विषय : शेतकरी मदतीसाठी दुर्गोत्सव खर्चात कपात करण्याबाबत.
मा. अध्यक्ष, सचिव व सदस्य,
माऊली नगर दुर्गोत्सव मंडळ, माऊली नगर जळगाव.
सप्रेम नमस्कार,
सध्या राज्यभर तुफानी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. अंदाजे 1.50 कोटी एकर शेती उध्वस्त झाली असून हजारो शेतकरी उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाहीत. त्यांच्या संसाराचा, उपजीविकेचा आधारच कोसळून गेला आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या माऊली नगर दुर्गोत्सव मंडळाने समाजापुढे संवेदनशीलतेचा आदर्श ठेवावा, अशी विनंती आहे. यावर्षी सार्वजनिक दुर्गोत्सवात विद्युत रोषणाई किंवा इतर कुठल्याही बाबींवरचा खर्च काही प्रमाणात कमी करून तो निधी थेट शेतकरी मदतीसाठी वापरावा.
जर मंडळाने किमान सात शेतकऱ्यांना तरी पाच ते दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली, तर ही मदत केवळ रकमेपुरती मर्यादित राहणार नाही, तर समाजापुढे दुर्गोत्सवाचे सामाजिक भान आणि जबाबदारी यांचे दर्शन घडवेल.
म्हणूनच आपल्याकडे नम्र विनंती आहे की, यावर्षीच्या दुर्गोत्सव खर्चाचे प्राधान्य पुनर्विचार करून शेतकरी मदतीसाठी ठोस पाऊल उचलावे.
आपला विश्वासू,
No comments:
Post a Comment