Saturday 22 May 2021

edu.vopa.in

 *अति महत्त्वाचे* 

 सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या  व सर्व पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये हि लिंक सेव्ह असावी. सर्व विद्यार्थ्यांना घरबसल्या कोणताही विषय मोफत शिकता येईल त्यासाठी खालील लिंक आहे


edu.vopa.in 👈या अक्षरावर क्लिक करा

 *वर्ग ,विषय ,व धडा* निवडा

 डायरेक्ट त्या धड्याचा व्हिडिओ  सुरू होईल .

E learning 👍👍

सर्वांनी शिका. केव्हाही शिका .कोणताही वर्ग 👍👍👍    *खूप महत्वाची व छान* *लिंक आहे,  जरूर  उपयोग करा*

Wednesday 5 May 2021

शालेय शिक्षणात घोकंपट्टी आणि स्पर्धा परीक्षा असाव्यात?

शालेय शिक्षणात घोकंपट्टी आणि स्पर्धा परीक्षा असाव्यात?भाग १

शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा आणि घोकंपट्टी असावी ?

शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणातही स्पर्धापरीक्षा असतात शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे.

मुळातच शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ भाषिक आणि गणितीय बुद्धिमत्तेचा विचार करून बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच.आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो.

 विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन  शिक्षका पेक्षाही सुलभकाचे काम करायचे आहेे. शिक्षण घेतांंना विद्यार्थ्यांनी ते सहज आणि आनंददायी पद्धतीने घेणे अपेक्षित आहे स्पर्धा म्हटली की ताण तणाव येणारच किमान स्पर्धेचा ताण तणाव घेणे तरी ऐच्छिक असाव. शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन अर्थात स्पर्धा नाही, म्हणून शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात की नसाव्यात, की त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्रित विचारांनी ऐच्छिक  असाव्यात याचा विचार करणेही आवश्यक आहे.

व्यवसायिक शिक्षण असावे शिक्षणाच्या स्पर्धेतून निर्माण होणारं शिक्षणाचे व्यवसायीकरण असू नये.

खरे म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मोफत किंवा अत्यंत माफक असल्या पाहिजे, शिक्षणातील स्पर्धांमुळे शिक्षणात व्यवसायीकरण झाले आहे. एवढ्या शिक्षणातील स्पर्धा असल्यावरही आज देशात आरोग्य सुविधांमध्ये काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये  देशात असल्यावरही गणपती आणि दिवाळीला आपण लाइटिंग चायनाचीच घेतोय, बाजारातील साध्या वीस ते पंचवीस रुपयाच्या पायतानापासून महागड्या वस्तू मोठ्या प्रमाणात आपण परदेशातून आयात करतोय आपल्या देशाच्या एकूण आर्थिक बाबतीत अनेक घटकांचा समावेश असला तरी शिक्षण हा महत्वाचा घटक त्याच्या मुळाशी आहे. परदेशातील शिक्षण आपल्या  तुलनेत स्वस्त आहे शिवाय जीवघेणी स्पर्धा नाही म्हणून अनेक विद्यार्थी परदेशातील महागड्या नसणाऱ्या शिक्षणाची संधी घेतात.

कारण विकसित देशांमधील आर्थिक वृद्धी शैक्षणिक ध्येयधोरणांवर आधारित आहे आणि शैक्षणिक धोरणात कौशल्यास महत्त्व आहे, शिक्षणातील स्पर्धेस नाही, म्हणून आपण ज्या देशातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात करतोय त्या देशातील शालेय विद्यार्थी सुद्धा घरातील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कामे स्वतः करु शकतात. आपल्याकडे मात्र आपण दैनंदिन उपयोगात येणारे व्यवहारिक काम न करता किंवा करू देता केवळ परीक्षेसाठी उपयोगी असणारे मार्क्स वाढवून देणार या घटकांचा अभ्यास करतो.शिक्षणातील स्पर्धेतून वैद्यकीय प्रवेश - त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा - आणि मग आता औषध उपचार मिळण्यासाठी रांगेत उभा राहून उपचार घेण्याची स्पर्धा... अशा दृष्टचक्रात आपण कसे अडकलो आहोत याचाही विचार करावा लागेल...✍️

- शैलेश शिरसाठ,जळगाव.(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून)