 4 March 2024

छप के बिकते थे जो कभी, सुना है इन दिनों वो बिक के छपा करता है l

Saturday 2 March 2024

अपयशाच्या सावटाखाली आणि क्षणिक खोट्या आनंदाची,लाईफस्टाईलची भुरळ असणारी महत्त्वकांक्षी तरुणाई नशाखोरीच्या,ड्रग्सच्या विळख्यात अडकू नये म्हणून....