Monday 23 October 2023

प्रिय नातवांनो, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा अनेक शुभाशीर्वाद तुमच्यातले दुर्गुण दुसऱ्याने संपवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच संपवा म्हणजे फक्त दुर्गुण संपतील अन्यथा दुर्गुण तसेच राहतील आणि तुम्ही मात्र संपून जाल..
प्रिय नातवांनो, 
तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहणार ज्ञानमुल्याच्या की उपद्रमुल्याच्या...? ज्या वेळेला प्रामाणिकपणा,ज्ञान,सचोटी च्या बाजूने कुठल्याही व्यवस्थेचे घटक उभे राहत नाही आणि याउलट उपद्रवमूल्य असणाऱ्या अप्रामाणिक घटकांच्या पाठीशी असतात अशा वेळेला उपद्रमुल्याचं अर्थातच गुन्हेगारीच उदात्तीकरण होतं. 

जर प्रामाणिकपणा आणि सत्याच्या बाजून न्याय होणार नसेल तर सर्वाधिक धोका ज्ञानाची कास धरणारे उपद्रवमूल्याची कास धरू शकतात यात आहे... हातात विवेकाची लेखणी घेऊन न्याय मागणाऱ्यांना तुमच्या ,अन्याय वागणुकीमुळे लेखणी ऐवजी दुसरा पर्याय हाती घेतल्यास काय होईल याचा विचार करावा. 
तुमचा आजोबा.
माझ्या'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून..