आईच्या प्रेमाच उत्कृष्ट उदाहरण असणाऱ्या माझ्या पत्नीस सलाम.
GOD can not go everywhere that is why he created MOTHER
माझी पत्नी,एक ग्रेट आई आहे.सातत्याने आपल्या लेकरांसाठी प्रयत्न करत असते.आपल्या लेकराला प्रेम देऊन कसं घडवता येऊ शकतं आणि त्याच्यातील जगण्याचा न्यूनगंडाविरहित विश्वास कसा सातत्याने कायम ठेवायचा असतो याचे उत्कृष्ट उदाहरण असणाऱ्या माझ्या पत्नीस सलाम.
एक मुलगा असतो त्याला अभ्यासात अजिबात रस नसतो ज्याला फारसे नीट ऐकायला सुद्धा येत नसते एकदा त्याचे शिक्षक त्याच्याकडे एक चिठ्ठी देतात आणि घरी गेल्यावर फक्त आईकडेच देण्यासाठी सांगतात तो मुलगा आईला चिठ्ठी मध्ये काय आहे काय लिहिलं आहे हे विचारतो तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात आणि आई त्याला सांगते की त्याच्या शिक्षकांनी पत्रामध्ये असे लिहिले की," तुमचा मुलगा फार हुशार आहे आमच्याकडे त्याच्यासाठी उत्तम प्रकारचे शिक्षक नाहीत त्यामुळे तुम्ही त्याला घरीच शिकवा" तेव्हापासून त्या मुलाची आई त्याला घरीच शिकवू लागली काही वर्षानंतर जेव्हा तो मुलगा मोठा होतो तेव्हा घरातील कपाटात काहीतरी शोधत असताना त्याच्या हातात एक चिठ्ठी सापडते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही चिठ्ठी त्याच्या लहानपणी त्याच्या शिक्षकाने त्याच्या आईसाठी दिली होती. जेव्हा तो ती चिठ्ठी वाचतो त्यामध्ये असे लिहिलेले असते की," तुमचा मुलगा खूपच मंद आहे त्याला आमचे शिक्षक शिकवू शकत नाही तेव्हा तुम्ही त्याला घरीच शिकवा." हे वाचून तो मुलगा म्हणजे जो आता एक मोठी व्यक्ती झाली होती ते तासन्तास रडले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या डायरीत लिहिले✍️ "थॉमस अल्वा एडिसन एक गतिमंद मूल होते जे आईने शतकाचे अलौकिक बुद्धिमत्ता असणारा व्यक्ती बनवले."✍️
होय मित्रांनो तो मुलगा म्हणजे जगातील महान शास्त्रज्ञ सुप्रसिद्ध संशोधक थॉमस एडिसन ज्याने दिव्याचा शोध लावून संपूर्ण जग प्रकाशात आणलं ज्यांचं नाव संशोधनाचे पिता म्हणून जगासमोर आहे,ज्यांच्या नावावर विश्वातील सर्वाधिक 1094 शोधांच्या नोंदी आहेत.
आई सारखा गुरु जगात नाही.आई आपल्या लेकरांसाठी सतत प्रयत्न करत असते..
विश्वातील सर्व मातांना सलाम.
No comments:
Post a Comment