Sunday 1 January 2017

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा... आणि काही प्रश्न

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा... आणि काही प्रश्न.
नवोदय प्रवेश परीक्षा ?
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संगीत,क्रीडा,सृजनशीलता, नेतृत्व,वक्तृत्व,चित्रकला यासह इतर क्षेत्रातील सर्वांगिन गुण आणि कौशल्यावर आधारित नवोदय प्रवेश परीक्षा आहे काय? की,केवळ विद्यार्थ्यांचा स्मरणशक्तीवर आधारित प्रवेश परीक्षा आहे? अर्थात ज्याची स्मरणशक्ती चांगली तोच हुशार आणि पात्र नवोदय विद्यालयातील शिक्षणासाठी...
या प्रक्रियेतून जो केवळ अभ्यासात हुशार त्यालाच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार.
आपण आपल्या शाळांमध्ये हुशार विद्यार्थ्यांना निवडून नवोदय विद्यालयांना देणार,मुळातच हुशार असलेल्या विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षण व्यवस्था काम करणार. अर्थात नवोदय विद्यालयातील हुशार शिक्षकांचा या प्रवेश परीक्षेत अपात्र ठरलेल्या साधारण विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. त्यांच्यासाठी आपण आहोत, या परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याच कठीण आणि कौशल्याचं काम आपल्या साऱ्या बांधवांना करायच आहे.
नवोदय विद्यालयात प्रवेश का मिळवायचा?
नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला तर अधिक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल असं म्हटलं जातं मग याचा दुसरा अर्थ असा आहे की नवोदय सोडून इतर विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा चांगला नाही हे आपण प्रत्यक्षरित्या मान्य करत आहोत. नवोदय विद्यालयात इतर विद्यालया पेक्षा जास्त सोयी सुविधा मिळतात आपण प्रत्यक्षरित्या मान्य करीत आहोत. जे शिक्षणाच्या सर्वांगिन आणि एक समान शिक्षणाच्या धोरणाच्या तत्त्वांशी विसंगत आहे. नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या मुलांना अधिक संधी आहे , आणि इतर विद्यार्थ्यांना संधी नाहीत असाही त्याचा अर्थ होतो. शालेय शिक्षणात यामुळे एक वर्गवारी होत नाही ना याचाही चिकित्सकपणे विचार करावा लागेल. शिक्षणात भेद नसावा किमान शालेय शिक्षण तरी संपूर्ण देशात एकाच दर्जाचं मिळायला पाहिजे. म्हणजे शिकवण्याच्या दोन संस्थांमध्ये सुविधांचा मोठा फरक असून तो आपण अशा परीक्षांच्या माध्यमातून मान्य करत आहोत. अर्थात तो फरक आहे कारण नवोदय विद्यालयातील शिक्षकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामे नाहीत त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे तुलनेने कमी हुशार आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्याा शिक्षकांना अधिक अशैक्षणिक कामे दिले गेल्यास हरकत नाही.. हे सारच विरोधाभास निर्माण करणारं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल पात्र किंवा अपात्र असा येणार.. याचा दुसरा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आपण पास करत आहोत ते विद्यार्थ्यांना मात्र नवोदय प्रवेश परीक्षा अपात्र ठरवणार.
शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धापरीक्षा असू शकतात परंतु शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण
. मुळातच शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था  नसावी किंबहुना ती तशी नाहीच.आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो.
यातील गंमत म्हणजे सरकारी शाळांमधून शिक्षकच आपल्या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांना निवडून दुसऱ्या शाळेत दाखल करून आपली पटसंख्या कमी करतात. बऱ्याच खाजगी शाळा मात्र असं करत नाहीत कारण ते नवोदय विद्यालयालाच आपला प्रतिस्पर्धी मानतात आणि नवोदय पेक्षा अधिक चांगलं शिक्षण त्यांच्या शाळेतून देण्यासाठी आग्रही असतात. परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर ते स्वतः पालकच करतात, कारण पालकांनाच सध्या मूल शिकत असलेल्या विद्यालयापेक्षा अधिक चांगल्या विद्यालयात आपल्या पाल्याला दाखल करायचे असते. परंतु ज्या पालकांना मूल सध्या शिकत असलेली शाळा अधिक चांगली वाटत असेल तर ते नवोदय ऐवजी त्याच शाळेत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण करू देतात. पण ज्या वेळेला शिक्षकच विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात जाण्याचा मार्ग दाखवता, त्याचा अर्थ काय ? तर तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या असा आहे का की अधिक चांगले दर्जेदार सुखसोयींनीयुक्त शिक्षण मिळावे जे आता मिळत नाही ? शेवटी एवढच विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन  शिक्षका पेक्षाही सुलभकाचे काम करायचे आहेे,कारण आपल्या संपूर्ण देशात विविध क्षेत्रात यशस्वी झालेले सर्वेच लोक हे नवोदय विद्यालयातून शिकलेले नाहीत..
शैलेश शिरसाठ,जळगाव.
लेखक हे शिक्षक प्रशिक्षक असुन वुई स्मार्ट, स्पीक स्मार्ट उपक्रमाचे संस्थापक आहेत

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा... आणि काही प्रश्न.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संगीत,क्रीडा,सृजनशीलता, नेतृत्व,वक्तृत्व,चित्रकला यासह इतर क्षेत्रातील सर्वांगिन गुण आणि कौशल्यावर आधारित नवोदय प्रवेश परीक्षा आहे काय? की,केवळ विद्यार्थ्यांचा स्मरणशक्तीवर आधारित प्रवेश परीक्षा आहे? अर्थात ज्याची स्मरणशक्ती चांगली तोच हुशार आणि पात्र नवोदय विद्यालयातील शिक्षणासाठी... या प्रक्रियेतून जो केवळ अभ्यासात हुशार त्यालाच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार. आपण आपल्या शाळांमध्ये हुशार विद्यार्थ्यांना निवडून नवोदय विद्यालयांना देणार,मुळातच हुशार असलेल्या विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षण व्यवस्था काम करणार. अर्थात नवोदय विद्यालयातील हुशार शिक्षकांचा या प्रवेश परीक्षेत असलेल्या अपात्र ठरलेल्या साधारण विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही. त्यांच्यासाठी आपण आहोत, या परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याच कठीण आणि कौशल्याचं काम आपल्या साऱ्या बांधवांना करायच आहे. नवोदय विद्यालयात प्रवेश का मिळवायचा? शालेय शिक्षणात यामुळे एक वर्गवारी होत नाही ना याचाही चिकित्सकपणे विचार करावा लागेल. शिक्षणात भेद नसावा किमान शालेय शिक्षण तरी संपूर्ण देशात एकाच दर्जाचं मिळायला पाहिजे. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला तर अधिक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल असं म्हटलं जातं मग याचा दुसरा अर्थ असा आहे की नवोदय सोडून इतर विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा चांगला नाही हे आपण प्रत्यक्षरित्या मान्य करत आहोत. नवोदय विद्यालयात इतर विद्यालया पेक्षा जास्त सोयी सुविधा मिळतात आपण प्रत्यक्षरित्या मान्य करीत आहोत. जे शिक्षणाच्या सर्वांगिन आणि एक समान शिक्षणाच्या धोरणाच्या तत्त्वांशी विसंगत आहे. नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या मुलांना अधिक संधी आहे , आणि इतर विद्यार्थ्यांना संधी नाहीत असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे शिकवण्याच्या दोन संस्थांमध्ये सुविधांचा मोठा फरक असून तो आपण अशा परीक्षांच्या माध्यमातून मान्य करत आहोत. अर्थात तो फरक आहे कारण नवोदय विद्यालयातील शिक्षकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामे नाहीत त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे तुलनेने कमी हुशार आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या यांना अधिक शैक्षणिक काम दिले गेल्यास हरकत नाही.. हे सारच विरोधाभास निर्माण करणारे आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल पात्र किंवा अपात्र असा येणार.. याचा दुसरा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आपण पास करत आहोत ते विद्यार्थ्यांना मात्र नवोदय प्रवेश परीक्षा अपात्र ठरवणार. शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धापरीक्षा असू शकतात परंतु शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे कारण आपण कितीही म्हटलं तरीस्पर्धा म्हटली कि . मुळातच शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच Basically, schooling is a system for finding all the special qualities that a student has, schooling is a not a system which assess or qualify learners only on the basis of intellectual memory. .आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो. शेवटी एवढच विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन शिक्षका पेक्षाही सुलभकाचे नव्हे मित्राचं काम करायचे आहेे... शैलेश शिरसाठ,जळगाव.