Saturday, 30 September 2023
Thursday, 7 September 2023
आजोबांचे नातवांना पत्र,सुशिक्षित की केवळ साक्षर
आजोबांचे नातवांना पत्र,
सुशिक्षित की केवळ साक्षर. .
प्रिय नातवंडांनो तुम्ही नेमकं
काय वाचतात,वागतात यावर हे ठरतं की तुम्ही सुशिक्षित की केवळ साक्षर. कारण
सुशिक्षित माणूस विज्ञानाचा प्रचार,प्रसार व अंगीकार करणाऱ्या विवेकवादी विचारांचा
वाहक असतो अस मी व्यक्तिशः मानतो. हजारो वर्षापासून भोळ्या भाबड्या लोकांना खऱ्या
ज्ञानाची, साक्षरतेची कवाडं बंद करणाऱ्या व्यवस्थेला लोकांना साक्षर करायचेच
नव्हते.
माणसाला माणूस म्हणून घडवणाऱ्या तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा
फुले,क्रांतीज्योती सावित्रीआई फुले या सारख्या समाज सुधारकांच्या प्रयत्नांनी लोक
साक्षर होऊ लागले. समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी लोक हळूहळू साक्षर होत असले तरी
साक्षर झालेल्या लोकांनी काय वाचावे याची योजना लोकांना मानसिक,बौद्धिक,वैचारिक
गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेकडे होती. लोकांना हुशार ज्ञानी न होऊ देता कायम गुलाम
बनवून ठेवण्यासाठी अंधश्रद्धा कर्मकांड मोह,लालसा, तसेच भीतीत गुंतवून ठेवण्यासाठी
विज्ञान नाकारणाऱ्या अविवेकी भाकडकथांची, कर्मकांडांनी युक्त असेच ग्रंथ योजले तसेच
मौखिक स्वरूपातही अशाच विज्ञान नाकारणाऱ्या अविवेकी, अतार्किक कथा सांगितल्या.
मानवाला नैसर्गिकरीत्या सर्वसाधारणपणे संगीत आवडते म्हणून अंधश्रद्धा,कर्मकांड आणि
भाकडकथांना संगीताची जोड दिली. लोकांना माणसाला गोष्टी ऐकायला खूप आवडतं आणि त्या
गोष्टींमध्ये चमत्कार असेल रंजकता असेल तर मनोरंजनासाठी का होईना निसर्गतः
प्रत्येकाला ते आवडतं पण त्याला किती खर मानायचं ? की फक्त मनोरंजक म्हणून घ्यायच
हेही महत्त्वाचं आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ज्या व्यवस्थेने वर्ण व्यवस्था,जातीव्यवस्था
निर्माण करून माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले,स्त्रियांचे अधिकार,समता
नाकारून ज्यांचे अधिकार अमान्य केले तेच लोक हे असे ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचत आहेत.
लोकांना भीती,लालसा निर्माण व्हावा यासाठी भाकडकथा रचल्या. कथेत नेमका चमत्कार का
झाला आणि कसा झाला ? याचा वैज्ञानिक आधार कुठलाच नसतो एवढंच काय परंतु या
कर्मकांडांनी युक्त भाकड कथांवर प्रश्नही विचारायचा नसतो त्याचा स्वीकार करा असाच
मंत्र,कारण प्रतिप्रश्न विचारायचा नाही.
नातवंडांनो व्यवस्थेने तुम्हाला शिकण्याचा
अधिकार हजारो वर्षांपासून दिला नव्हता तो तुम्हाला मिळाल्यानंतर ज्या व्यवस्थेने
तुम्हाला शिक्षण नाकारले त्या व्यवस्थेचीच भाकडकथांची पुस्तकं तुम्ही वाचणार असाल
तर मग तुम्ही फक्त साक्षर सुशिक्षित नाहीत हे ध्यानात ठेवा.कारण जे तर्क करायला
लावत, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतं, कुठलाही भेदभाव न करता मानवतावाद पेरत ते
शिक्षण. जे गुलाम बनवत ते शिक्षण कधीही होऊ शकत नाही. तुमची पिढी आमच्या
पिढीपेक्षाही अधिक विज्ञानवादी असली तरी मी तुम्हाला हे का सांगतोय असा प्रश्न
तुम्हाला पडला असेल परंतु लक्षात ठेवा गुलाम बनवणारी व्यवस्था हजारो वर्षापासून
अस्तित्वात आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या युगातही गुलाम
बनवणाऱ्यांची कार्यपद्धतीत आधुनिकता आली आहे फक्त साधनं बदलली आहे पण प्रवृत्ती तीच
आहे. त्यातील गंमत म्हणजे ही व्यवस्था आधुनिक काळात विज्ञानाच्या उपयोगाने
वैज्ञानिक साधनांच्याच वापराने अंधश्रद्धा चमत्कारांचे उदात्तीकरण करून वैज्ञानिक
दृष्टिकोन नाकारत आहे. तेव्हा कायमच सजग रहा केवळ साक्षर म्हणून ओळख न ठेवता
सुशिक्षित अशी ओळख ठेवा,कारण काळ कोणताही असो दुर्जनांच्या क्रियेशीलतेपेक्षा
सज्जनांच्या निष्क्रियतेची जास्त भीती असते. तुम्हा सगळ्यांना साक्षरता दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा... तुमचे आजोबा शैलेश.
Wednesday, 6 September 2023
व्यवस्थेने तुम्हाला शिकण्याचा अधिकार हजारो वर्षांपासून दिला नव्हता तो तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यासारख्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्यानंतर ज्या व्यवस्थेने तुम्हाला शिक्षण नाकारले त्या व्यवस्थेचीच अंधश्रद्धा,कर्मकांडांनी युक्त,वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद नाकारणाऱ्या भाकडकथांची पुस्तकं तुम्ही वाचणार असाल तर मग तुम्ही फक्त साक्षर, सुशिक्षित नाहीतच हे ध्यानात ठेवा.कारण जे तर्क करायला लावतं ते शिक्षण. जे गुलाम बनवत ते शिक्षण कधीही होऊ शकत नाही...
साक्षरता दिन विशेष.
*माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...*✍️
shaileshshirsath.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)