Friday, 23 August 2024

 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि तो वाढीस लागावा यासाठी श्री शैलेश शिरसाठ यांच्या We Smart उपक्रमा अंतर्गत 'विवेक जागर' कार्यक्रमांतर्गत आज पहिला भारतीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला.

यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना 'चंद्राला स्पर्श करून जीवनाला स्पर्श: भारताची अंतराळ गाथा' अशी आहे. 

23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. भारताने या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश ठरला, तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिलाच देश बनला.या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे.

या दिवसाच्या निमित्ताने भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उपलब्धी आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना तसेच 2045 पर्यंत चंद्रावर भारतीय पाउल उमटवणे ही भविष्यातील उद्दिष्टे आहेत. गगनयान मिशनच्या अंतर्गत 2025 मध्ये प्रथमच भारतीय व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे.


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी ता धरणगाव जि जळगाव येथील विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमलाल पाटील



No comments:

Post a Comment