पुण्यात शिकणं म्हणजे पुण्यात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे.
आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं पसंत का करतो ? याची अनेक कारणं असली तरी आपल्याला आणि आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो,परंतु असे असले तरी शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपल्या कडून घेतला जात नाही ना? याचााही विचार व्हावा.
विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक, कृषी आणि इतर व्यवसायाशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम, प्रदर्शने दाखवा. दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की दाखवा...
✍
आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा, प्रदर्शनांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. ग्रामीण भागातल्या लोकांना विविध कार्यक्रम तसेच प्रदर्शनाबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा इच्छा असून देखील बऱ्याचदा शहरातील कार्यक्रमांचा आणि प्रदर्शनांचा लाभ घेणं खूप सोपं आणि सहज नसतं.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ एकलव्य क्रीडा संकुल एम जे कॉलेज कॅम्पस जळगाव येथे आयोजित केलेले आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फेेेे आयोजित ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन जळगाव येथे छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.
आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे. आपण स्वतः आपल्या परिवारासह कृषी प्रदर्शन तसेच नाट्य स्पर्धेचा लाभ घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.✍आपलाही
शैलेश शिरसाठ.
कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी बारामतीची भेळ बारामती चार्ट सेंटरवर आहे तिचा आस्वाद नक्की घ्या. लक्षात ठेवा ती बारामतीची भेळ आहे.
No comments:
Post a Comment