मी व्यक्तीशी असं मानतो की शिकवण हे कृत्रिम तर शिकण हे नैसर्गिक आहे.म्हणूनच आपण शिक्षकापेक्षाही सुलभकाच्याच भूमिकेत असले पाहिजे. कुणी शिकल तरच आपल शिकवण खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत,नाही तर व्यर्थच.
तुम्ही कोणाला शिकवू शकत नाही जोपर्यंत की कोणी शिकत नाही,शिकण्याची नैसर्गिक इच्छा आणि कृती होत नाही. यासाठी नेहमी मी एक उदाहरण देतो, ते म्हणजे एका इमारतीतील एका घरच्या खिडकीतून ज्या वेळेला एक १० वर्षाच मुल खाली रस्ता ओलांडनाऱ्या आजोबांकडून रस्ता कसा ओलांडून नये हे शिकतो.ज्या वेळेला रस्ता ओलांडणारे आजोबा रस्त्याच्या एका बाजूनेच बघून रस्ता ओलांडतात आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका सायकल स्वाराला धडकतात.आपल्या घराच्या खिडक्यांतून बघणारा तो दहा वर्षाचा मुलगा रस्ता ओलांडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे हे आजोबांच्या उदाहरणावरून शिकतो. या प्रसंगात आजोबांनी त्या मुलाला काहीही शिकवले नाही किंबहुना आजोबांना हे ही माहितीच नाही की कुणीतरी त्यांना बघत आहे आणि त्यांच्या चुकीमधून शिकत आहे. इथे शिकवण्याची क्रिया झाली नाही पण शिकण्याची क्रिया झाली. मला असं वाटतं शिकणं हे असंच नैसर्गिक आहे त्यामुळे आपण कोणाला शिकवू शकत नाही कुणाला शिकायचं असेल तर मात्र ती व्यक्ती स्वयंप्रेरणेने शिकू शकते. आपण शिकण्याची परिस्थिती निर्माण करून देऊ शकतो अर्थात शिकण्याच वातावरण निर्माण करून सुविधा पुरवणाऱ्या सुलभकाच काम अधिक महत्त्वााचंं आहे.✍️ शैलेश.
shaileshshirsath.blogspot.com
Special Thanks (photo Image Courtesy) Swastik Arora--Pixabay Image Added on December7th 2023
No comments:
Post a Comment