Friday 7 July 2023

आजचा दिवस मनाला चटका लावून जाणारा होता.

 आजचा दिवस मनाला चटका लावून जाणारा होता.

प्रासंगिक असेलही कदाचित पण,

 सर्वांना तारणारा (?) अशी ओळख असणाऱ्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो कधीकधी....✍️

Thursday 6 July 2023


वाचण,लेखन सराव पुस्तिका पहाण्यासाठी आणि  मोफत डाऊनलोड करण्यासाठी  खालील लिंकला स्पर्श करा      ( क्लिक करा ) 👇

https://drive.google.com/file/d/1_VdsQxpK3J01Xtx9MInRJrt_qxOc_EZV/view?usp=sharing 

वीज कर्मचाऱ्यांचा आदर करूया त्यांचे आभार मानूया त्यांच्या सुरक्षिततेची कामना करूया.🙏


 एकविसाव्या शतकात मोबाईल क्रांतीसह सर्व क्षेत्रात आपल्या देशाने प्रगती केलेली आहे असं आपण म्हणतो त्यात नॅनोटेक्नॉलॉजी सह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा बोलबाला चर्चेमधून आहे.

प्रचंड मोठ्या प्रमाणात इंजिनिअर्स,डॉक्टर्स म्हणजे गुणवंतांची खाणच झालेला आहे आपला देश. एवढा प्रगत झाल्यावरही आज आपल्याला वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी  अक्षरशः स्वतःचा जीव पणाला लावून आपले विद्युत कर्मचारी बांधव कार्य करीत असतात. आपण पुरेशा सुरक्षेच्या सुविधा त्यांना पुरवू शकत नाही तर ही आपण केलेली प्रगती आहे का ? हा विचार एक भारतीय म्हणून आपण नक्कीच केला पाहिजे.

विज्ञानाने खूप प्रगती केली आहे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक शोधातून उपयोगात आणणाऱ्या अनेक वस्तू आपण दैनंदिन जीवनात आपल्या सुखासाठी सोयीसाठी वापरत असतो ज्या वेळेला आपला भारतीय कर्मचारी आपला बंधू विजेच्या  खांबांवर चढतो त्यावेळेला तो खूप मोठी रिस्क घेतो त्यांच्या सुरक्षिततेसाठी लिफ्टिंग व्हेईकल का नाही हा प्रश्न आपण कधीच विचारत नाही ? कारण हा प्रश्न कुठल्याही जातीशी धर्माशी  संबंधित नाही आपल्या स्वतःशीही संबंधित नाही मग आपण का विचारावा? अशी काहीशी आत्मकेंद्रीय भूमिका आपण घेतो. एवढं सगळं कमी की काय म्हणून काही लोक वीज प्रवाह खंडित झाल्यावर सरकारला,वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीला आणि वीज कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहतात. वास्तविक आपण वीज कर्मचाऱ्यांचा आदर करायला पाहिजे त्यांचे आभार मानायला पाहिजे आणि यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की त्यांची सुरक्षितता कशी वाढेल. 

सार्वजनिक हितासाठी, देशातील नागरिकांना सेवा सुविधा पुरवणाऱ्या सर्वच क्षेत्रातील कार्य करणारे कर्मचारी यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या आपल्या बांधवांचे कार्य सीमेवरील सैनिकांसारखेच आहे.

आज आपल्याला लढण्यासाठी समोर इंग्रज नाहीत, मोगल नाही,बाबर नाही कुठलीही परकीय आक्रमण नाहीत पण आपल्या मध्येच आपल्या बांधवांप्रती नसलेले प्रेम, नसलेली काळजी,केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा विचार ,स्पर्धा , द्वेष एवढं शिल्लक असेल तर ते अत्यंत घातक आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघाताला आपण Act of God म्हणतो परंतु मानवीय चुकांमुळे होणाऱ्या अपघाताला देखील काही लोक Act of God म्हणतात.

आता त्याला Act of God किंवा Act of Human म्हणावे ज्याचा त्याचा विचार असू शकतो.

भारतीय तसेच परदेशी क्रिकेटपटूंना आपल्या देशात कोट्यावधी रुपये मिळत असताना जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अधिक अत्याधुनिक सुरक्षित उपकरणे आणि सुविधा मिळाव्यात, तशी मागणी आपण भारतीयांनी करणे आणि त्यांना अधिकाधिक सुरक्षितता पुरवणे हे खऱ्या अर्थानं Act of God होईल असे वाटते.. 

एखादा देशात रोज किती विमान take off and land होतात यावरून देशाची प्रगती मोजणार की, किती कर्मचाऱ्यांना जीव वाचवणारे सुरक्षित उपकरणे उपलब्ध आहेत यावरून मोजणार ..?

'माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून....✍️

वीज कर्मचाऱ्यांचा आदर करूया त्यांचे आभार मानूया त्यांच्या सुरक्षिततेची कामना करूया.🙏


shaileshshirsath.blogspot.com 










Saturday 1 July 2023

जातीनिहाय जनगणनेचा आग्रह रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये....

रोगापेक्षा इलाज भयंकर असे होऊ नये म्हणून.... जातीनिहाय जनगणना करण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवणे अधिक सोपे असेल का ? याचा विचार करण्यास हरकत नाही. अनेकतेत एकता अशी जगभरात ओळख असणारा आपला भारत देश आहे. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञाने आपण खूप प्रगती केली असली तरी आप आपल्या जातीची अस्मिता राष्ट्रीय एकात्मतेच्या आड येऊ नये याची काळजी घेणे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे.जातीय जनगणना झाल्यास बहुसंख्या असणाऱ्या काही घटकांना अति आत्मविश्वास वाटून त्याचा उपयोग व्यवस्थेवर दबाव तंत्र म्हणून होऊ शकतो तसेच कमी संख्या असणाऱ्या जाती गटांना असुरक्षिततेची भावना देखील वाटू शकते. अर्थात या सर्व शक्यता आहेत समाजातील प्रत्येक घटक या पद्धतीने विचार करू शकतो असे नाही. फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की जाती धर्मात तेढ वाढून देश विघातक उपद्रव मूल्यांचा उपद्रव अधिक होऊन तो एकात्मतेस बाधक होऊ नये. जनगणना जातीनिहाय झालीच तरी ती जातीयत्वतेपेक्षा भारतीयत्वाची अधिक असावी एवढेच.... बागेची सुंदरता ही त्या बागेत असणाऱ्या विविध वैशिष्ट्य असणारी फुल-फळ झाडांमुळे आहे.