‘We Smart’ उपक्रमा अंतर्गत 'विवेक जागर' या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि वाढीस लावणे हा आहे.
कार्यक्रमात सापांविषयी समाजात रूढ असलेल्या विविध गैरसमजांवर चर्चा करण्यात आली. सापांविषयीचे सत्य आणि तथ्य, पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. सापांविषयी असलेले समज-गैरसमज दूर करताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून,भूतदयेतून मानवतावादी दृष्टिकोनाने अन्नसाखळीतील महत्त्वाच्या या प्राण्यांकडे कसे पाहावे, याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment