Monday, 24 February 2025

 मराठीतील बाण वर्मी लागणं, शाल जोडीत लगावणे आणि घरचा आहेर मिळणं या वाक्यप्रचारांच यथार्थ उदाहरण माझ्यासारख्या कुठलीही झुल न पंघरलेल्या विवेकी, समतावादी माणसाला सध्या पहावयास आणि ऐकण्यास मिळत आहे,निमित्त आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुकुटमनी अख्ख विद्रोही साहित्य संमेलन बोलत असल्याचा अनुभव मला आला.

मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत ऐकलेल्या सर्वोच्च भाषणांपैकी एक भाषण म्हणून तारा भवाळकरांच्या भाषणांचा उल्लेख करेल. आपण नक्की नक्की ऐका..✍️









Wednesday, 19 February 2025

म्हणून संविधान जागर....

याच प्रकारे जगाने सन्मानित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याच देशात काळाराम मंदिरत प्रवेश नाकारला होता या खेरीज महाड येथील तळ्याचे पाणी पिण्याचा अधिकार ढोरांना, पशुपक्ष्यांना किड्या मुंग्यांना होता परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि दलित,शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींना नव्हता तेव्हा चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळा राम मंदिराचा सत्याग्रह  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अशा प्रकारची बंदी होती, आंबेडकरांना देखील बंदी होती आणि आता छत्रपतींच्या वारसदार असणाऱ्या संयोगिताराजे भोसले यांना देखील बंदी घातली गेली... फरक एवढाच आहे की जो धर्म आम्हाला स्वीकारत नाही तो माणसाला माणूस म्हणून वागणूक न देणारा भेदाभेद करणारा धर्मच मी देखील स्वीकारत नाही असं म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  करुणामयी,समतावादी न्यायवादी आणि माणसा माणसात भेद न करणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला.


सध्या संविधान जागर कार्यक्रम घेत आहोत कारण भारतीय संविधान जात,पंथ,धर्म,लिंग,वर्ण असा कुठलाही भेदभाव न करता सर्व नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून एक माणूस म्हणून जगण्याचं संरक्षण देत. तुम्ही देखील संधी मिळाल्यावर भारतीय संविधानावर बोला कारण आयुष्य खूप छोट आहे आणि माणसाचा जगण्याचा अधिकार खूप मोठा आणि निरंतर आहे. आपल्या गेल्यानंतर देखील या सृष्टीवर अनेक वर्ष माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्नांचा भाग होऊया....✍️

- शैलेश 




Saturday, 15 February 2025

शिक्षणातील जगद्गुरु संत तुकोबारायांचे कार्य.

 आज पुन्हा चेंगराचेंगरीची बातमी वृत्तपत्रात वाचली. आणि पुन्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्या आठवल्या.

उपकारासाटी बोलो हे उपाय | येणेविण काय आम्हा चाड ? ||१||

बुडता हे जन न देखवे डोळां | येतो कळवळा म्हणउनि ||२||

तुका म्हणे माझे देखतिल डोळे | भोग देते वेळे येईल कळो ||३||

वारकरी संप्रदायातील संतांनी जनकल्याणाच्या उद्देशाने कार्य केले आहे संत तुकोबा राय हे यास अपवाद नाहीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले सर्व अभंग लोकशिक्षणासाठी अत्यंत उपयोगी आहे. ज्यांचे महत्त्व आजही आहे आणि उद्याही राहणार. 

तुकोबाराय आपल्या अभंगातून म्हणतात की मी जे काही सांगतोय ते अभंगाच्या कीर्तनाच्या माध्यमातून जो उद्देश करतोय जे मार्गदर्शन करतोय ते सर्वांच्या कल्याणासाठी आहे ते तसे नसते तर मला किर्तन,अभंग,कथा यातून तुम्हाला उपदेश करण्याची गरज काय होती.संत तुकाराम महाराज हेही सांगतात की अज्ञानामुळे,अंधश्रद्धेमुळे हे जग बुडत आहे म्हणजेच वाईट मार्गाकडे वाटचाल करत आहे.नको त्या मार्गाने हे जग, लोक वाटचाल करत आहे आणि हे सारं मला पहावत नाही माझ्या डोळ्याला बघवत नाही म्हणून मला या लोकांचा कळवळा येतो. 

अभंगाच्या शेवटच्या कडव्यात तुकोबाराय उद्वेगाने म्हणतात की जर तुम्ही माझे बोलणे मनावर नाही घेतले आणि मी सांगितलेला संदेश आचरणात नाही आणला तर माझ्या डोळ्यात देखत तुम्हाला तुमच्या चुकीच्या कृत्यांचे तुमच्या करणीचे पापाचे भोग भोगावे लागतील तुकोबारायांनी जनकल्याणासाठी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी,विज्ञानवाद, प्रयत्नवाद रुजवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या प्रचार, प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले होते त्यांच्या कार्याचा उद्देश देखील या अभंगातून स्पष्ट होतो.

ज्या लोकांच्या मनात इतरांविषयी कळवळा असतो आणि त्यांचं हित व्हावं अशी उत्कट इच्छा असते, ते लोक इतरांना जगण्याची योग्य वाट दाखवितात. असं करण्यामागं त्यांचा काही स्वार्थ नसतो. ते केवळ करुणेपोटीच लोकांना उपदेश करत असतात. अशा प्रकारच्या उपदेशाविषयी तुकारामांनी अनेक अभंग लिहिले आहेत.

Friday, 14 February 2025

 बिस्किट पाण्याच्या ग्लासात दहा सेकंदापेक्षा जास्त तरंगत नाही परंतु जर पाण्यात इनो किंवा सोडा टाकला आणि त्यानंतर बिस्किटला पाण्यावर तरंगताना ठेवलं तर ते का तरंगते..?

असे का होते..?

बिस्किट पाण्याच्या ग्लासात दहा सेकंदांपेक्षा जास्त तरंगत नाही कारण बिस्किटामध्ये असलेले घटक (जसे की पीठ, साखर, इ.) पाण्यात भिजतात आणि त्याचे वजन वाढते, त्यामुळे ते बुडते. परंतु जेव्हा पाण्यात इनो किंवा सोडा टाकला जातो, तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साइडच्या गॅसाचे लहान बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे बिस्किटाच्या पृष्ठभागावर चिकटतात, त्यामुळे बिस्किट हलके होते आणि त्याला पाण्यावर तरंगायला मदत करतात.

सोडा किंवा इनोमुळे तयार होणाऱ्या या गॅसामुळे बिस्किटाला पाण्यातून बाहेर ढकलले जाते आणि त्यामुळे ते अधिक वेळ तरंगू शकते.




Thursday, 13 February 2025

 ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR), अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे.

आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे.

आपल्या देशात रेडिओ प्रसारणाबाबतच्या प्रयोगाची सुरुवात १९१५ साली सुरू झाली होती. बीबीसी प्रमाणेच इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन स्थापन केले आणि त्यासाठी मुंबई हे केंद्र ठेवले. असे असले तरी याची सुरुवात चेन्नई येथे एका खाजगी संस्थेने केली ते वर्ष होते १९२४. 

भारतात ऑल इंडिया रेडिओ ची स्थापना १९३६ ला झाली.

भारत स्वातंत्र्यानंतर १९५७ साली सुप्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवल्याप्रमाणे ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण झाले. 

शिक्षणात आणि एकूणच समाज शिक्षणात आकाशवाणीच महत्त्वाच कार्य आपल्या देशात आहे. 

आज जागतिक रेडिओ दिवस त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. 

शैलेश शिरसाठ(कॅज्युअल रेडिओ अनाउन्सर)

नैमित्तिक आकाशवाणी उद्घोषक

 ऑल इंडिया रेडिओ.


 होय तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.

धूम्रपान निषेधाचा संदेश मान्य करत तिने

 कुंभकर्णी मेळेतील गांजाने भरलेल्या चिलमीचा मात्र

 श्रद्धेने स्वीकार केलाय.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.


 तिचं सत्य नावाने असत्य कथांच पारायण

अन् माझ्या चिकित्सक प्रश्नांपासून तिचं पलायन झालय.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.


माझं जग विज्ञानावर आणि 

तिच जग शेषनागावर आहे.

तिच्या पुस्तकात शेषनागावरील जग तरल्याचा निकष

अन् माझ्या पुस्तकात 'कोपर्निकस' आहे.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.


द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या 

एकलव्यांच्या देशात सहजच काही होत नाही, 

आणि म्हणूनच ब्रेकअप आहे.


जन्मानं मिळालेला धर्मासाठी तिच्या डोक्यात युद्ध 

अन् माझ्या मेंदूत बुद्ध आहे.

होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय. 

- शैलेश शिरसाठ 



माझ्या कल्पनेतल्या चित्राला, संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात मदत करणाऱ्या Imagine ॲपचे आभार.

Courtesy- Imagine 

Sunday, 9 February 2025

आम्ही सेफ टेकऑफ केले आहे आता आम्हाला सेफ लँडिंग करू द्या..

आम्ही सेफ टेकऑफ केले आहे आता आम्हाला सेफ लँडिंग करू द्या.. 
Supervision OR Support vision.

 सर्व प्रवाशांना घेऊन वैमानिकाने (पायलटने) अडथळ्यांवर मात करत अतिशय सेफ आणि स्मूथ टेकऑफ केलेले होते... 
परंतु इच्छित स्थळी सेफ लँडिंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे त्याने जमिनीवरील अधिकाऱ्यांना त्याच्या लँडिंगसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून संपर्क साधला. "सर माझ्याकडे पुढील वीस मिनिट पुरू शकेल एवढाच इंधन साठा आहे कृपया मला लँडिंगसाठी जागा उपलब्ध करून द्या आणि कृपया मार्गदर्शन करा." त्याला मार्गदर्शन करणारा अधिकारी मात्र त्याला तो उडवत असलेल्या विमानाबद्दल तसेच प्रवाशांबद्दल माहिती विचारू लागला जसे की तू टेकऑफ केलेल्या विमानाच्या इंजिनाची क्षमता किती आहे ?, विमानाचे नेमके टेक्निकल स्पेसिफिकेशन काय ? त्याचप्रमाणे प्रवाशांमध्ये वर्गवारी कशा प्रकारची आहे ? त्या प्रवाशांच्या नावाची यादी वगैरे वगैरे. 

पायलट अधिकाऱ्याकडून सेफ लँडिंगसाठी मार्गदर्शनाची विनंती करत होता.पण अधिकारी मात्र त्याला ओरडून म्हणाला,"तू मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस मी सांगतो तेवढी माहिती मला आत्ताच्या आत्ता सांग." पायलट चे पाय लटलट करू लागले त्याला भीती वाटू लागली की बहुदा आता विमान क्रॅश होणार आणि आपल्या सकट प्रवासी देखील क्रॅश होणार.. आणि विमान जमिनीवर क्रॅश होऊ लागले.. मोठा आवाज झाला आणि मी मोठ्याने ओरडलो "वाचवा.." मी देखील सोफ्यावरून खाली फेकले गेलो कारण मी सोफ्यावर झोपलो होतो आणि मला हे स्वप्न पडलं होतं.

 मी आईला स्वप्न सांगितलं आई म्हणाली, "अरे तू शिक्षक आहेस पायलट नाही, पण काल तुझ्या बाबांसोबत गप्पा मारत असताना तुझ्या बाबांनी तुला सांगितलं की शिक्षकाचे काम देखील पायलटासारखाच असतं. तू त्याचा विचार केला असशील म्हणून कदाचित तुला असं स्वप्न पडलं असेल. तू प्रथम असा विचार करणं सोड नाहीतर असाच असर होईल असं म्हणून आई-बाबा हसू लागले पण मी सुन्न झालो होतो.✍️




Thursday, 6 February 2025

It is increasingly common nowadays for children aged two and a half to three years to be enrolled in pre-school classes. It is crucial for all stakeholders involved in the direct and indirect upbringing of the child (including parents and society) to understand one important thing: are we imposing academic activities (such as studying) on a three-year-old child in the name of school preparation?

The purpose of enrolling children in these classes is related to their nourishment, health, and understanding of the environment, which will naturally develop through play and fun. However, some parents, without understanding the true purpose, insist on giving children delicate tools like pencils and pens, pressuring them to write. Is it appropriate to insist on school preparation like this without considering the proper age for physical (fine motor skills) and mental development?

If establishing a system within the family is not possible, or if school preparation is voluntarily undertaken, it should be done with consideration for the child’s natural movements and nourishment. What kind of effort is this to prepare a three- to four-year-old child for the cutthroat competition in future education? In reality, this is a time for children to develop and be nurtured in a playful and joyful manner with their family members, including parents, grandparents, uncles, aunts, and siblings.

With the industrial revolution, increasing urbanization, and rapidly growing populations, the joint family system (extended family) has become increasingly rare. Unlike in the past, when joint families included grandparents, uncles, and aunts, the absence of such extended families now means there are fewer older family members available to watch over young children or play with them. In nuclear families, where both parents may not always have enough time to spend with their children, parents often turn to alternatives such as daycare or pre-school preparation programs.

If, due to various challenges, some parents are unable to devote time to their children from an early age, when those children grow up and their parents grow old, the children might also be unable to spend time with their elderly parents. As a result, they may seek a senior care facility for them. Just as a daycare serves as a facility for young children, remember that a senior care facility can serve a similar purpose for your elderly parents. Due to the intense pressure of education, children may feel that their childhood, which should have been carefree and joyful, has instead been filled with stress.

We, too, were enrolled in school only after we turned five or six. Until then, we spent our time at home with our grandmother, playing in the dirt, mud, and sand with all our siblings.

Shailesh Shirsath,India.


My Video of December 2022






Tuesday, 4 February 2025

जगाला प्रांतीयवादाचे आणि कट्टरवादाचे डोहाळे लागले आहेत का ?

 जगाला प्रांतीयवादाचे आणि कट्टरवादाचे डोहाळे लागले आहेत का ? असा प्रश्न हल्ली निर्माण होतो,अशा प्रकारचे डोहाळे हे विध्वंसाला जन्म देणारे होऊ शकतात.

जगात वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या आगी आणि वनवे हे केवळ भौतिकच नाही तर द्वेष, इर्षेचेदेखील आहेत. साम्राज्यवादाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक राष्ट्राला क्रमांक एक ची महासत्ता व्हायचे आहे..

जगाला भगवान गौतम बुद्धांच्या विश्वशांतीच्या मानवतावादी‌ करुणामयी विचारांची नितांत आवश्यकता आहे. बुद्धांचा विचार जगाला विध्वंसापासून  वाचवू शकेल.कारण जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.



प्रिय नातवांनो मी हे पत्र लिहायची सुरुवात 2024 वर्षाच्या शेवटी करत असलो तरी हे पत्र 2025 च्या सुरुवाती लिहून पूर्ण झाले आहे.

आपल्या देशातील बांधव जेव्हा इतर देशात जातात आणि आपले सण उत्सव तेथे साजरे केल्याचे फोटो, व्हिडिओ पाठवतात त्यावेळेला आपल्याला खूप अभिमान वाटतो. परंतु असंच जर इतर देशातील लोकांनी आपल्या देशात येऊन त्यांचे सण उत्सव साजरे केले तर आपल्याला ते आपल्यावरील आक्रमण वाटतं एवढंच काय पण परकीय लोकांनी आपल्या देशात येऊन जरी त्यांचे सण साजरे केले नाही आणि आपल्याच देशातील लोकांनी इतर देशातील सण साजरे केले तरीदेखील आपल्याला ते आक्रमणाच वाटते. अर्थात हे सर्वांना वाटते असं नाही परंतु असं वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या लोकांची संख्या आपल्या देशाबरोबरच जगातील प्रत्येक देशात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांश देशातील आक्रमक सांस्कृतिकवाद, प्रांतीयवाद आणि अस्मितेच्या नावाखाली स्वतःच्या संस्कृतीला सर्वोच्च संस्कृती म्हणून इतरांबद्दल द्वेषाची भावना जगातील बहुसंख्य लोकांना वाटू लागली आहे आणि म्हणूनच त्या त्या देशांमध्ये तशा आक्रमक राष्ट्रवादाची पेरणी देखील होत आहे. जे देश अशी भूमिका घेत नाही त्यांच्यावर देखील आता आक्रमकतेचा प्रभाव पडण्याची भीती वाटत आहे.

जगाने आपली संस्कृती स्वीकारावी किंबहुना त्याचा आदर बाळगावा असं वाटत असताना आपणही इतरांच्या संस्कृतीचा आदर बाळगलाच पाहिजे.

आपण आजही जगात कुठल्याही विचारमंचावर गेल्यावर अभिमानाने हे सांगतो की आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो आहे. आपण आपली ओळख अशी देत असल्यामुळे आपल्याबद्दल अधिक आश्वासकता जगाला वाटतं कारण बुद्धांचा विचार म्हणजे विवेकी विचार जो मानवतावादाच्या करुणामय नजरेतून जगाला विश्वबंधुत्व सांगतो.

तुम्ही हे पत्र वाचत असताना संपूर्ण जगभरात काय परिस्थिती आहे हे आत्ताच नक्की सांगता येणार नाही परंतु विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे हे मात्र तेवढेच खर.

Let's hope for a world without borders and wars.