Use Resources of the city.
आमची मुलं मुंबई-पुण्यात शकतात याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील रिसोर्सेस किती उपयोगात आणतात या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.पुण्यात शिकणं म्हणजे पुण्यात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे...✍
आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं पसंत का करतो ? याची अनेक कारणं असली तरी आपल्याला आणि आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो..परंतु असे असले तरी शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपल्या कडून घेतला जात नाही ना? याचााही विचार व्हावा...विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम दाखवा.... दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की दाखवा... ✍
आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं... महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फेेेे आयोजित साठावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन जळगाव येथे छत्रपती संभाजी नाट्यगृह करण्यात आले आहे.आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे.या नाट्य स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.✍ दिनांक ४ मार्च २०२२. शैलेश शिरसाठ. २०२४ च्या सरत्या वर्षातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लेखाचा पुढचा भाग २०२५ च्या महाराष्ट्र दिनानिमित्त लिहित आहे. सर्वसाधारणपणे असं पाहायला मिळतं की नवीन पिढीवर सातत्याने टीका होत असते परंतु नवीन पिढीत प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहेत जुन्या पिढीने मात्र स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे आणणारा दैदिप्यमान इतिहास फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रबोधनातून हस्तांतरित करत राहावा,यातील सर्वांना जोडणारा आपल्या हृदयातील महत्त्वाचा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं स्पंदन आणि रुबाब. पुणे पुस्तक महोत्सवात The Folk Akhyan या विशेष कार्यक्रमात शाहीर चंद्रकांत माने यांच्या सुमधुर आवाजात गायलेले प्रेरणादायी गीत "शिवबा राजं छत्रपती झालं ग" तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतं. या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि त्यागाच उत्तम वर्णन आहे. ऐका आणि गर्वाने शिवरायांचा जयजयकार करा!
आपलाही
शैलेश शिरसाठ,जळगाव.
हो सर घरा घरमधुन हि एक चळवळ होणं आज खूप गरजेचं आहे.
ReplyDeleteअती उत्तम
ReplyDeleteधन्यवाद
Delete