
✍️....
निसर्गाची व मानवतेचे हानी करणाऱ्या व्यवसायाशिवाय इतर कुठलाही व्यवसायाला आपण अस्वच्छ व्यवसाय असा उल्लेख कसा करू शकतो ?🤔
ज्यांचे पालक अस्वच्छ व्यवसायत काम करतात अश्या पालकांच्या मुलांची शिष्यवृत्ती संदर्भातील कार्यालयीन कामकाजासाठी माहिती मागवली जाते.आपण प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मान राखला पाहिजे आणि अस्वच्छ व्यवसाय असा उल्लेख नको करायला,याउलट पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वच्छतेचं महान सेवाकार्य करणाऱ्या बांधवांचा उल्लेख ' स्वच्छतारक्षक किंवा स्वच्छतादूत ' असा होणे गरजेचे आहे. ✍️
आपल्या संस्कृतीत व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कार त्याच्यावर होत असतात अंतिम संस्कार हा त्यापैकीच एक. अंत्यविधीतील अग्निसंस्कार आज करायला मिळणं हे भाग्याचं, पुण्याचं काम समजलं जातं. कोरोणाच्या महामारीत मृत्यू झालेल्या रुग्णांचे अग्नी संस्कार स्वच्छता सेवेतील आरोग्यदूत आणि आरोग्य कर्मचारी करित आहे. मृत झालेल्या व्यक्तीशी रक्ताचं नातं नसतांनाही माणुसकीच नातं जपत हे महान राष्ट्रीय सेवा कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छता आणि आरोग्य कर्मचारी करीत आहे.त्यांचा कार्याला सलाम.
प्रत्येक व्यवसायाची, कामाची आपली एक प्रतिष्ठा असते त्याचा उचित सन्मान होणे आवश्यक आहे.म्हणून अस्वच्छ व्यवसाय किंवा अस्वच्छ शिष्यवृत्ती असा उल्लेख नसावा.
कारण संविधानाचे फक्त वाचन करून चालणार नाही संविधानाच्या शब्दांची जगण्याची मानवतावादी व्याप्ती समजवून घेऊन आचरण करणे गरज आहे.
दर्जाची समानता-संविधानाच्या उद्देशिकेमधील दर्जाची समानता याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच आहे ते अंगीकारणे.
प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था. कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही.
या बरोबरच व्यक्तीची प्रतिष्ठा याचाही नेमका अर्थ काय हे जाणून घेणे ते अंगीकारणे अत्यंत महत्वाचं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा याचा अर्थ
नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ असा मानवतावादी आहे.
(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून)
✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव.
No comments:
Post a Comment