Wednesday, 14 October 2026

नवरात्र उत्सवात देवी मातेपुढे चौथ्या माळेचं चौथं गाऱ्हाण असे की,.....

  माझ्या Free Spoken English प्रशिक्षण कार्यक्रमात DNA अर्थात Daily News Analysis च्या माध्यमातून इंग्रजी संभाषण सराव होतो मात्र आजच्या वृत्तपत्रातील कात्रण हे केवळ Paper cutting न वाटता 

“It feels like cutting through the heart while reading. असा अनुभव होता, म्हणून नवरात्र उत्सवात देवी मातेपुढे चौथ्या माळेचं चौथं गाऱ्हाण असे की,.....

 आधी ती इंग्रजीतील बातमी माझ्या स्पोकन इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हा ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांना संदर्भासाठी. 👇

 संदर्भ लोकमत टाइम्स.

वरील बातमीतील थोडक्यात सार आधी इंग्रजीत, मग मराठी स्पष्टीकरण थोडक्यात.

 While Navratri celebrations and worship of The goddess's motherhood where underway, a couple in Sambhaji Nagar city refuse even to touch their one day old baby who had died. We won't touch Citing Navratri, the parents refused to touch the body. In our community the newborn and its mother are not touch so we cannot perform any last rites."the father said and call Central Naka crematorium to send staff to take the body.

वृत्तपत्रातील बातमीनुसार सध्या नवरात्र उत्सव सुरू असण्याच्या कारणावरून पालकांनी स्वतःच्या एक दिवसाच्या मृत बालकाला स्पर्श करू शकत नाही आणि कोणतेही विधी करू शकत नाही असे सांग त आपणास स्वतःच्या मृत बाळाला हात लावण्यास नकार दिला वडिलांनी सेंट्रल नाका स्मशानभूमीशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना बाळांना नेण्यासाठी बोलावले...

 व्याकरणाच्या नियमाच्या दृष्टीने वरील लेखनास मी पूर्णविराम द्यायला पाहिजे होता परंतु तो मी मुद्दाम दिला नाही.

 पगार लवकर होणार अशी बातमी कानावर आल्यावरही अस्वस्थता कमी होत नाही.लिहावं असंही वाटत आहे परंतु आज लेखणीही चालत नाही. माझा एखाद्या प्रथेला विरोध नाहीच परंतुएखादी प्रथा, परंपरा,कदाचित पूर्वी कालानुरूप, भौगोलिक,सामाजिक किंवा तत्कालीन एखाद्या प्रसंगामुळे योग्य असेलही कदाचित परंतु काळ बदलल्यावर आपण जर पूर्वीसारखा पेहराव, खानपान, राहणं आणि प्रवासाची साधने वापरत नाहीत आधुनिक भौतिक सुख सुविधांचा उपयोग करतो तर मग काही प्रथांबद्दलही आपण किमान विचार तरी करावा शेवटी देवी मातेला चौथ्या मायेचा गाऱ्हाण मांडताना हेच सांगेन की  देवी माता, धर्माची मांडणी खोट्या आणि दांभिक कर्मकांडांचा देखावा करणारी अमानवीय बाब नसून माणसाच्या नैतिक आचरणाशी आणि सार्वजनिक मानव कल्याणाची मांडणी असावी किंबहुना ती तशीच आहे हे आम्हाला केव्हा कळणार......? आम्हाला ते लवकर कळू  द्या ग माते. 🙏 🚩 सर्व विद्यार्थ्यांना आणि वाचकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जगदंब... जगदंब.✍️

Watch 👇

https://www.facebook.com/share/r/1Ez2CuTFFY/


Sunday, 11 October 2026

नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला देवी पुढे पहिलं सांगणे आणि गाऱ्हाणं की,.. ✍️

 १४७ कोटींहून अधिक लोकसंख्या, प्राचीन ज्ञानाचा वारसा आणि विश्वप्रगतीची स्वप्ने पाहणारा आपला देश नोबेल पुरस्कारांत मागे का ? विविध शोध लावण्यात तंत्रज्ञानात आणि औद्योगिक प्रगतीत मागे का?

 नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला देवी पुढे पहिलं सांगणे आणि गाऱ्हाणं की, विद्यार्थ्यांच्या अंगी निसर्गत: असलेली जिज्ञासावृत्ती जोपासण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्यासाठी साऱ्या देशवासीयांना बळ मिळू दे ग माता..

जर्मन आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कार्यप्रणालीवर संशोधन करून मेंदूतील विशिष्ट कार्ये नियंत्रित करणाऱ्या यंत्रणांचा शोध लावला आहे. या संशोधनाच्या निमित्ताने भारतानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

१४७ कोटींहून अधिक लोकसंख्या, प्राचीन ज्ञानाचा वारसा आणि विश्वप्रगतीची स्वप्ने पाहणारा आपला देश नोबेल पुरस्कारांसह जागतिक संशोधनात अपेक्षित स्थान का मिळवू शकत नाही?

यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही; वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, अंधश्रद्धेची चिकित्सा आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारा विचार पेरला गेला पाहिजे यासाठी शासन स्तरावर वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना देशातील प्रत्येक नागरिकांनी साथ देणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी सरकारला जबाबदार न धरता सरकारी प्रयत्नांना सहकार्य करून कुटुंब आणि समाज व्यवस्थेमधूनच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ची रुजवत होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या अंगी निसर्गत: असलेली जिज्ञासावृत्ती जोपासण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून चिकित्सकपणे शोध घेण्याची सवय शालेय जीवनात सह किंबहुना त्याहीपूर्वी कुटुंब आणि समाजातील शिक्षणातून मिळणे आवश्यक आहे. 

मेंदूचा स्विच शोधणाऱ्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे महत्त्व जगभरात आहे परंतु आपल्या देशात आपल्याला आपल्या चिकित्सक विचारांचा, वैज्ञानिक दृष्टिकोनांचा स्वीच ऑन करणे अधिक महत्त्वाचे आहे.

कारण देशाची खरी प्रगती लोकसंख्येच्या आकाराने नव्हे, तर त्या लोकसंख्येच्या विचारक्षमतेने, विवेकाने आणि मानवाच्या मानवीय विकासाच्या निर्मिती आवश्यक अशा ज्ञाननिर्मितीच्या सामर्थ्याने ठरते.


 कुटुंबात समाजात आणि शाळेत विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाचा नेमकं काय कारण सांगणार यावर हे ठरणार की आपले विद्यार्थी नोबेल पारितोषिकाच्या दृष्टीने जात आहेत की आणखी वेगळ्याच रस्त्यावर...

 अवश्य पहा 👇

https://www.facebook.com/share/v/19TGN984KY/


Saturday, 10 October 2026

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पाळधी खुर्द येथे विद्यार्थिनींच्या ‘स्वचरित कविता’ पुस्तकाचे प्रकाशन.

 

दोन दिवसीय काव्यलेखन कार्यशाळेतून विद्यार्थिनींच्या प्रतिभेला मिळाली नवी झळाळी; डायटचे विषय सहायक शैलेश शिरसाठ तसेच केंद्रप्रमुख प्रदीप जाधव यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

*पाळधी खुर्द, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा, पाळधी खुर्द येथील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी लिहिलेल्या *‘स्वचरित कविता’* या कविता संग्रहाचे प्रकाशन उत्साहात करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), जळगाव येथील विषय सहायक शैलेश शिरसाठ सर आणि केंद्रप्रमुख प्रदीप जाधव सर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

विद्यार्थिनींमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि साहित्यिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळेत गेल्या दोन दिवसांपासून काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ज्योती लीलाधर राणे आणि ज्योती उत्तमराव वाघ या शिक्षकांनी विद्यार्थिनींना कविता लेखनाचे तंत्र, विषय निवड, शब्दांची योग्य मांडणी, भावनांची अभिव्यक्ती आणि कवितेची रचना यासंदर्भात मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पना आणि अनुभवांना कवितेच्या माध्यमातून शब्दरूप दिले. त्यातून साकारलेल्या कवितांचे संकलन म्हणजे ‘स्वचरित कविता’ हा पुस्तक उपक्रम होय. या स्वरचित बालकाव्यसंग्रहाला "आनंदाची अक्षरगंगा" असे नाव देण्यात आले.

मराठी भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना आपल्या भावना आणि विचार साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करता यावेत तसेच वाचन व लेखनाची आवड विकसित व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थिनींनी स्वतः कविता लिहून पुस्तकाच्या स्वरूपात त्या प्रकाशित करण्याचा अनुभव घेतल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास आणि साहित्यनिर्मितीची प्रेरणा वाढण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अरुण असोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. त्यामध्ये पदवीधर शिक्षिका ज्योती उत्तमराव वाघ, श्रीमती गीता बाळकृष्ण काळे, सौ. कांचन प्रशांत सोनवणे, श्रीमती ज्योती लीलाधर राणे, सौ. वंदना संजय चौधरी, श्रीमती अनिता उघडू गढरी, श्री. सुभाष गरबड पारधी, श्रीमती योगिता शिवाजी बागुल, श्रीमती वैशाली रमेश जाधव आणि श्री. सत्यवान भागवत जाधव यांचा समावेश आहे.

अभिजात मराठी भाषेचा गौरव जपत विद्यार्थिनींच्या लेखनकौशल्याला संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक आणि साहित्यिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. विद्यार्थिनींच्या लेखणीतून उमललेल्या या कवितांमुळे मराठी भाषेप्रती प्रेम, अभिमान आणि सर्जनशीलतेची भावना अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.



Monday, 5 October 2026

आपल्या आणि त्यांच्या मेंदूचा स्वीच

 मेंदू चा स्विच आणि 140 कोटी ंच्या वर लोकसंख्या असणाऱ्या नोबल शिवाय विश्व प्रगतीचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाबद्दल आपण मेंदूचा स्वीच ऑन करून विचार करायला पाहिजे 










Friday, 2 October 2026

मजबूरी का नही मजबूती का नाम महात्मा गांधी

एकदा रेल्वेच्या प्रवासात माझ्या मित्र  सहजच महात्मा गांधींच्या विषयावर मला म्हणाला  की, "मजबूरी का नाम महात्मा गांधी असे म्हटले जाते,यावर तुझे मत काय?" मी त्याला म्हटलं की,

महात्मा गांधींवर जगात सर्वाधिक पुस्तके आणि लेख लिहिलेली आहे जवळपास १ लाख ५ हजार.

  ७० देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आहेत. ७० देशांना असे वाटते की महात्मा गांधींचे पुतळे आमच्या देशात असले पाहिजे मग गांधी मजबूरी का नाही मजबुती का नाम है l हे लक्षात घेण्याची आणि लक्षात आणून देण्याची वेळ आहे.

१२५ पेक्षा अधिक  देशांनी गांधीजींवर टपाल तिकीट काढले आहेत. गांधीजींच्या नावाने आपल्या देशात टपाल तिकीट असावे असे जर एखाद्या देशाला वाटत असेल तर मग ती महात्मा गांधींची मजबुरी की महात्मा गांधींच्या महान कार्यामुळे त्या देशाची मजबुरी.... " रेल्वेतील माझे सर्व प्रवासी माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. मी म्हटलं की.

 "जगभरात ६०० विद्यापीठांमध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो तो आधुनिक जगाच्या मानवतावादी अभ्यासाचा विषय आहे. आपल्या विद्यापीठांमध्ये गांधी विचार मांडला जावा यात महात्मा गांधींची मजबुरी की त्यांच्या मानवतावादी विचारांमुळे त्या विद्यापीठांची मजबुरी हे समजून घेतले पाहिजे.

 महात्मा गांधी  प्रचंड निर्भय व्यक्तिमत्व आयुष्यात कोणालाच घाबरले नाहीत ज्यांच्यावर पाच वेळा हत्येचे प्रयत्न झाले. स्वदेशीचा नारा देत चरखा चालवणाऱ्या महात्मा गांधींचं केवळ अहिंसा आणि सत्याचा प्रतीक न मांडता  निर्भय आणि विद्रोही गांधी सातत्याने मांडण्याची आवश्यकता सुशिक्षित म्हणवणाऱ्या भारतीयांकडून आहे असे वाटते. असे मी माझ्या मित्राला म्हटलं. त्यावेळी आमच्यासोबत प्रवास करणारा 

 एक प्रवासी मला म्हणाला, " पण सर,महात्मा गांधींमुळे आपल्याला उशिरा स्वतंत्र मिळाले असे मी ऐकले आहे ?" त्यावर मी त्याला म्हटलं की,

 १७५७ ला ईस्ट इंडिया कंपनीची राजवट होती १८५८ ला प्रत्यक्ष इंग्रजी राजवट सुरू झाली. महात्मा गांधी भारतात १९१५ .ला आले आणि १९२० साली ते देशाचे सर्वोच्च नेता झाले. परंतु गांधींच्या आधी १७५७.

 म्हणजे जवळपास १६८ वर्ष या देशात गांधी कुठेच नव्हते,गांधीजींची अहिंसा नव्हती तेव्हा गांधीजींनी कोणाच्या हातातली बंदूक हिरावून घेतली नव्हती मग तरीही हा देश १६८ वर्षात का स्वातंत्र होऊ शकला नाही? या तुलनेत अवघ्या २७ वर्षात गांधीयुगात देश स्वातंत्र्य झाला? आणि मग आपण पुन्हा असेच म्हणायचे की देश गांधींमुळे उशिरा स्वतंत्रता झाला.

 यावर गांधींना मुळीच न मानणारा आणि कुठलाही अभ्यास नसणाऱ्या त्या सुशिक्षित म्हणणाऱ्या व्यक्तीचा चेहरा पडला..... प्रवासातील संवाद क्रमशः.... ✍️




Thursday, 24 September 2026

बाप्पा आम्हाला माफ करा.

 कौतुक की टीका? आणि हे असे का झाले असा विचार करणे गरजेचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांपैकी  एका वृत्तपत्रात विसर्जनातील मूर्ती रिपेंट करून विकण्याची बातमी धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्याबद्दल वृत्त प्रसिद्ध झाले होते. आता अशा प्रकारे मुर्त्यांना रीपेंट करणाऱ्यांवर टीका करावी की प्रदूषण कमी करून प्लास्टर ऑफ पॅरिस वाया न जाऊ देता त्याचा पुन्हा उपयोग करता याबद्दल  त्यांचे कौतुक करावे. हे  सुज्ञ नागरिकांनी ठरवण्याची गरज आहे कारण ही अशी वेळ का आली? याचा चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करणे महत्त्वाचे आहे.पर्यावरण पूरक शाडू  मातीची मूर्ती बनवणे ऐवजी पर्यावरण पूरक नसणाऱ्या मुर्त्या आपण का थांबवू शकत नाही याचा विचार नॅनो टेक्नॉलॉजी च्या आधुनिक वैज्ञानिक युगात आपण  करणे गरजेचे आहे ?

 कारण आपल्या देशात आपण नदीला पवित्र मानतो,देवी मानतो पण त्याच वेळेला आपण वेगवेगळ्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात प्रदूषण नदीच्या शुद्ध पाण्यात सोडून तिला अशुद्ध करतो या तुलनेत ज्या देशात नदीला देवी न मानता केवळ नदी मांनल जातं त्या देशात मात्र नदीचे पाणी अतिशय स्वच्छ आणि अधिक निर्मळ असतं याचा विचार माध्यमांसह देशातील सर्व लोकांनी करणे गरजेचे आहे. आपण जर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या पुन्हा रिपेंड होऊन बाजारात येण्याबद्दल बोलत असू तर मग काही वस्तूंच्या बाबतीत काही ठिकाणी असेही पाहायला मिळते की देवी देवतांना अर्पण केलेल्या विविध वस्तू पुन्हा बाजारात आणल्या जातात किंवा विकल्या जातात, त्याबाबतही भाष्य करणे आवश्यक आहे.

माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून'....✍️






 Paper cutting 3