Tuesday, 20 April 2021

हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना समर्पित ' श्वासातल अंतर

 *“ जानते हो दुनिया का सबसे बडा बोझ क्या होता है...बाप के कंधोपर बेटे का जनाजा ....”*

 रमेश सिप्पी यांच्या गाजलेला शोले या चित्रपटातील हा संवाद. हा फक्त एक संवाद नव्हे तर एका बापाची खंत आहे. हीच खंत,हाताशा काल दिवसभर अस्वस्थ करत होती...

*साधारण अकरा वर्षापूर्वी मी लिहिलेली 'श्वासातल अंतर ' ही कविता पुन्हा डोळ्यासमोर आली आणि मग ती एवढ्या वर्षात पहिल्यांदा आपल्या सर्वांसोबत शेअर केली...*

सध्या येणारा प्रत्येक दिवस काही अप्रिय घटना घेऊन येणारा झालाय. तसाच कालचा दिवस होता, *सध्या मी ज्या तालुक्यात आहे  त्या धरणगाव तालुक्यासाठी अत्यंत दुःखद होता.*

'आपली माणसं *न सांगता सवरता आपल्यातून निघून जातात अशी खंत ' आपल्या अप्रतिम काव्यातून  शिक्षिका भगिनी जयश्रीताई काळवीट यांनी काल व्यक्त केली...*✍️

आपण सारेच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या परिवारांस सोबत आहोत.

काल संपुर्ण दिवसभर आणि आजही आपण सर्वांनी माझ्या कवितेला साद आणि दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.🙏

*परमेश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारं कुण्या एका शायराने खूप मार्मिक लिहिलंय तो म्हणतो,... ए खुदा अगर यह सच है दिलों के दिलों की मोहब्बत में तू बसता है,  तो क्यों टूट जाते हैं दिल और तेरा वजूद बिखर जाता है.....*

*हुरहुर लावून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व लेकरांना  समर्पित ' श्वासातल अंतर'*

             माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून '...श्वासातला अंतर.... मृत्यूशय्येवर असलेल्या चिमुकल्याची जन्मदात्याला आर्त हाक..... श्वासातला अंतर. रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी श्वास गुदमरतोय आणि बागेतल्या फुलांसोबत बघा लढा माझा वाढतोय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... आईचं शहाणा बाळ म्हणताना पाणावलेले डोळे अस्वस्थ करताय.. उगवणारा प्रत्येक सुर्य जगण्यासाठी खुणावतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ अन् इंद्रधनुष्याचे आभाळातून रंग उधळणं डोळे भरून पाहायचय... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... कळी उमलून कसा होतं फुल रात्रीतन गवतावर कसे येतात दव आणि आपल्या अंगणातलं पिंपळाचे रोप झाड होताना बघायचंय.... बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचंय .... डिजिटलच्या नव्या युगात आजीची गोष्ट आजोबांसोबतच खेळणं, दीदीचा हसणं डाउनलोड करायचंय आईचं रडणं कायमच डिलीट करायचंय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातल अंतर वाढवायचंय .... एवढे सारं बोलून दम लागतोय अन् मरणाच्या वाटेवर जगण्याचा फाटा एक दिसतोय.. बाबा तुम्हाला माझ्या दोन श्वासातला अंतर वाढवायचे... तुमचाच छकुला तुझ्या डोळ्यातील जगण्याची अभिलाषा मलाही जगवतेयम्हणून तर तुझ्या प्रत्येक श्वासामुळेच माझाही हृदय धडधडतय. तुझाच बाबा शैलेश शिरसाठ. ८ ऑक्टोबर २००७ (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतू)

              शैलेश शिरसाठ.(७३०४०८०१००)

No comments:

Post a Comment