श्वासातलं अंतर....
मृत्यूशय्येवर असलेल्या लेकराची जन्मदात्याला आर्त हाक.
ll श्वासातलं अंतर. ll
रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा, लळा माझा वाढतोय..
पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय..
आईचं शहाणा बाळ म्हणताना पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय.. उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय.. पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय..
श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन् इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं डोळे भरून पाहायचयं... पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
कळी उमलून कस होतं फुल, रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय
पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट, आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय,आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय.. पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय....
एवढं सारं बोलून दम लागतोय अन् मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय.. पप्पा तुम्हांला माझ्या दोन श्वासातलं अंतर वाढवायचंय...
तुमचाच छकुला
तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा मलाही जगवतेय होते म्हणून तर तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय.... तुझेच पप्पा शैलेश शिरसाठ. ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू) ©
No comments:
Post a Comment