Friday 30 September 2022

BECAUSE..I Love JALGAON.

जेवढी पब्लिक गरबा खेळायला,बघायला सागर पार्क, सतरा मजली आणि सेंट्रल मॉल वर जमा होते तेवढीच पब्लिक जर जळगावच्या खराब रस्त्यांच्या विरोधात मैदानात उतरली तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना गांभीर्याने दखल घ्यावे लागेल आणि रस्ते करून द्यावे लागतीलच. आपण लोकप्रतिनिधींकडे उत्सवाची वर्गणी मागायला जातो त्याऐवजी आपल्या हक्काचे रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर सुविधांबाबत जायला हवे एक वेळ त्यांची वर्गणी नाही मिळाली तरी चालेल पण होतं नेमकं उलटच फक्त वर्गणी मिळते बाकी दुसर काहीच मिळत नाही अगदी आपल्या हक्काचही..

Thursday 22 September 2022

आपल्याला भाषा, जाती,पंथ, उच्च निच्च असा भेदभाव आणि देशांच्या सीमांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना मानवता हाच धर्म शिकवणाऱ्या (वसुधैव कुटुंबकम अशा महान, व्यापक आणि सकारात्मक शिक्षणाची), सातत्याने विकसित होणाऱ्या नवतंत्रज्ञानाच्या ग्लोबल शिक्षणाची गरज आहे कारण ग्लोबल शिक्षणच विद्यार्थ्यांना ग्लोबल सिटीजन म्हणून घडवणार आहे.✍️