अति लघुकथा
एक्सप्रेस हायवे ने आपल्या स्पोर्ट्स बाईक ने प्रवास करणाऱ्या रोहनला त्याच्या आईने हेल्मेट घालण्यास सांगितल्यावर रोहन म्हणाला "मम्मी किती ग तू निगेटिव मला काही अपघात होणार नाही आणि गाडी वरुन पडून नेमका माझ्या डोक्याला कसा काय मार लागू शकतो ? ही तुझी निगेटिव्हिटी आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि मला हेल्मेट घालण्याची सक्ती करू नकोस"
वरील संवादात मुलगा पॉझिटिव्ह आणि आई निगेटिव आहे की आई प्रॅक्टिकली विचार करते हे प्रत्येक वाचकांनी ठरवावं वरील संवादात आईची काळजी जास्त महत्त्वाची नाही का ?
अति लघुकथा
- शैलेशकमल
shaileshshirsath.blogspot.com
नेहमीप्रमाणेच आटपाट नगर होते त्या नगरात अर्थात एक राजा होता.राजा असल्यामुळे सैन्य, सेनापती, स्तुतीपाठक असा सगळा लवाजमा होता.
गावातीलच आणखी एका किल्ल्यातून खाली उतरण्यासाठी सैनिकांनी दोराने उतरावे किंवा पायऱ्यांची व्यवस्था करावी यावर चर्चा सुरू होती. याबाबतीत सैनिकांचा मत सैनिकांचा कार्यालयीन प्रमुख असणारा सेनापतीला विचारले असता तो सेनापती म्हणाला की, किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली जाण्यासाठी उड्या मारा, उगाच दोराने उतरू नका कारण तुम्ही शूर सरदार आहात त्यावर एका अभ्यासू चिकित्सक सैनिकाने सेनापती या कार्यालयीन प्रमुखाला सांगितले की, त्यामुळे हाता पायाला दुखापत होऊ शकते किंवा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो. त्यावर हुशार सेनापती स्मित हास्य करीत म्हणाला की,"सैनिकांनो नकारात्मकता सोडा सकारात्मक विचार करा. आपल्याला वरिष्ठा कडूनही सकारात्मक वृत्ती चे दाखले दिले जात आहेत आणि आपल्याला सूचना देखील आहेत की सकारात्मकृती ठेवा म्हणून सैनिकांनो असा नकारात्मक विचार का करतात की वरून उडी मारल्यानंतर काही दुखापत होऊ शकते किंवा जीव देखील जाऊ शकतो त्याऐवजी असा विचार करा की वरून उडी मारल्यावर मला काहीही होणार नाही,मी सही सलामत उडी मारून सुखरूप राहू शकतो.
त्यावर आपल्या कार्यालयीन प्रमुख असणाऱ्या सेनापतीची स्तुती करत दुसरा सैनिक म्हणाला,"बरोबर आहे सेनापती साहेब, आपण खूपच बुद्धिमान आहात, शूर आहात आपणच हे प्रात्यक्षिक या कमी समज असणाऱ्या सैनिकांना करून दाखवावे". असे ऐकताच ५६ इंची छाती झालेल्या सेनापतीने अत्यंत सकारात्मक वृत्तीने खाली उडी मारली आणि....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्याची स्वर्गातील उर्वशीचे नृत्य पाहण्याच्या सकारात्मक इच्छेसाठीचे एक पाऊल नव्हे तर अख्खी उडीच सार्थक झाली.
- शैलेशकमल.