Thursday 31 March 2022

इयत्ता पहिली सेमी इंग्रजी शिक्षक प्रशिक्षणासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तक युनिट 2 ची  पीडीएफ लिंकला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता👇🏻

https://drive.google.co


m/file/d/1DWgO8SOzzGgnkjFiJE7gabov0zwW5tMk/view?usp=sharing 

Saturday 5 March 2022

एकमेका सहाय्य करू शाळा करू समृद्ध..

हल्ली एका वर्गात साधारणता दोन ते तीन प्रकारे अध्ययन स्तर असणारे विद्यार्थी असतात त्यामुळे एका वर्गात तीन वेगवेगळे प्रकारचे अध्ययन अध्यापन करावे लागत आहे. एका वर्गातील सर्वच विद्यार्थी एकच प्रकारच्या अध्ययन स्तरावर नसतात म्हणजे सारखेच अध्ययन कौशल्य अवगत झालेले नसतात. अशा वेळेला एका शिक्षकाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावे लागतात,ते वेळ आणि श्रम खाणारे तर आहेच पण काही वेळेला तुलनेनं अधिक चांगल्या प्रकारे अध्ययन कौशल्य अवगत असणारे हुशार मुलांवर अन्याय करणारेही होऊ शकते. त्यात विद्यार्थ्यांचे वर्गीकरण Basic, intermediate and advance असे असते. शाळेत इयत्ता पहिली ते चौथी-पाचवी किंवा संपूर्ण शाळेसाठी. विशेष अध्ययन अध्यापन वर्ग चालवताना सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांचे वर्गीकरण Basic, intermediate and advance अशा विशेष अध्ययन कक्षात (वर्गात) केल्यास अधिक परिणामकारकरीत्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना अध्ययनाचा तसेच त्यांच्या अध्ययन स्तरावरील योग्य अनुभव घेता येईल.अध्ययन अध्यापनाची परिणामकारकता आणि गुणवत्ता सुधारेल शिवाय सर्वांचाच वेळ वाचेल आणि श्रमही वाचतील . म्हणजे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गात अक्षर आणि शब्द ओळख सराव करून देत असताना तुलनेनं अधिक चांगलं समज पूर्वक आणि अस्खलित वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असणार तेच ते पुन्हा पुन्हा न शिकता त्यांच्याप्रमाणे क्षमता प्राप्त असणाऱ्या इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांसह सहभागी होता येईल. आणि त्या advance गटासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात पुढील advance भाग शिकता येईल. शाळेतील सर्व घटकांच्या एकमेकांना सहकार्य करण्याच्या कार्यपद्धतीमुळे हे सहज शक्य होईल.

टीप 
सराव सुलेखन वही पहाण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठी वरील फोटोला स्पर्श करा ( क्लिक करा )

 


Friday 4 March 2022

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२१-२२


 

Use Resources of the city.

आमची मुलं मुंबई-पुण्यात शकतात याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील रिसोर्सेस किती उपयोगात आणतात या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.पुण्यात शिकणं म्हणजे पुण्यात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे...✍

आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं  पसंत का करतो ? याची अनेक कारणं असली तरी आपल्याला आणि आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो..परंतु असे असले तरी  शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपल्या कडून घेतला जात नाही ना? याचााही विचार व्हावा...विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम दाखवा.... दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की दाखवा... ✍

आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं...  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फेेेे आयोजित साठावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे  आयोजन जळगाव येथे छत्रपती संभाजी नाट्यगृह  करण्यात आले आहे.आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे.या नाट्य स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.✍

आपलाही

शैलेश शिरसाठ,जळगाव.



Tuesday 1 March 2022

Self Introduction (स्वतःचा परिचय)

 🙏Hello Everybody🙏

Self introduction is our topic today. स्वतःचा थोडक्यात परिचय कसा करून द्यावा हे आपण आज बघणार आहोत..  याचं प्रात्यक्षिक आपण लवकरच आपल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाईन सत्रात करून घेणार आहे. पण तोपर्यंत आपल्यासाठी स्वतःचा परिचय करून देण्याच्या काही नमुन्यांपैकी एक नमुना.👉

*Hello everybody* (good morning/ afternoon / evening Sir/Mam/Everybody) 

I am____XYz__________________.

I am from *Jalgaon* itself. सदर परिचय करून देत असताना आपण जळगाव शहरातच परिचय करून देत असाल तेव्हा I am from Jalgaon itself असा उल्लेख करावा  I live in  Vrindavan society Nehru Nagar किंवा I put up  in Vrindavan society Nehru Nagar. असही म्हणता येईल. I am enjoying my work as a teacher/ doctor/ clerk/ sales manager/yoga teacher* etc.

कुठे नोकरी करत नसाल तर (महिलांनी) 👉 *I am a housewife.*

I am graduate of *Arts/commerce/Science* etc. 

I have completed *HSC./XYZ.* जर आता तुमचे शिक्षण सुरू असेल आणि तुम्ही एखादी कोर्स करत असाल तर असं म्हणू शकता👉 *I am pursuing graduation/ I am pursuing diploma in yoga. इत्यादी* 

I am studying in *MJ Colleg,Jalgaon /Etc.*

*I have a nuclear*/ extended *family.*

*In my family we are* 2/3/4/5/ 6 *members,myself,my husband, my son, daughter, mother in law and father in law.*

*My husband is a businessman*/ engineer doctor teacher etc.

पत्नी विषयी आई-वडील भाऊ-बहीण विषयी परिचय करून देताना आपण म्हणू शकता my wife is businesswoman*/ engineer doctor teacher etc. पत्नी क कुठे नोकरी करत नसेल तर 👉 * My wife is a housewife. She take care of of all the family members. Her contribution is so much vital for for our family

*I like to do yoga, read books and listen music.* किंवा *Doing yoga, Listening music and reading books are my hobbies* असंही म्हणू शकतात.

I want to become yoga teacher/ I want to become the best yoga teacher.

*I want to be the best in life.*

*Dance*/ Singing /Cooking *is my passion.* आयुष्यात एकाच गोष्टीच passion ( पॅशन ) असेल तर is वापरा. एकापेक्षा जास्त गोष्टींच पॅशन असेल तर are वापरा. For example 👉 *Dance, singing ,cooking are my passion.*


*Wishing You All..,Very HAPPY and PROSPEROUS life*

💐💐💐💐💐💐💐

*TEAM ' We Smart '*

*Shailesh Shirsath.*

Radio Announcer 

Spoken English Ambassador.

Key Resource Person.

Founder : We Smart - Speak Smart.

आम्ही नापास उपक्रम.

Founder Director : Swayamdeep Pratishthan.

Vedant Thalassemia Society, Jalgaon.

shaileshshirsath.blogspot.com