आद्य शिवचरित्रकार महात्मा जोतीराव फुले विस्मृतीत गेलेला इतिहास आणि सत्याचा शोध. 🚩छत्रपती शिवाजी महाराज...! हे नाव घेताच प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून येते. आज त्यांच्या नावावर अनेक संघटना, पक्ष आणि प्रतिष्ठाने कार्यरत आहेत. परंतु, आजपासून दीडशे वर्षांपूर्वीचे चित्र याच्या नेमकं उलट होतं. ज्या राष्ट्रपुरुषाने स्वराज्य निर्माण केले, त्यांचे कार्य काळाच्या ओघात विस्मृतीत गेले होते. अशा कठीण काळात शिवरायांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचे आणि त्यांचे पहिले चरित्र लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा जोतीराव फुले यांनी केले. मराठी देवनागरी छापखाना १८०६ मध्ये सुरू झाला. तेव्हापासूनचा इतिहास पाहिला तर शिवरायांवरचे पहिले स्वतंत्र पुस्तक १८६९ मध्ये प्रसिद्ध झाले, ज्याचे लेखक महात्मा फुले होते. मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक पुण्यात स्वतः जोतीरावांच्या वेताळ पेठेतील (सध्याची महात्मा फुले पेठ) दुकानात अवघ्या सहा आण्यांत विक्रीला उपलब्ध होते. जोतीरावांनी या पोवाड्यात महाराजांना 'कुळवाडीभूषण' (शेतकऱ्यांचा मानबिंदू) म्हणून गौरवले.सुमारे एक हजार ओळींच्या या प्रदीर्घ पोवाड्यात त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या रयतेप्रती असलेल्या प्रेमाचे रसरशीत वर्णन केले आहे. ते लिहितात:
अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी!१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी!२!"
शिवराय हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नसून ते 'देशासाठी' लढणारे लोकनेते होते, हे सांगणारे पहिले महात्मा फुले होते.
आज शिवरायांवर अनेक ललित आणि ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला शिवरायांचा खरा वारसा आणि त्यांच्या कार्याची मुळे शोधायची असतील, तर खालील चार शिवचरित्रं वाचणे.
प्रत्येक विचारी माणसाने वाचावीत अशी ४ महत्त्वाची शिवचरित्रं:
१. महात्मा जोतीराव फुले ✍️
२. कृ. अ. केळुसकर 📚
३. दि. वि. काळे 📖
४. सेतुमाधवराव पगडी 📜
सत्याचा शोध घेणं हेच खरं शिवप्रेम आहे. अफवांच्या 'विषाणूंपासून' सावध राहा आणि मूळ ग्रंथ वाचा!
🚩जय शिवराय!जय जोतिबा 🚩
