Saturday 25 December 2021

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असायला हवे आणि इंग्रजीचे ज्ञान चांगले अवगत असावे


 प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असायला हवे असे असले तरी प्राथमिक शिक्षणात विद्यार्थी अनेक भाषा शिकू शकतात आणि इंग्रजी शिकणे विद्यार्थ्याला अधिक फलदायी होऊ शकतं

 मराठी माध्यमातील शाळात इयत्ता पहिलीपासून इंग्रजी ची सुरुवात जून 2000 पासून झालेली आहे, तथापि आपण मराठी माध्यम शाळा इंग्रजी फक्त विषय म्हणून न शिकवता भाषा म्हणून अभ्यासने आणि सुलभाकाच्या भूमिकेतून भाषेची मांडणी करणे आवश्यक झाले आहे. इंग्रजीत फक्त चांगले मार्क्स मिळवणारी पिढी ही आपणास घडवायची नसून इंग्रजी संवाद करता येणंही आवश्यक आहे चांगले इंग्रजी लिहिणारे,वाचणारे आणि परीक्षेत चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेतून सातत्याने आपणा घडवीत होतच असे असले तरी इंग्रजी संभाषणात (English Speaking) आपले विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या आणि सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा मागे आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही त्याची विविध कारणे असू शकतील असे पालकांचे अज्ञान,घराचे,परिसराचे वातावरण इत्यादी..

जगातली कुठलीही भाषा शिकतांना, शिकवतांना त्या भाषेतून संवाद करण्यासाठी ती भाषा समजण्यासाठी सर्वप्रथम ती भाषा ऐकणे आवश्यक आहे भाषा अवगत करण्यातील टप्पे पुढील प्रमाणे असतात श्रवण (Listening) भाषण (Speaking) वाचन (Reading) लेखन (Writing) त्यानुसारच इयत्ता पहिलीपासून इंग्रजी पाठ्यपुस्तकाची रचना आहे म्हणून सर्वप्रथम अर्थात पहिल्या दिवसापासून A B C D लिहिणे अपेक्षित नसून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा जास्तीत जास्त ऐकण्यास मिळाली पाहिजे म्हणजे विद्यार्थी इंग्रजी संभाषण कला शालेय शिक्षणापासूनच अवगत करतील आणि त्यांना भविष्यात जगात कोठेही इंग्रजी भाषेतून संवाद साधत त्यांना भीती वाटणार नाही. ज्या भाषेत तुम्ही बोलायला सुरुवात करतात त्या भाषेत तुम्ही विचार करायला लागतात किंवा विचार करत असलेले भाषा तुम्ही सहजपणे बोलू लिहू शकता माहिती. इंग्रजी आपली मातृभाषा नसली तरी सरावानं विचार करणं आणि विचार मांडणे होऊ शकत.तंत्रज्ञानाच्या युगात आज भारतासारख्या बहुभाषिक देशात सर्व प्रकारचे उच्च शिक्षण इंग्रजीतून आहे त्या अनुषंगाने इंग्रजी विषयाचे,इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत आहे लहानपणापासूनच मुले जी भाषा ऐकतात त्या भाषेत संवादही करायला लागतात ती भाषा त्या दोन तीन वर्षाच्या बालकाला लिहिता-वाचता येत नाही, त्या भाषेतील अक्षरे ही कळत नाहीत परंतु ती भाषा बोलण्याचा तो प्रयत्न करतो या नैसर्गिक नियमानुसार आणि भाषा ऐकून बोलते करणे  आवश्यक झाले आहे परंतु घरी पालक इंग्रजी बोलण्यास असमर्थ असतात मुलांना इंग्रजी संभाषणाचे उपयुक्त वातावरण नसल्यामुळे ती जबाबदारी मोठ्या प्रमाणावर शाळांवर अर्थातच शिक्षकांवर येते त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची दिवसभरातील काही वेळ तरी इंग्रजीत संवाद करण्याचा प्रयत्न करता येईल इंग्रजीच्या तासिकेला जास्तीत जास्त इंग्रजीतून सूचना करून असा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो तथापि असा प्रयत्न शिक्षक करतही असतात म्हणूनच शिक्षक,पालक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात इंग्रजी संभाषण प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेता 'स्पीक स्मार्ट' या इंग्रजी संभाषण उपक्रमाची मांडणी केलेली आहे.

Shailesh Shirsath.

 English Language Ambassador Jalgaon.