Monday, 12 July 2021

सेतूचा स्वाध्याय होऊ नये म्हणून....


सेतूचा स्वाध्याय होऊ नये म्हणून....
सेतू अभ्यासक्रमाची यशस्वीता ही फक्त शिक्षकावर अवलंबून नसून पालकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे असले तरी  सेतू अभ्याक्रमात शिक्षक केंद्र स्थानी आहे (एकमेव जबाबदार घटक). पालकांच्या आणि विविध समाज घटकाच्या (अभ्यास मित्र,गल्ली मित्र,विविध मंडळ) सहकार्याशिवाय कोविड परिस्थिती हे कठीण आहे आणि फक्त एका आकडेवारीच्या अघोषित  स्पर्धेसाठी कागदावर काम करून भागणार नाही.स्वाध्यायाच्या वेळी केले तसेच यशस्वी (?)कार्य करायचे असल्यास सेतू अभ्यासही एका विशिष्ठ घटकलाच पूर्ण करावा लागेल अर्थात तो घटक विद्यार्थी किंवा पालकच असेल असे नाही...
सेतु अभ्यासक्रमात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची किंबहुना  निर्णायक आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही असे असतानाही सेतु अभ्यासक्रमाच्या  पाठ टाचण नमुन्यात समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुलभाकांचा किंवा पालकांचा उल्लेख नाही हे गंभीर आणि तितकेच हास्यास्पद देखील आहे...


No comments:

Post a Comment