Tuesday, 15 October 2024

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे जागतिक अन्न दिवस साजरा 

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे 16 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील यांनी भूषविले.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु. दिव्या कुमावत यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अन्न सुरक्षा आणि पोषणाविषयी माहिती देऊन करण्यात आली. यावेळी शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्व तसेच अन्नाची नासाडी टाळण्याचे महत्व पटवून दिले. अन्ना खाण्याची योग्य पद्धत आणि पोषणतत्वांबाबत श्रीमती वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अन्नाचे महत्व आणि पोषण यावर भाषणे केली.

 मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अन्न हे जीवनाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांनी मुलांना नियमित आणि संतुलित आहाराचे महत्व पटवून दिले व अन्नाची किंमत समजून घेण्याचे आवाहन केले. 
 शेवटी, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून अन्नाची नासाडी कशी टाळावी यावर शपथ घेतली. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने शाळेत अन्न विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्नाबद्दल आदर निर्माण झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment