Saturday 7 May 2016

जातीव्यवस्था,आरक्षण आणि जाती अंताचा लढा

<परदेशात आपल्या सारखी वर्ण व्यवस्था नाही म्हणून आपल्यासारखीच आरक्षण व्यवस्था नाही,आपल्या देशात वर्ण व्यवस्थेवर आधारित जाती व्यवस्था आहे म्हणून आरक्षण आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार देशात जातीव्यवस्था ज्या दिवशी राहणार नाही  त्यादिवशी आरक्षणही राहणार नाही असाही एक पैलू असू शकतो. आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी,समतेसाठी असून तो गरिबी हटाव कार्यक्रम नाहीच हे सर्वांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांकडून वेळोवेळी हा प्रयत्न होत राहिला आहे आणि भविष्यातही सातत्याने होत राहील की आर्थिक निकषावर आरक्षण दिल जावं आणि विशेष म्हणजे यासाठी ते संपूर्ण देशभरात प्रत्येक व्यक्तीमध्ये ही भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न देखील करतील तो प्रयत्न इतका मोठा असेल की देशातील सर्व नागरिक एक दिवस कंटाळून म्हणतील की खरंच आर्थिक निकषावरच आरक्षण दिलं जावं परंतु नागरिकांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हजारो वर्षांपासून आपण वर्णव्यवस्थेवर आधारित जातीच्या उतरंडी मधून मागासवर्गीयांवर एक प्रकारे अन्याय होत आलेला आहे
आपल्याला व्यवस्था जाती अंताचा लढा देखील लढावा लागणार आहे परंतु आपल्या देशात असे होणार नाही असे चित्र वेळोवेळी दिसले आहे आपल्या देशात लोकांना त्यांची जातच त्यांची एक महत्त्वाची ओळख वाटत आहे.विशेषतः स्वतःच्या जातीला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जाती,सर्व जाती एकत्र करण्याला कधिच प्राधान्य आणि मान्यता देणार नाही, कारण त्यामुळे त्यांचे जन्माने मिळालेले जातीचे श्रेष्ठत्व नाहीसं होईल.
   आज देशात जवळपास प्रत्येकजन आपापली जात कुरवाळत बसला आहे.आज देशात जवळपास सर्वच जातींचे गट-तट ,मंडळ,संघटना,सेल आहेत. सर्व जाती धर्मियांना एकत्र करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली होती परंतु बहुजन म्हणवणाऱ्या जातींनी सुद्धा सत्यशोधक समाजामध्ये स्वतःला समाविष्ट करून घेतलं नाही कारण त्यांना त्यांची जात मिरवायची होती का? असा प्रश्न निर्माण होतो ..
    आज स्वताला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सर्व जातींना वर्षानुवर्ष कनिष्ठ समजलेल्या जातींना मिळणाऱ्या आरक्षणामुळे का होईना जातिव्यवस्था नाहीशी करावीशी वाटते आहे त्यांनी भूतकाळात जर या गोष्टी केल्या असत्या तर वर्तमानात ही परिस्थिती आली नसती...
कारण जातिव्यवस्था पाळू नका आम्हालाही इतर जाती सारखं वागवा अशी वैचारिक आणि मानवतावादी विचार फुले,शाहू,आंबेडकरांचा सारख्या विचारवंतांनी आणि सर्वसामान्य मागासवर्गीयांनी शेकडो वर्षापासून मांडलेले आहेत. ती फक्त इच्छा नसुन शतकानुशतकं रुदनच  होतं , हे आसवं आल्याशिवाय कळत नाही हे ही तेवढेच खरे,शेवटी जाती अंताची लढाई सुरू झाली की पुन्हा हा एक स्वल्प विराम आहे हे येणारा काळ ठरवेलच...
(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून)
शैलेश शिरसाठ.