Wednesday, 4 March 2026

चित्रपटांवर आधारित संवाद कार्यशाळा, चर्चासत्र उपक्रम My Movie My Motivation.

 मी जेव्हा द पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्थेच्या सौ.रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्यावेळी We Smart ग्रुप स्थापन करून त्या माध्यमातून विविध उपक्रम शाळेत राबवले त्यापैकीच एक उपक्रम My Movie My Motivation हा चित्रपट आणि टेलिव्हिजन च्या माध्यमातून सकारात्मक काय घेता येऊ शकतं या संदर्भात होता.

टीव्ही,चित्रपटांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर म्हणजे येणाऱ्या भावी पिढ्यांवर पडत असतो तो चांगला किंवा वाईट असू शकतो. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असणारे त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिरेखा त्या संदर्भात असलेले जीवनपट,माहितीपट तसेच चित्रपटांवर चर्चासत्रे प्रश्नमंजुषांचे आयोजन असणारा उपक्रम 'My Movie  My Motivation' हा उपक्रम चित्रपट आणि टेलिव्हिजन च्या माध्यमातून सकारात्मक काय घेता येऊ शकतं या संदर्भात होता.
या उपक्रमातून प्रेरणा घेतलेला मुकुंदा त्यावेळी म्हणजे २०१४- १५ ला सातवीत होता आता मुकुंदाच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल आहे आणि तो पुन्हा याच उपक्रमात मला मदत करत आहे. फरक हा झालाय की त्या वेळेला मोबाईलचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता सध्या सुरू असलेल्या उपक्रमात समाज माध्यमांचा अर्थात सोशल मीडियाच्या भूमिकांचा अंतर्भाव अधिक आहे.

  चित्रपट सृष्टीचा खूप मोठा प्रभाव आपल्या सगळ्यांवर आहे. चित्रपटांवर आधारित चर्चासत्रातून आयुष्यातील विविध पैलूंवर  विचार करण्यास मिळतो. प्रत्यक्ष जीवनातील विविध घडामोडींचा देखील चित्रपटांवर परिणाम होतो आणि आयुष्यातील खऱ्या रियल हिरोंच्या जीवनावर देखील चित्रपट बनतो.



No comments:

Post a Comment