दिनांक १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याची व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी शिक्षण, सहकार, शेती व समाजकारण या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली व त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन करण्यात आली. शाळेत पूर्वीपासून स्थापन असलेल्या We Smart या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या ग्रुप च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणा बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे.
मी जेव्हा द पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्थेच्या सौ.रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्यावेळी We Smart ग्रुप स्थापन करून त्या माध्यमातून विविध उपक्रम शाळेत राबवले त्यापैकीच एक उपक्रम My Movie My Motivation हा चित्रपट आणि टेलिव्हिजन च्या माध्यमातून सकारात्मक काय घेता येऊ शकतं या संदर्भात होता.
टीव्ही,चित्रपटांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर म्हणजे येणाऱ्या भावी पिढ्यांवर पडत असतो तो चांगला किंवा वाईट असू शकतो. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असणारे त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिरेखा त्या संदर्भात असलेले जीवनपट,माहितीपट तसेच चित्रपटांवर चर्चासत्रे प्रश्नमंजुषांचे आयोजन असणारा उपक्रम 'My Movie My Motivation' हा उपक्रम चित्रपट आणि टेलिव्हिजन च्या माध्यमातून सकारात्मक काय घेता येऊ शकतं या संदर्भात होता.
या उपक्रमातून प्रेरणा घेतलेला मुकुंदा त्यावेळी म्हणजे २०१४- १५ ला सातवीत होता आता मुकुंदाच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल आहे आणि तो पुन्हा याच उपक्रमात मला मदत करत आहे. फरक हा झालाय की त्या वेळेला मोबाईलचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता सध्या सुरू असलेल्या उपक्रमात समाज माध्यमांचा अर्थात सोशल मीडियाच्या भूमिकांचा अंतर्भाव अधिक आहे.
चित्रपट सृष्टीचा खूप मोठा प्रभाव आपल्या सगळ्यांवर आहे. चित्रपटांवर आधारित चर्चासत्रातून आयुष्यातील विविध पैलूंवर विचार करण्यास मिळतो. प्रत्यक्ष जीवनातील विविध घडामोडींचा देखील चित्रपटांवर परिणाम होतो आणि आयुष्यातील खऱ्या रियल हिरोंच्या जीवनावर देखील चित्रपट बनतो.
आजचा काळ हा डिजिटल युगाचा काळ आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इंटरनेट यामुळे जग अगदी आपल्या हातात आले आहे. या माध्यमांमुळे शिक्षण, मनोरंजन आणि संवाद यामध्ये मोठी क्रांती झाली आहे. विशेषतः आजची मुले ही 'डिजिटल नेटिव्ह' आहेत—म्हणजेच त्यांचा जन्मच डिजिटल वातावरणात झाला आहे. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान वापरणे सहज जमते, पण त्याचबरोबर या जगातील धोकेही समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.
इंटरनेट हे एक विशाल जाळे आहे जिथे माहिती, मनोरंजन आणि संवाद यांचे अमर्याद स्रोत उपलब्ध आहेत.
ऑनलाइन शिक्षण (E-learning)
सोशल मीडिया
गेमिंग
व्हिडिओ प्लॅटफॉर्म
या सर्वांमुळे मुलांचे ज्ञान वाढते, पण याचबरोबर अति वापर, चुकीची माहिती आणि व्यसन यांसारखे धोकेही निर्माण होऊ शकतात.
ऑनलाइन जगातील धोके
मुलांना इंटरनेट वापरताना खालील प्रमुख धोके संभवतात.
• सायबरबुलिंग (Cyberbullying) – ऑनलाइन छळ किंवा टोमणे
• अयोग्य कंटेंट (Inappropriate Content) – वयानुसार अयोग्य माहिती
• गेमिंग व्यसन (Gaming Addiction) – वेळेचा अपव्यय आणि मानसिक परिणाम
• फेक न्यूज आणि चुकीची माहिती.
पालकांची भूमिका
डिजिटल युगात पालकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.
• मुलांशी मोकळा संवाद ठेवूया.
• त्यांच्या ऑनलाइन सवयी समजून घेऊया, नियंत्रित करूया.
स्क्रीन टाइम निश्चित करूया.
• आपण पालकांनीही स्वतःही योग्य उदाहरण ठेवूया.
• आवश्यक असल्यास पॅरेंटल कंट्रोल अॅप्स वापरायला हवेत
पालकांनी मुलांना घाबरवण्याऐवजी जाणीव आणि समज देणे अधिक महत्त्वाचे आहे. आता काहींना असेही वाटू शकेल की हल्ली मुलं घाबरतही नाही आणि या गोष्टींना आम्ही पालक म्हणून अधिक घाबरत आहोत. अर्थात घाबरणे म्हणजे सजग राहणे या अर्थाने असावे. एखाद्या गोष्टीबद्दल घाबरणे म्हणजे अधिक सजग राहणे, इतके घाबरणे आणि दबावात येणे नाही की जो आपला आत्मविश्वासच पूर्णपणे संपवून टाकेल.
शाळेची भूमिका
• शाळा ही मुलांच्या घडणीचे केंद्र आहे.
• डिजिटल साक्षरता (Digital Literacy) शिकवणे
• सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण.
• कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम.
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे.
शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक घटकांची जबाबदारी
सामाजिक घटकांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
• जनजागृती मोहीम.
• सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करणे.
• मुलांसाठी सकारात्मक ऑनलाइन कंटेंट उपलब्ध करणे.
मुलांसाठी डिजिटल शिस्त (Digital Discipline)
मुलांना खालील सवयी लावणे आवश्यक आहे:
• ठराविक वेळच स्क्रीन वापरणे.
• अनोळखी लोकांशी संवाद टाळणे.
• वैयक्तिक माहिती शेअर न करणे.
• शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर.
वेळोवेळी ऑफलाइन खेळ आणि उपक्रमात सहभागी होणे.
त्यासाठी 'पालक शाळा' सातत्याने प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांचाच एक भाग. 👇