'कभी-कभी मेरे दिल में यह ख्याल आता है'असं लिहून आपल्या कधी न व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल जगप्रसिद्ध शायर, गीतकार आणि कवी साहिल लुधियानवी यांनी लिहिलेलं गीतही आठवलं.
पण त्यासोबतच आठवलं जावेद अख्तर यांनी लिहिलेलं सिलसिला चित्रपटातील 'ये कहा आ गये हम यूं ही साथ साथ चलते ' हे गीत,जे मला चित्रपटाच्या कथानकासोबतच साहीर लुधियानवी यांच्या 'अमृता'समान आयुष्य च्या'प्रीतम' अनुभवांशी सुसंगत वाटत.....
# शैलेशकमल
मनोरंजनाचा भाग म्हणून आपणही त्या गीताचा आस्वाद घ्यावा
सर्वोत्कृष्ट कलाकार असणारे दोन्ही कलाकार मला व्यक्तिशः यात फारसा अभिनय करताना दिसले नाही हे विशेष 👇
Courtesy and Thanks to YRF
Wednesday, 22 May 2024
आपण निरक्षर, सुशिक्षित की केवळ साक्षर?
तुम्ही दोन्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि नेमकं काय स्वीकारायचं ते ठरवा.🙏
गौतम बुद्धांचा करुणामय विवेकवाद जो कार्य सिद्धांत स्पष्ट करतो.👇
Friday, 10 May 2024
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या माझ्या दोन्ही लेकरांना शुभेच्छा
आणि शुभाशीष.
दीदी तुझी शाळेत ऍडमिशन अजून झाली नव्हती आणि मी तुला शाळेत आणल त्यावेळेला एक गीत सुरू होतं आणि तू मान डोलवत होती,खूप खुश होती तू तुला माहितीये ते गाणं कोणतं होतं ? ते गाणं होतं सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा..
त्यातील पुढील ओळी आजच्या संदर्भाने खूप महत्त्वाच्या आहेत,त्या अशा की,मज़हब नही सिखाता आपस मे बैर रखना...
तुला तुझ्या भावाप्रमाणेच मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
कदाचित याचं तुला फार विशेष वाटणार नाही परंतु
अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 123 वर्षं लागली. ब्रिटनमधल्या महिलांना हा हक्क मिळायला 100 वर्षं वाट पाहावी लागली.स्वित्झर्लंडच्या काही भागात महिलांना मत देण्याचा अधिकार आपल्या नंतर खूप उशिरा 1974 साली मिळाला.सौदी अरेबियात महिलांना मतदानाचा अधिकार तेथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत 2015 ला मिळाला.
याउलट भारतीय महिलांना देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यादिवशीच मतदानाचा अधिकार मिळाला.1950 मध्ये आपल्या भारताला स्वत:ची राज्यघटना मिळाली धार्मिक आणि जातीय भेदभाव तसेच स्त्री-पुरुष असा भेदभाव नाकारून आणि लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांना मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या तात्कालीन नेतृत्वांच्या प्रयत्नातून मिळाला. स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित, वर्णव्यवस्थेवर आधारित किंवा जातीय आणि आणि धार्मिक भेदभाव न ठेवता सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार बहाल करून लोकशाहीचा विचार 1951 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच झाला होता याची तुला मुद्दाम आठवण करून देत आहे.
अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे. प्रचंड विविधता असल्यामुळे देशात संसदीय लोकशाही सर्वांना योग्य न्याय देऊ शकली.फुले, शाहू,आंबेडकर,राजाराम मोहन रॉय यांच्या सारख्या सामाजिक नेतृत्वामुळे आणि महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,लालबहादूर शास्त्री यासारख्या राजकीय नेतृत्वांच्या समतावादी पायाभरणीमुळे आज आपली मजल जगातील सर्वाधिक विविधता असलेले आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र अशी झाली आहे.म्हणूनच देशाच्या धर्म,जाती,पंथ,प्रांत,भाषा,भौगोलिक विविधता जोपासत संसदीय लोकशाही अधिक बळकट करायची आहे.
जगात आपली ओळख Unity in Diversity अर्थात 'अनेकता में
एकता '( हैं हिंद की विशेषता) अशी आहे.
ती तशीच अबाधित ठेवू या.बागेत एकाच प्रकारची फुलं असावीत हा अट्टाहास कशासाठी ? सर्व फुले झाडांनी समृद्ध वन जोपासली पाहिजे नाहीतर विष वृक्ष वाढू शकतात.
आता हे आपण ठरवायचं की आपण आपल्या शेजारच्या धर्मांध राष्ट्रासारखं एकाच प्रकारचे फुल असाव, कुंडीतलं बॉन्साय (bonsai) सारखं वाढ खुंटलेल एकच प्रकारचं रोपट हव की,विविध फळाफुलांनी भरलेली सुंदर बाग...✍️
आज सहजच एक काव्य आठवल.
*नफरत का विषवृक्ष.*
माना के इस विष वृक्ष को तुमने नही लगाया, लेकिन कुछ लोग इसे लगा रहे थे तब खामोश रहे तुम l
माना के इस विश्व वृक्ष को तुमने नहीं सींचा लेकिन कुछ लोग इसे सींच रहे थे तब चुपचाप रहे तुम और आज जब इसका हर फल हलाहल उगल रहा है तो क्यों चिख रहे हो..
क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है...?
- अनामिक
आज अक्षय तृतीया आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून त्यांनी टिकवलेल्या एकात्मतेच्या पुरणाच्या गोड पोळ्या वैचारिक घास आगरीत पुरवूया..
तुम्हाला पहिल्यावहिल्या मतदानासाठी आणि भारतीय 'संसदीय लोकशाही' अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नासाठी शुभेच्छा.
तुमचे पप्पा
Courtesy and Thanks to Quora and Pixabay
Courtesy- Thanks to shemaroo Filmi Gane
Wednesday, 1 May 2024
जि. प.उच्च प्राथमिक शाळा शेरी.
सुट्टीतील हसत खेळत शिकू इंग्रजी
शब्दांचा खेळ खेळण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा. 👇