जेवढी पब्लिक गरबा खेळायला,बघायला सागर पार्क, सतरा मजली आणि सेंट्रल मॉल वर जमा होते तेवढीच पब्लिक जर जळगावच्या खराब रस्त्यांच्या विरोधात मैदानात उतरली तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना गांभीर्याने दखल घ्यावे लागेल आणि रस्ते करून द्यावे लागतीलच.
आपण लोकप्रतिनिधींकडे उत्सवाची वर्गणी मागायला जातो त्याऐवजी आपल्या हक्काचे रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर सुविधांबाबत जायला हवे एक वेळ त्यांची वर्गणी नाही मिळाली तरी चालेल पण होतं नेमकं उलटच फक्त वर्गणी मिळते बाकी दुसर काहीच मिळत नाही अगदी आपल्या हक्काचही..