Saturday 11 March 2023

'क' कबड्डी चा..Use Resources of the city.

आमची मुलं मुंबई-पुण्यात शकतात याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील रिसोर्सेस किती उपयोगात आणतात या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.मुंबई-पुण्यात किंवा कुठल्याही शहरात शिकणं म्हणजे तेथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे...✍ आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं पसंत का करतो ? याची अनेक कारणं असली तरी आपल्याला आणि आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो.. परंतु असे असले तरी शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपण घेत नाही ना याचाही विचार करावा लागेल...विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक, क्रिडा विषयक उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम दाखवा,मोबाईल बाजूला ठेवून प्रत्यक्ष मैदानावरच्या खेळाच्या स्पर्धा दाखवून त्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.... दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की दाखवा... ✍ आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं... क्रीडा व युवा सेवा संचालनालय,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन आपल्या जळगाव शहरात आकाशवाणी चौकाजवळ महाबळ रोड वरील सागर पार्क मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धा १० मार्च ते १४ मार्च २०२३ या कालावधीत होणार आह.सदर स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहण्याची एक चांगली संधी या निमित्ताने जळगावकरांना मिळाली आहे.राज्यभरातून आलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवूया, खेळाचा आनंद घेऊ या आणि देऊया. मोबाईलवर मैदानी खेळ खेळणाऱ्या मुलांसह पालकांनी देखील आपल्या भारतीय खेळाचा आनंद घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.✍ आपलाही शैलेश शिरसाठ,जळगाव.

Friday 3 March 2023

आओ ना महाराझ - 'रमीचा' डाव आणि 'रडीचा' डाव. लोकशिक्षणातील माध्यमांच्या भूमिका आणि जबाबदारीचे भान

लोकशिक्षणातील माध्यमांच्या भूमिका आणि जबाबदारीचे भान.. रमी चा डाव आणि रडीचा डाव... आल्यास काय कराल ते सांगण्याचा एक प्रयत्न आणि कर्तव्यही. माझ्या प्रिय नातवांनो. असं म्हणून जरी मी या पत्राला सुरुवात केली तरी अशी हाक मारणारे आजोबा आज आम्हा भावंडांकडे  नाहीत. त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले नाही, असेअसले तरी आपल्या देशाच्या महान आजोबांनी नई तालीमसह आपल्या विचारांच्या माध्यमातून केलेलं खूप चांगल मार्गदर्शन उपलब्ध आहे. आमच्यासारख्या माध्यमांवर खूप अवलंबून न राहता स्वतः चांगलं शोधून वाचणाऱ्यांसाठी ते कामच उपलब्ध आहे. हल्ली लोकशिक्षणातील माध्यमांच्या भूमिकांमुळे देखील जबाबदारीचे भान अधिक वाढले आहे. मी माझ्या सध्याच्या अमृत काळातील (?) अनुभवांवरून तुमच्यासाठी काहीतरी लिहून जातं आहे. आमच्या लहानपणी साधं मनोरंजन आणि टाइमपास म्हणून सुद्धा आम्ही पत्ते खेळायचे नाही कारण माझ्या वडिलांना ते आवडायचे नाही ते म्हणायचे की याची सवय लागली तर चांगली बाब नाही. हल्ली मीडियावरचे बाबा तसं न सांगता प्रोत्साहित करत आहेत म्हणून म्हणतो जरा सांभाळून कारण त्याचे व्यसन लागू शकते आणि आर्थिक धोकाही संभवतो ... हे झालं रमीच्या डावाबद्दल आता रडीचा डाव देखील असल्यामुळे काळजी घ्या, तुमच्या हातात कुठल्याही प्रकारची सत्ता असली तरी आयुष्यात रडीचा डाव खेळू नका कारण काळ बदलत असतो काळ बदलला तर तुम्हीच खेळत असलेल्या रडीचा डाव तुमच्यावरही उलटू शकतो. म्हणून दोन्ही प्रकारच्या रमीच्या आणि रडीच्या डावांसाठी आत्ताच सावध करतो. आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या जुगाराची सवय लागली तर काय होऊ शकत हे महाभारतातील कथेतून शिकायलाच पाहिजे. तुम्हाला मनोरंजन म्हणून खेळायचं असेल आणि ते खेळल्या वाचून गत्यंतरच नसेलच तर खेळा पण जरा भान ठेवा. तुम्ही ऐकलंच नाही तर मी देखील भीष्मपितामहांसारखा हातबल होईल आणि तुमच्या आयुष्यात महाभारत उभ राहिल आणि दृष्टीहीन ध्रुतराष्ट्राजवळ बसलेल्या  दूरदृष्टी असणाऱ्या संजय सारखंच माझं पत्र देखील फक्त समालोचनाच काम करेल... माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️