Saturday, 7 September 2024

राष्ट्रीय एकात्मता आणि समाज प्रबोधनाच्या सुमधुर भक्ती भावाचा सार्वजनिक उत्सव की प्रचंड गोंगाट आणि कर्णकर्कश कल्ला.. हे आता आपल्याला ठरवायचे आहे कारण कुठलाही उत्सव साजरा करताना आवाज संहितेसह सर्वच आचारसंहितांचे पालन आपल्या सगळ्यांकडून झालं पाहिजे. गेल्या काही वर्षात सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढले आहे यात ध्वनी प्रदूषणाची भर पडली आहे. 


 ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह विविध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना कारणीभूत ठरू शकतो. मोठ्या आवाजातील संगीत आणि कामाच्या ठिकाणच्या आवाजासह विविध स्त्रोतांकडून होणारे ध्वनी प्रदूषण थेट श्रवणशक्ती कमी करू शकते. उत्सव कुठल्याही धर्माचा असो सर्वांनीच आवाज संहितेचे पालन करायला पाहिजे. सुमधुर भक्ती गीत की बीभत्स कर्णकर्कश गाणी हे ही ठरवावे लागेल. चांगले भक्त अर्थात चांगले नागरिक अशी ओळख अधोरेखित करूया... आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.






No comments:

Post a Comment