Tuesday, 26 November 2024

 संविधान दिन कार्यक्रमाचा अहवाल.

दिनांक: 26 नोव्हेंबर 2024

स्थळ: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव

26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रेेमलाल डिगंबर पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्री.विश्वास पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली.

शिक्षिका सौ. वंदना पाटील यांनी संविधानातील पायाभूत मूल्ये – स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करण्याचे व नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात  विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अभिमान निर्माण झाला.

मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संविधानाच्या तत्वांना जीवनात कसे अमलात आणायचे याबाबत मार्गदर्शन केले. श्री. भटू पाटील सरांनी संविधान दिनाच्या निमित्ताने देशाच्या एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु.दिव्या बेलदार यांनी  केले.



No comments:

Post a Comment