समजा एखाद्या रियालिटी शोमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपुर, किशोर कुमार, आशा भोसले, अमित कुमार,उषा उत्थुप , सुरेश वाडकर,अनुराधा पौडवाल, कुमार सानू,अलका याज्ञिक, उदित नारायण,साधना सरगम , चित्रा,कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम, अरिजित सिंह, आतिफ असलम, श्रेया घोषाल यासारख्या आणखी पन्नास गायक-गायिकांनी सहभाग घेतला आणि त्यातून फक्त एकाच विजेत्याला निवडायच असेल तर निवड करणं तर अधिक जिकरीचे होईलच आणि एकाचीच निवड झाल्यानंतर बाकी सर्व स्पर्धेतून बाद होतील, हे कितपत योग्य वाटतं?
परीक्षेतील पास-नापास,गुणानुक्रमांक देखील याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतंय. हा पहिला तो दुसरा तो शेवटचा असा गुणानुक्रमांक आपण ठरवतो परंतु खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना आपण दिलेली परीक्षा आणि तिचे निकष योग्य न्याय देऊ शकतात का ?
कुठल्याही प्रकारच्या गायन स्पर्धेत विजेते नसलेले असंख्य गायक कलाकार आज संगीत क्षेत्रात उत्कृष्टरित्या कार्य करत आहेत आणि प्रचंड लोकप्रिय देखील होत आहेत.त्यांनी तर या गायन स्पर्धेत भाग न घेऊन ती स्पर्धाच नाकारली. आणि स्पर्धेने बाद करून नाकारलेल्या नेहा कक्कर सारख्या गायकांनी स्वतःला सिद्ध देखील केल आहे. एवढच नाही तर ज्या शो ने तिला बाद केलं त्या शो ची ती परीक्षक देखील झाली. या क्षेत्रातील कलाकारांनी स्वतः आपली कलाकृती थेट श्रोत्यांंकडे सादर केली आणि यशस्वीही झाले. गायक कलाकारांनी स्वतःचे दाखवलेले कौशल्य थेट जनमानसापर्यंत व्यक्तिगत अल्बम्सच्या माध्यमातून पोहोचवले,यात कुठल्याही व्यवस्थेचा फालतू पर्यवेक्षनिय हस्तक्षेप किंवा दलाली नाही, म्हणजे डायरेक्ट फॅक्टरी टू कस्टमर असंच... तुमच्याकडे असलेल्या नसलेल्या कागदपत्रांच्या शिक्षणा खेरीज तुम्हाला तुमच्या अंगी असलेल्या गुणांना जोपासून आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर प्रगती करता येते हे ठासून सांगण्याची गरज देखील व्यवस्थेने करावी किंवा ज्याची त्याची त्याला कळावी अर्थात आयुष्याच्या विविध टप्प्यांवर हे त्यांच्या लक्षात येईलही, दुर्दैवानं ज्यांच्या हे लक्षात येणार नाही ते मात्र या गर्तेत पुरते अडकतील.
-✍️ शैलेश शिरसाठ.
Khup chaan
ReplyDelete