Tuesday, 1 July 2025

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडली येथे वसंतराव नाईक जयंती,कृषी दिन कार्यक्रम उत्साहात साजरा.

स्थळ: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडली, केंद्र चांदसर, ता. धरणगाव, जि. जळगाव

दिनांक:१ जुलै २०२५

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडली येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच श्री गजानन पाटील होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ सर यांनी विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक यांचे जीवनकार्य, विशेषतः त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले योगदान याविषयी माहिती दिली. त्यांनी कृषी दिनाचे महत्त्व स्पष्ट करून, विद्यार्थ्यांना शेतीचे आणि शेती व्यवसायाचे महत्त्व सांगितले. याखेरीज डॉक्टर्स दिनाचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना सांगितले.

या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. गजानन पाटील, ग्रामसेवक श्री. शामकांत पाटील, शिपाई श्री. भिका महारु सपकाळे, बचत गट प्रतिनिधी सौ.ज्योती सोनवणे तसेच ग्रामस्थ नामदेव अमरसिंग सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला.



No comments:

Post a Comment