Saturday 11 September 2021

माझी आणि उदयची अशा दोन्ही चारोळ्यांना एकाच फोटोत बसवायच्या होत्या,मला माझ्या कल्पनेतला एक फोटो क्लिक करायचा होता पण हवा तसा मावळतीचा क्षण जुळून येत नव्हता म्हणून मी तब्बल 48 तास मला हव्या तशा फोटो क्लिक साठी थांबलो... फ्लॅशबॅक... shaileshshirsath.blogspot.com

Thursday 9 September 2021

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याबाबत..


 *महत्त्वाचं पत्र.*👇

          *विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याबाबत..*

✍बाप्पा तुम्ही आमच्या सोबत कायमच आहात तुमच्या आगमनाची तयारी असं न म्हणता. मी असं म्हणेल  गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे आणि या गणेशोत्सवात कोरोना काळातही विद्यार्थ्यांना आम्हाला  *' अजून वेगळे* आणि *अजून चांगलं '* कसं देता येईल यासाठी आमचीही तयारी सुरू आहेच. आपल्या देशाच्या नव्या पिढीत, विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा,आपल्या उज्ज्वल भारतीय परंपरेची ओळख व्हावी

या व्यापक आणि सकारात्मक उद्देशाने एक सहशालेय उपक्रमास गेल्या 5 वर्षात राबविला आहे...

*।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।।*

बाप्पा आता आजचं उदाहरण बघ ना.परवा आमावस्येला  वाहनांना दृष्ट लागू नये आणि वाहनांचे रक्षण व्हावे म्हणून लावलेले मिरची लिंबू बऱ्याच ठिकाणी खाली पडले होते.मिरची लिंबू फार पूर्वी जंगलातून प्रवास करताना फर्स्ट एड बॉक्स सारखी वापरलं जायचं, लिंबू मिरचीचा खरा उपयोग जाणून न घेता त्याचा विपर्यास आपण केला.बाप्पा विज्ञानानं आम्हाला हे शिकवलं लिंबू म्हणजे सायट्रिक ऍसिड.लिंबात *'क' जीवनसत्व* असतं क जीवनसत्व आपल्या पोषणास अत्यंत उपयोगी असं जीवनसत्व आहे,जगत क्वचितच कोणत्या देशात आपल्या देशातप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात क जीवनसत्वयुक्त फळं देणारी मृदा असावी असे असले तरी जगभरात कुपोषण असणाऱ्या देशांच्या यादीत आपला देश सुद्धा आहे, हेही नाकारून चालणार नाही. *बाप्पा केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे पोषणास उपयुक्त असे 'क' जीवनसत्व असलेले लाखो लिंबू आपण अक्षरशः वाया घालवतो.हे क जीवनसत्व अस वाया न जाता आपल्या देशातील कुपोषित  मुलांना मिळावं अशी सद्बुद्धी आम्हाला मिळो.*🙏🙏

आपली भारतीय राज्यघटना आपल्यासाठी खालील ओळी लिहिते त्या अशा 👇

*'It is duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and unionism'.* म्हणजे👉

'शोधकबुद्धी,धर्मसुधारणा मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आपण सर्वांनीच

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे.✍

बाप्पा *आपला देश,आपली संस्कृती ही खूप मोठी आहे,महान आहे. या आपल्या मातृभूमीनेच जगाला शून्याचा शोध लावणाऱ्या आणि पृथ्वीच्या खगोलीय रचनेचा अभ्यास करणाऱ्या आर्यभटांसारखा महान गणिती आणि खगोल शास्त्रज्ञ दिले आहेत.दुर्दैवाने आपल्यालाच आपल्या महान शास्त्रज्ञांचा आणि संस्कृतीचाही विसर पडलाय..*

 जगाला आपल्या महान संस्कृतीत जन्माला आलेल्या महान सुपुत्रांची ओळख व्हावी आणि आपल्याच देशातील विद्यार्थ्यांच्या रूपाने येणाऱ्या पिढ्यांना  विज्ञान अभ्यासकांची माहिती असावी असे वाटते.प्रत्येक भारतीय नागरिकाने शोधकबुद्धी, वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद याचा विचार अंगीकारल्यास आर्यभट्ट

महर्षी कणाद,महर्षी सुश्रुत,भास्कराचार्य,बोधायन,डॉ. सी. व्ही. रमण,जगदीश चंद्र बोस,श्रीनिवास रामानुजन,डॉ. होमी भाभा,हरगोविंद खुराणा,सत्येंद्रनाथ बोस,विक्रम साराभाई,वेंकटरामन,रामकृष्णन,जानकी अम्मल,बी. विजयलक्ष्मी, डॉ.एपीजे अब्दुल कलाम,डॉ. जयंत नारळीकर,डॉ. विजय भटकर या सारखे महान भारतीय घडतील यात शंका नाहीच.. (क्रमशः)

बाप्पा तुझ्यातल्या बुद्धीचा अंश माणसात येण्याच्या प्रतीक्षेत..

तुझाच

शैलेश शिरसाठ.

संस्थापक

विज्ञान उपक्रम ।। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।।