भारतातल्या आजच्या जेन झी (Gen Z) पिढीच खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणजे देशभरात NEET नीट चा एवढा मोठा पेपर फुटीचा घोटाळा झाला,त्याचा अत्यंत वाईट परिणाम स्वतः जेन झी असलेला तरुणांवर झाला. मुलांच्या आक्रोश करताना आणि रडतानाचे व्हिडिओ आपण काहीच थोड्या सोशल मीडियावर बघितले असेलही. एरवी शेजारच्याचा वाऱ्याने चुकून आलेला कचरा देखील आपण आपल्या अंगणात सहन करत नाही प्रसंगी त्यावेळेला आपण शेजारच्यांशी सुद्धा भांडतो परंतु विविध परीक्षांमध्ये वारंवार होणारे पेपर फुटी आणि त्या विरोधात कुठलाही आंदोलन न करता अगदी शांत भूमिका घेतल्यामुळे खरंच भारतातल्या आजच्या जेन झीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
इतर कोणत्याही देशात सतत होणाऱ्या परीक्षांच्या घोटाळ्यामुळे समस्या निर्माण झाल्या असत्या तर कदाचित त्या देशांमध्ये जेन झी सह इतर सर्व वयोगटातील त्या त्या देशातल्या लोकांना सरकार विरुद्ध आंदोलन करून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेतला असता पण आपल्या देशात जेन झी सह इतर सर्व वयोगटातील आदर्श नागरिकांनी शांततेचा मार्ग अवलंबून त्याविरुद्ध ब्र शब्द देखील बोलले नाहीत, कुठेही मोर्चा नाही किंवा आंदोलन नाही. यावर कोणीतरी देशद्रोही अशी टीका करू शकता की असं चुकीच्या गोष्टी विरुद्ध न लढता सर्व लोक केव्हा आपला वैयक्तिक स्वार्थ बघतात आणि जाती धर्म पंथांमध्ये विभागलेल्यामुळे एक होत नाहीत परंतु तसे नाही आपल्या देशातील जेन झी सह सर्वच लोक संयमाची भूमिका घेत आहेत बघ्याची नाही.
नाशिक मध्ये झालेल्या वृक्ष तोडीच्या वेळी देखील आपण सारे भारतीय आणि आपले जेन झी यांनी शांत राहून संयमाची भूमिका घेतली आहे.
अलीकडे नर्मदा नदी मध्ये धार्मिक कर्मकांडाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात दुधाचा टँकर अर्पण केल्याची घटना चर्चेत आली.भारतासारख्या देशात, जिथे अजूनही कुपोषण मोठी समस्या आहे.2024 च्या Global Hunger Index अहवालानुसार भारताचा क्रमांक 105 वा होता. भारताला 127 देशांपैकी 105 वे स्थान मिळाले असून भारताचा स्कोअर 27.3 होता, जो 'Serious '(गंभीर) श्रेणीत मोडतो. असे असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोषणास उपयुक्त दुधाचा अपव्यय झाला म्हणून आपल्या भारतातील जेन झी ने या विरोधात आंदोलन सोडा परंतु निषेध सुद्धा पुरेसा नोंदवला नाही आणि शांततेची आणि संयमाची भूमिका घेतली खरच भारतातल्या आजच्या जेन झी च कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
रोमँटिक चित्रपट पाहताना चित्रपटातील कथानक हे सत्य नसून एक चित्रपट आहे याची जाणीव असल्यावरही नायक नायकेच्या विरहामुळे अत्यंत भावनिक होऊन रडणारे भावनाप्रधान Gen Z आपण थेटर मध्ये आणि थेटर च्या बाहेर पाहिले. आणि त्याच वेळेला इराण आणि इजराइल युद्ध दरम्यान इराण मध्ये एका शाळेवर पडलेल्या क्षेपणास्त्रामुळे तेथील शाळकरी मुली मृत्युमुखी पडल्या अशावेळी इतर देशातील जेन झी ने त्याबद्दल खेद व्यक्त केला आणि चुकून जरी लहान बालिकांवर हल्ला झाला असला तरी त्याचा निषेध व्यक्त केला अशावेळी देखील आपल्या जेन झी ने तटस्थतेची भूमिका घेत निषेध व्यक्त न करता यावर फारसे भाष्य केले नाही त्यामुळे देखील भारतातल्या जेन झी च कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
अर्थात चिनी आणि अमेरिकी तंत्रज्ञानावर स्वार झालेले भारतीय जेन झीच कौतुक आहेच परंतु अशा प्रकारचे शांततेची भूमिका घेत कुठलंही शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन न करणार जेन झीच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पिढ्यांचे ही कौतुक केले पाहिजे कारण शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा बेरोजगारीचा आपले सर्व जबाबदार भारतीय नागरिक मोठ्या संयमाने अधिकाधिक शांत राहून जगाला आपल्या संयमाचा परिचय देत आहेत.
आपल्या शेजारील सर्वच देशातील Gen Z च्या तुलनेत शांत,संयमी Gen Z सह साऱ्याच भारतीय बांधवांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
No comments:
Post a Comment