Saturday, 30 November 2024

आमची मुलं मुंबई-पुण्यात शिकतात याचा दुसरा अर्थ आमची मुलं मुंबई-पुण्यातील रिसोर्सेस किती उपयोगात आणतात या अर्थाने होणेही महत्त्वाचे आहे.
पुण्यात शिकणं म्हणजे पुण्यात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या, सकारात्मक संधीचं सोनं करणं हे देखिल महत्त्वाचं आहे. आपण ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहणं पसंत का करतो ? याची अनेक कारणं असली तरी आपल्याला आणि आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि अधिक चांगल वातावरण मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो,परंतु असे असले तरी शहरात असणाऱ्या विविध क्लासेस आणि शैक्षणिक प्रगती पुरताच त्याचा मर्यादित असा अर्थ आपल्या कडून घेतला जात नाही ना? याचााही विचार व्हावा.

 विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक, कृषी आणि इतर व्यवसायाशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांना सामिल करुन घेणे त्यांना ते प्रत्यक्ष दाखवण हेही आपल काम आहे. एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही केवळ या कारणासाठी आपल्या स्वतावर किंवा आपल्या पाल्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्याय करू नका. आपण स्वतःही आणि मुलांनाही दर्जेदार असे कार्यक्रम, प्रदर्शने दाखवा. दुर्दैवानं फार काही चांगलं दाखवण्यासाठी हल्ली शहरांमध्ये उपलब्ध नाही पण जे दर्जेदार आहे ते नक्की दाखवा... ✍

 आपण शहरात राहत असल्यामुळे असल्या प्रकारच्या कार्यक्रमांचा, प्रदर्शनांचा आणि शहरात राहण्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. ग्रामीण भागातल्या लोकांना विविध कार्यक्रम तसेच प्रदर्शनाबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा इच्छा असून देखील बऱ्याचदा शहरातील कार्यक्रमांचा आणि प्रदर्शनांचा लाभ घेणं खूप सोपं आणि सहज नसतं.

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ एकलव्य क्रीडा संकुल एम जे कॉलेज कॅम्पस जळगाव येथे आयोजित केलेले आहे  तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फेेेे आयोजित ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन जळगाव येथे छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.
आपल्या सगळ्यांना एक चांगली संधी लाभली आहे. आपण स्वतः आपल्या परिवारासह कृषी प्रदर्शन तसेच नाट्य स्पर्धेचा लाभ घ्यावा असे मला व्यक्तिशः वाटतं.✍आपलाही शैलेश शिरसाठ.
कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी बारामतीची भेळ बारामती चार्ट सेंटरवर आहे तिचा आस्वाद नक्की घ्या. लक्षात ठेवा ती बारामतीची भेळ आहे.





Tuesday, 26 November 2024

'मटन'नुसतं नाव उच्चारलं तरी चवीचा भास आहे, प्रचंड आश्वासक उत्साह आहे.

'मटन'नुसतं नाव उच्चारलं तरी चवीचा भास आहे, प्रचंड आश्वासक उत्साह आहे.

मटण पार्टी आणि कार्यालयातील बंधुभाव

एका कार्यालयात नेहमीच कामाची गडबड असते, पण गेल्या आठवड्यात कामाला एकदम वेगळाच रंग चढला होता. कारण होतं मटण पार्टी! ,"सगळ्यांनी मिळून एक मस्त मटण पार्टी करायची!" बस, आणि मग काय? एक क्षणातच कामापेक्षा मटणाच्या चर्चा जोर धरू लागल्या.

प्लॅनिंगची धमाल

पहिल्या दिवशीपासूनच प्रत्येक जण वेगवेगळी जबाबदारी स्वतःहून घेऊ लागला. काहींनी "बजेट" ठरवायला घेतलं, पण बजेटपेक्षा त्यांना "मसाले किती तिखट हवे?" यावरच चर्चा करायची होती. ज्यांना स्वयंपाकाची सुतराम माहिती नाही, त्यांनी "मी मसाले आणतो" असं ठासून सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी हळद, मिरचीऐवजी साखर आणि मीठ घेऊनच हजेरी लावली!

स्वयंपाकाची तयारी

मॅडम म्हणाल्या, "मी  बनवलेले मटणच जगात भारी लागतं," वातावरण एकदम हलकंफुलकं झालं. शेवटी स्वयंपाकाची जबाबदारी सोपवण्यात आली, कारण त्यांचा "मटण रस्सा" लोकांनी माहित होत.

खरेदीची गंमत

सकाळी लवकरच ऑफिस मधील दोन घन मटणवाल्याशी गाडीच्या किंमतीसारख्या घासाघीस करण्यात त्यांनी अर्धा तास घालवला. अखेर त्यांनी ४ किलो मटण घेतलं आणि येताना "हा भाग शोल्डरचा, हा रिब्सचा!" असं ज्ञान देत सर्वांना मटणाची शास्त्रीय माहितीही दिली.

पार्टीचा दिवस

पार्टीच्या दिवशी कार्यालयात वेगळंच वातावरण होतं. सारेच मिळून कांदा चिरत होते, आणि त्यातच साहेबांचे डोळे पाणावल्यावर सगळे हसू लागले. कुमार सर म्हणाले, "अरे, कांद्यापेक्षा भावनांनी पाणी आलंय की काय?" कामाच्या गडबडीत सगळे एकत्र काम करत होते, आणि मटणाचा वास कार्यालयभर दरवळत होता.

बंधुभावाचा मेजवानीतून उगम

सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं. ताट वाढताना भाऊसाहेब म्हणाले, "साहेबांना आधी वाढा, त्यांना जास्त भूक लागली आहे" आणि सगळे हसायला लागले. जिव्हाळा आणि हास्याने भरलेली ही मटण पार्टी खरंच संस्मरणीय ठरली. कोणाचं बॉस, कोणाचं कर्मचारी असं भान उरलं नाही. सगळे एकाच कुटुंबासारखे वागले.

मटणाचा परिणाम.

पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कामाची गती वाढली होती. जणू मटणाचं प्रोटिन सगळ्यांच्या उत्साहात भर पाडून गेलं होतं. आता प्रत्येकाने ठरवलंय, "मटण पार्टी दर दोन महिन्यांनी हवीच!"

निष्कर्ष:

या मटण पार्टीने ऑफिसमधील ताणतणाव पळवून एकमेकांमधील स्नेहभाव वाढवला. हसतखेळत, गप्पाटप्पांतून कामाची गोडी वाढवण्यासाठी मटण पार्टी हा उत्तम मार्ग ठरला.


 स्पोकन इंग्लिशच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष वर्गात खूप हसत खेळत आपले लेक्चर घेत असतो परंतु आज मी तुम्हाला मटणाविषयी काही माहिती मराठी आणि इंग्रजीतून माझ्या ब्लॉग मधून तुमच्यासाठी खास.

तुमचेच शैलेश सर

भारतीय मटणाच्या विविध डिशेस

भारतीय स्वयंपाकात मटणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मटणापासून विविध प्रकारच्या चविष्ट डिशेस तयार केल्या जातात.

Indian cuisine has a wide variety of flavorful mutton dishes:

१. मटण करी – हा भारतीय स्वयंपाकातील सर्वाधिक प्रसिद्ध प्रकार आहे. विविध मसाले, कांदा, टोमॅटो यांचा वापर करून बनवलेली करी चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्ली जाते.

1. Mutton Curry – A classic dish made with onions, tomatoes, and aromatic spices, paired with bread or rice.

२. मटण कोल्हापुरी – महाराष्ट्रातील कोल्हापुरी पद्धतीने तयार केलेली मसालेदार डिश.

2. Kolhapuri Mutton – A spicy preparation from Maharashtra.

३. रोगन जोश – काश्मिरी पाककृतीतील खास मटणाची डिश. लाल मिरच्या आणि सुगंधी मसाल्यांनी बनवलेली.

3. Rogan Josh – A Kashmiri delicacy made with red chilies and fragrant spices.

४. बिर्याणी – मटण आणि मसालेदार भात यांचा उत्तम संगम. हैदराबादी बिर्याणी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

4. Biryani – A mix of spiced rice and mutton, with Hyderabadi biryani being the most renowned.

५. मटण किमा/खिमा– बारीक चिरलेल्या मटणापासून बनवलेली, सुकट किंवा रस्सा स्वरूपात खाल्ली जाते.

5. Mutton Keema – Minced mutton cooked as a dry or gravy dish.

६. मटण सुक्का – कोरडी प्रकारातील मटण डिश, मुख्यतः दक्षिण भारतात प्रसिद्ध.

6. Mutton Sukka – A dry preparation popular in South India.




मटणाचे विविध भाग व आरोग्यदृष्ट्या महत्त्व.मटणाचे विविध भाग आणि त्यांचा उपयोग पाककृतींमध्ये वेगळ्या प्रकारे होतो. प्रत्येक भागाचे आरोग्याच्या दृष्टीने वेगळे फायदे आहेत:

Different cuts of mutton have unique uses and health benefits:

1. लेग (पायाचा भाग): प्रथिनयुक्त भाग; स्ट्यू किंवा सूपसाठी योग्य. सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.

१. Leg: A protein-rich cut, ideal for stews and soups, beneficial for joint health.

2. शोल्डर (खांद्याचा भाग): सुकट किंवा ग्रेव्हीसाठी उपयुक्त. प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते.


२. Shoulder: Great for curries or slow-cooked dishes, rich in protein and iron.

 ३.रिब्स (पाजर): बार्बेक्यूसाठी उत्कृष्ट. चरबीयुक्त असल्याने ऊर्जा देते.

3. Ribs: Best for barbecuing, energy-rich due to its fat content.

 ४.चॉप्स: मऊसर आणि रसाळ. भाजून किंवा ग्रिल करून खाल्ले जाते.

4. Chops: Tender and juicy, perfect for grilling or roasting.

५. मटण लिव्हर (यकृत): लोह, जीवनसत्त्वे आणि झिंकने परिपूर्ण. रक्तक्षय कमी करण्यास मदत करते.

5. Mutton Liver: Packed with iron, vitamins, and zinc, helps combat anemia.

 ६.ब्रेन (मेंदू): फॉस्फरस आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत. मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त.

6. Brain: A good source of phosphorus and omega-3 fatty acids, supports brain health.



आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व.

•मटणात उच्च दर्जाचे प्रथिने असतात, जी स्नायूंसाठी उपयुक्त आहेत.Mutton is a rich source of high-quality protein essential for muscle health.


•लोह आणि झिंक रक्ताभिसरण सुधारतात.Iron and zinc improve blood circulation.


•जीवनसत्त्वे बी12 आणि फॉस्फरस मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Vitamin B12 and phosphorus are crucial for brain function.



 स्पोकन इंग्लिशच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष वर्गात खूप हसत खेळत आपले लेक्चर घेत असतो परंतु आज मी तुम्हाला मटणाविषयी काही माहिती मराठी आणि इंग्रजीतून माझ्या ब्लॉग मधून तुमच्यासाठी खास.

तुमचेच शैलेश सर


भारतीय मटणाच्या विविध डिशेस


मराठीतून:


भारतीय स्वयंपाकात मटणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मटणापासून विविध प्रकारच्या चविष्ट डिशेस तयार केल्या जातात.

Indian cuisine has a wide variety of flavorful mutton dishes:


1. मटण करी – हा भारतीय स्वयंपाकातील सर्वाधिक प्रसिद्ध प्रकार आहे. विविध मसाले, कांदा, टोमॅटो यांचा वापर करून बनवलेली करी चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्ली जाते.

1. Mutton Curry – A classic dish made with onions, tomatoes, and aromatic spices, paired with bread or rice.



2. मटण कोल्हापुरी – महाराष्ट्रातील कोल्हापुरी पद्धतीने तयार केलेली मसालेदार डिश.

2. Kolhapuri Mutton – A spicy preparation from Maharashtra.



3. रोगन जोश – काश्मिरी पाककृतीतील खास मटणाची डिश. लाल मिरच्या आणि सुगंधी मसाल्यांनी बनवलेली.

3. Rogan Josh – A Kashmiri delicacy made with red chilies and fragrant spices.



4. बिर्याणी – मटण आणि मसालेदार भात यांचा उत्तम संगम. हैदराबादी बिर्याणी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

4. Biryani – A mix of spiced rice and mutton, with Hyderabadi biryani being the most renowned.



5. मटण किमा/खिमा– बारीक चिरलेल्या मटणापासून बनवलेली, सुकट किंवा रस्सा स्वरूपात खाल्ली जाते.

5. Mutton Keema – Minced mutton cooked as a dry or gravy dish.



6. मटण सुक्का – कोरडी प्रकारातील मटण डिश, मुख्यतः दक्षिण भारतात प्रसिद्ध.

6. Mutton Sukka – A dry preparation popular in South India.

 संविधान दिन कार्यक्रमाचा अहवाल.

दिनांक: 26 नोव्हेंबर 2024

स्थळ: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव

26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रेेमलाल डिगंबर पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्री.विश्वास पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली.

शिक्षिका सौ. वंदना पाटील यांनी संविधानातील पायाभूत मूल्ये – स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करण्याचे व नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात  विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल अभिमान निर्माण झाला.

मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संविधानाच्या तत्वांना जीवनात कसे अमलात आणायचे याबाबत मार्गदर्शन केले. श्री. भटू पाटील सरांनी संविधान दिनाच्या निमित्ताने देशाच्या एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु.दिव्या बेलदार यांनी  केले.



Saturday, 23 November 2024

बोकड्या कटेंगा और सबमें बटेंगा.

 संडे स्पेशल. (प्रासंगिक)

"बोकड्या कटेंगा और सबमें बटेंगा."

रविवारचा बेत आणि अब्दुल मियाची मटणची दुकान...


"अरे अब्दुल भाई तेरी भाभी के लिए सूप बनाना है गुर्दे के साथ चाप के पीस जादा डालना..." त्यावर मटण विक्रेता अब्दुल म्हणाला "अरे भैय्या बच्चो के लिये कलेजी अलग से डालदि है l"

काल-परवापर्यंत गल्लीत मुस्लिमांना कोसणारा,ग्रुपवर मुस्लिम विरोधी पोस्ट टाकणारा आणि वेगळ्या राष्ट्राच्या बाता करणारा रविवारी आवर्जून अब्दुलच्या मटन शॉप वर जातो आणि गोड बोलून सीना, चाप,गुर्दा आणि कलेजी मटणात योग्य प्रमाणात घेतो हे पाहून मी अवाक झालो. 

नंतर अब्दुल भाई त्याला म्हणाला की, भाई एक किलो कर दु क्या? 

त्यावर तो लाल  टिक्का लावलेला म्हणाला की," भाई कल सोमवार है और सोमवार को  उपवास रहता है इसलिये रविवार को पूरा मटन खतम करना होगा नही तो तुम्हारी भाभी चिल्लायेगी. मटन तीन पाव ही देना,"असं म्हणून त्याने वीस रुपये  नेहमीप्रमाणे कमी दिले आणि अब्दुलला म्हणाला अगले हप्ते दे दूंगा,तू तो मेरा भाई है अब्दुल. तू और तेरे हाथ का मटन एक नंबर  है मेरे दोस्त." असं म्हणत त्याने निषेधाची नव्हे तर मटणाची काळी थैली उचलली आणि तो घराकडे निघाला.

मटणासाठी लागलेल्या रांगेतून कुणीतरी म्हणालं, "मुझेभी चाप और कलेजी चाहिये अब्दुल भाई." त्यावर अब्दुल हसून म्हणाला "अरे दादा गर्दी मत करो,सबको मटन मिलेंगा.एक और बोकड्या कटेंगा और सब मे बटेंगा." यावर सर्व लोक जातीधर्म विसरून लटकलेल्या बोकडाकडे पाहून जोर जोरात हसू लागले...

- शैलेश शिरसाठ.



खोट्या साधूच्या वेशातील आलेल्या संधी साधूंपासून सावध असावे.

 न्यूज चैनल वर महाराष्ट्र विधानसभेचा पूर्ण निकाल लागल्याच पाहिल.. मला आजीने बालपणी सांगितलेली रामायणातील गोष्ट सहजच आठवली.


आजीने सांगितलेल्या गोष्टीत माता सीतेला जंगलातील सुंदर हरणाचा मोह झाला आणि प्रभू रामचंद्रांनी सीतेमातेसाठी त्या हरणाची शिकार करण्याचे ठरवले,ते त्या हरणाच्या मागे धावले. वरून सोनेरी आणि अत्यंत मनमोहक असणारा तो हरण रावणाने मुद्दामून पाठवलेला एक मायावी राक्षस होता. जो हरण्याच्या रूपात आला होता.

साध्या भोळ्या सीतेमातेला ते कळाले नाही आणि  सोनेरी वाटणाऱ्या त्या हरण्याच्या मोहात त्या पडल्या. आता त्या लक्ष्मणासह वाटिकेत होत्या परंतु नंतर लक्ष्मण देखील मोठे बंधू प्रभू श्रीराम यांच्या काळजीपोटी सीता मातेच्या आज्ञेवरून जंगलात प्रभू रामचंद्रांच्या मागे धावले अर्थात त्याआधी त्यांनी सीतामातांना त्यांच्या संरक्षणासाठी असलेली लक्ष्मण रेषा पार न करण्या संदर्भात विनंती केली होती.साध्या भोळ्या आणि धार्मिक भक्ती भाव असणाऱ्या सीता मातेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर काढण्यासाठी रावणाला साधूचा वेश घ्यावा लागला. आपला धूर्त कावेबाजपणा माता सीतेच्या लक्षात येऊ नये यासाठी रावणाने साधूचा वेश घेतला. भिक्षा मागण्यासाठी आलेले साधू महाराजांचा अपमान होऊ नये आणि त्यांनी चिडून आपल्याला श्राप देऊ नये म्हणून माता सीता लक्ष्मणरेषा ओलांडून साधूच्या रूपात आलेल्या रावणाला भिक्षा द्यायला बाहेर पडल्या आणि रावणाने त्यांचे हरण केले. 

आजीने सांगितलेल्या गोष्टीचा मी माझ्या लहानपणी काढलेला निष्कर्षही मला या निमित्ताने आठवला की, कुठल्याही मोहापोटी एखाद्या गोष्टीच्या मागे धावणे चुकीचेच आणि आपल्या धार्मिक भावनांचा आणि साधे भोळेपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून साधूच्या वेशात आलेल्या संधी साधू कावेबाज लोकांपासून सावध राहावे.आपल्याला साधू आणि संधी साधू यांच्यातला फरक कळायलाच हव नाहीतर आपल्याला आणी आपल्या  माता भगिनींना फसवल जाऊ शकत.

आजीने सांगितल्या रामायणातील निष्कर्ष थोडक्यात असा. 

१) साधूच्या वेशात आलेल्या भामट्यांपासून सावध राहावे.

) आमिष दाखवलं तरी अमिष दाखवणाऱ्यांच्या मोहात आपण पडू नये.

३) अति साधे आणि भोळे राहून होऊ नये नाहीतर धार्मिकतेच्या नावावर संधी साधू भीती दाखवून गैरफायदा घेतात.






Friday, 22 November 2024

 ....आणि त्यांनी माती खाल्ली. 

अति लघुकथा

 मला सहजच माझ्या बालपणीचा एक प्रसंग आठवला. मी शाळेत जात असताना एक मावशी मुलांवर चिडल्या होत्या आणि कपाळावर हात मारत होत्या, समोर पाहिलं तर मोकळ्या पटांगणात काही अज्ञान बालके आईने समजावून सांगितल्यावरही माती खात होते... विशेष म्हणजे त्यांना कॅल्शियमच्या गोळ्यांचा पर्याय असल्यावरही त्यांनी मातीच खाल्ली.



Wednesday, 20 November 2024

 इंग्रजी भाषेचे प्रचंड आकर्षण असणाऱ्या माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो. कुठलीही भाषा ही त्या भाषेचा केवळ ग्लॅमर आणि ग्रामर (व्याकरण) तसेच त्या भाषेतील संवाद एवढ्या पुरता मर्यादित समज  नसावी ती त्याही पलीकडे नेणारी असावी.

आज भगवान गौतम बुद्धांची एक शिकवण सहजच वाचण्यात आली ती मराठी स्पष्टीकरणासह.

Buddha says, "Hatred is never ended by hatred but by love," and a misunderstanding is never ended by an argument but by tact, diplomacy, conciliation, and a sympathetic desire to see the other person's viewpoint.

गौतम बुद्ध म्हणतात: "द्वेष कधीही द्वेषाने संपत नाही; तो केवळ प्रेमाने संपतो." त्याचप्रमाणे, गैरसमज कधीही वादाने संपत नाही; तो केवळ कुशलता, मुत्सद्देगिरी, समेट, आणि दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याची सहानुभूतीपूर्ण इच्छा यामुळे संपतो.

याचा अर्थ असा की, द्वेषाला द्वेषाने उत्तर दिल्यास ते वाढतच राहते; परंतु प्रेमाचा मार्ग निवडल्यास द्वेष समाप्त होतो. त्याचप्रमाणे, गैरसमज दूर करण्यासाठी वाद, राग किंवा कटु शब्द उपयोगी ठरत नाहीत. त्याऐवजी शांतता, समंजसपणा, विचारपूर्वक निर्णय, आणि दुसऱ्याच्या मताला आदर देणे यामुळेच गैरसमज दूर होऊ शकतो. त्यामुळे संवाद आणि सहकार्याला प्राधान्य दिल्यास नातेसंबंध सुधारतात आणि शांततेचा मार्ग मोकळा होतो.




Thursday, 14 November 2024

 2020-21मधे स्विडन येथील इको ट्रेनिंग सेंटरच्या विद्यमाने केलेल्या आंतरराष्ट्रीय टेलिकोलॅबोरेशन प्रकल्पात मी सादरीकरण करत असताना हंगर इंडेक्स मध्ये अर्थात जागतिक भूक निर्देशांक आपण (भारत) 121 देशांमध्ये पण खूप मागे म्हणजे 101 क्रमांकावर होतो....

- शैलेश शिरसाठ.

यावर्षी (2024) जागतिक भूक निर्देशांकात👇

https://affairscloud.com/india-ranked-105th-in-global-hunger-index-2024-placed-under-serious-category/?amp

Friday, 8 November 2024

मतदानाशी संबंधित इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ आणि त्यांचे स्पष्टीकरण खाली दिले आहे:

1. Vote - मत / मतदान करणे to vote

स्पष्टीकरण: एखाद्या निवडणुकीत आपली पसंती नोंदवण्यासाठी दिलेली मतांची निवड.

मतदानाशी संबंधित इंग्रजी वाक्ये आणि त्यांचे मराठी स्पष्टीकरण खाली दिले आहे:

1. "Every citizen has the right to vote."

प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे.

स्पष्टीकरण: या वाक्यात सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीस, जो कायदेशीर मतदार आहे, त्याला आपले मत नोंदवण्याचा अधिकार आहे.

2. "Please check your name on the electoral roll before voting."

कृपया मतदान करण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव तपासा.

स्पष्टीकरण: मतदान करण्याआधी मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे का हे पाहण्याची सूचना आहे.

3. "Voting is an important civic duty."

मतदान करणे हे एक महत्त्वाचे नागरी कर्तव्य आहे.

स्पष्टीकरण: हे वाक्य स्पष्ट करते की मतदान हा प्रत्येक नागरिकाचा जबाबदार कार्य आहे, जो देशाच्या लोकशाही प्रक्रियेसाठी महत्त्वाचा आहे.

4. " polling  will start at 7 AM."

मतदान सकाळी ७ वाजता सुरू होईल.

स्पष्टीकरण: मतदान केंद्रावर मतदार सकाळी ७ वाजल्यापासून मतदान करण्यासाठी येऊ शकतात.

5. "Make sure to carry a valid ID when you go to vote."

मतदानाला जाताना वैध ओळखपत्र बरोबर ठेवा.

स्पष्टीकरण: मतदारांना मतदान करण्यासाठी आपल्या ओळखीची खात्री करण्यासाठी वैध ओळखपत्र बरोबर आणण्याची सूचना दिली आहे.

6. "Voting results will be announced in the evening."

मतदानाचे निकाल संध्याकाळी जाहीर केले जातील.

स्पष्टीकरण: मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याचे निकाल संध्याकाळी कधी तरी जाहीर केले जातील.


7. "You must be 18 or older to vote."

मतदान करण्यासाठी आपले वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

स्पष्टीकरण: मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी मतदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.

8. "Your vote can make a difference."

आपले मत बदल घडवू शकते.

स्पष्टीकरण: या वाक्यात मतदाराला त्याचे मत किती महत्त्वाचे आहे आणि ते बदल घडवू शकते हे पटवून देण्याचा प्रयत्न आहे.

9. "A high voter turnout shows active citizen participation."

उच्च मतदानाची टक्केवारी नागरिकांच्या सक्रिय  सहभागाचे प्रतीक आहे.

स्पष्टीकरण: जास्त नागरिकांनी मतदान केल्यास ते त्यांच्या सक्रिय सहभागाचे संकेत देते, ज्यामुळे लोकशाही बळकट होते.

ही वाक्ये मतदान प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतात आणि मतदारांचे महत्त्व अधोरेखित करतात.

2. Voter - मतदार

स्पष्टीकरण: ज्याने मतदानासाठी नोंदणी केली आहे आणि ज्याला मतदानाचा हक्क आहे.

3. Polling Station - मतदान केंद्र

स्पष्टीकरण: मतदारांना मतदान करण्यासाठी नेमलेली ठिकाणे, जसे की शाळा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणे.

4. Ballot - मतपत्रिका

स्पष्टीकरण: मत देण्यासाठी वापरले जाणारे कागद किंवा इलेक्ट्रॉनिक साधन, ज्यामध्ये उमेदवारांची यादी असते.

5. Election - निवडणूक

स्पष्टीकरण: लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी किंवा काही महत्त्वाच्या निर्णयांसाठी लोकांचे मते गोळा करण्याची प्रक्रिया.

6. Campaign - प्रचार

स्पष्टीकरण: निवडणुकीपूर्वी उमेदवार किंवा पक्षाने मतदारांना आपली,आपल्या गटाची,  आपल्या पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगण्यासाठी केलेले प्रयत्न.

7. Candidate - उमेदवार

स्पष्टीकरण: निवडणुकीत कोणत्याही पदासाठी स्पर्धा करणारी व्यक्ती.

8. Electoral Roll - मतदार यादी

स्पष्टीकरण: निवडणुकीसाठी अधिकृतपणे नोंदवलेले मतदारांची यादी.

9. Casting Vote - मतदान करणे

स्पष्टीकरण: एखादा मतदार आपले मत नोंदवण्याची क्रिया.

10. Electoral Commission - निवडणूक आयोग

स्पष्टीकरण: निवडणुका आयोजित करण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी जबाबदार असलेली संस्था.

11. Turnout - मतदानाची टक्केवारी

स्पष्टीकरण: निवडणुकीत किती लोकांनी मतदान केले याचे प्रमाण, साधारणतः टक्केवारीत व्यक्त केले जाते.

12. Right to Vote - मतदानाचा हक्क

स्पष्टीकरण: व्यक्तीला मत देण्याचा कायदेशीर अधिकार.

हे शब्द आणि त्यांचे अर्थ, मतदान प्रक्रियेसंबंधी अधिक चांगली समज होण्यास  मदत करू शकतात.




Tuesday, 5 November 2024

 स्पोकन इंग्लिशच्या माझ्या विद्यार्थ्यांनो आज

फ्रेड्रिक्स डग्लस यांचे एक वाक्य आठवले, ते म्हणतात...

Knowledge makes a man unfit to be a slave.

ज्ञान मनुष्याला गुलाम होण्यास अयोग्य बनवते. या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्ञान ही अशी शक्ती आहे जी मनुष्याला त्याच्या स्वातंत्र्याची आणि हक्कांची जाणीव करून देते.अज्ञानाने भय जन्माला येते भीतीमुळे अंधविश्वास जन्म घेतो अंधविश्वासामुळे अंधभक्ती जन्माला येते अंध भक्तीमुळे व्यक्तीचा विवेकशून्य होतो आणि विवेक शून्य झालेली व्यक्ती मानसिक गुलाम होते. ज्ञानामुळे तो गुलामीचे बंधन स्वीकारत नाही, सत्य जाणून घेतो चिकित्सा करायला शिकतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला सत्य आणि न्यायाचा मार्ग सापडतो. गुलामी म्हणजे स्वातंत्र्याची वंचना होणे, पण जेव्हा मनुष्य शिक्षित आणि जागरूक होतो, तेव्हा त्याच्यात आत्मनिर्भरता आणि स्वाभिमान निर्माण होतो. त्यामुळे, ज्ञान माणसाला स्वातंत्र्य आणि सन्मान यासाठी लढण्यास प्रेरित करते, आणि त्याला गुलाम होऊ देत नाही.

माझ्या विद्यार्थ्यांनो इंग्रजीचे वाक्य पाठ करू नका त्याचा अर्थ समजून घ्या कारण एखादी भाषा शिकत असताना त्यासोबतच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणाऱ्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत नाहीतर शिक्षण हे फक्त पुस्तकी आणि परीक्षेत गुण मिळवण्यापुरतेच मर्यादित राहते.











Video Courtesy and thanks to Navbharat Times 

Friday, 1 November 2024

ईडा पीड़ा टाळो आणि बळीचे राज्य येओ विचार तर कराल? " पुजा कुणाची करायची बळीची कि वामनाची ? "
 बहुजन समाजाला अगदी सिंधू संस्कृती  पासुनच फार मोठा सांस्कृतीक वारसा मिळालेला आहे. या सिंधू संस्कृतीची निर्मीती ज्या कर्तबगार आणि न्यायप्रीय व्यक्तींनी केली त्यामधे बळीराजाचे स्थान अत्यंत वरचे आहे.

भारतीय बहुजन समाजाने  पिढ्यान् पिढ्या मौखिक परंपरेने का होईना ? या बळीराजा विषयीचा आदर आपल्या हृदयात जपून ठेवलेला आहे. महाराष्ट्रापासुन जसजसे दक्षिणेस जावे तसतसे हा आदर अधिक असल्याचे आपल्याला आढळते.याचे एक कारण असे दिसते की आर्य आणि ईथले मुळ निवासी यांचेमधे युध्द झाल्यावर मुळ निवासी लोकांना दक्षिणेत सरकावे लागले आणि त्यामुळे बळी वगेरे राजाबध्दलचा आदर पिढ्यानपिढ्या तिकडच्या भागात अधिक प्रमाणात टिकून राहीला.

तामीळनाडू किंवा केरळमधे बळीराजाचा ऊल्लेख नुसता बळी असा न करता 'महाबळी ' असा केला जातो.तामीळनाडू मधे महाबलिपुरम नावाचे शहर आहे। ज्याने या शहराला नांव दिले ते या महाबळीचा वारसा मानत होते हे अगदी स्पष्ट आहे। तामीळणाडूमधे कांचीपुरम येथे एका मंदीराचे नांव ' चक्रवर्ती बळी मंदीर 'असे आहे। केरळमधे ओणम हा सन बळीराजा विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो। ' या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी म्हणून येतो ' अशी या सणामागची धारणा आहे.हा सन म्हणजे केरळचा राष्ट्रीय सन असेच त्याचे स्वरुप आहे.

महाराष्ट्रात तर शेतकर्याला बळीराजा म्हणने किंव्हा बहिणीने भावाला ओवाळतांना ' ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो 'अशी आपल्या भावासाठी सदीच्छा व्यक्त करणे, या घटना बळीविषयी आपला कमालीचा आदर दाखविणार्या आहेत.

 बहुजन समाजाने बळीराजा विषयीचा इतका कमालीचा आदर बाळगलेला आहे कि एकिकडून आनंदाची तर दुसरीकडून हि आत्मसन्मानाची बाब आहे.पिढ्यानपिढ्या आपले स्वत्व जपून ठेवण्याचे आत्मभान यातून व्यक्त होते. पण या घटनेला दुसरीही एक क्लेशकारक, मन खिन्न करुन टाकणारी अशी बाजू आहे। सर्वसामान्य लोकांच्या मनात बळीविषयी असलेला हा आदर झाकला जाईल, दडपून टाकला जाईल अशा रितीने वैदीक संस्कृतीने बहुजनांच्या संस्कृतीवर विघातक असे आक्रमण केलेले आहे आणि त्या आक्रमणाचे दुष्परिणाम दक्षिणेतही दिसुन येतात.ज्या गावाचे नांव महाबलिपुरम आहे त्या गावांत बळीचे एकही मंदीर नाही असे मला तिथल्या लोकांनी सांगीतले. कदाचीत कानाकोपर्यात एखादे असलेच तर माहीत नाही किंव्हा पुर्वी कधी असेल तर काळाच्या ओघात वा नष्ट करण्यातही आले असेल.याऊलट तिथे वराह मंदीरात विष्णूच्या अवताराची जी शिल्पे कोरलेली आहेत त्यामधे वामणाने बळीला लाथेने ऊडविल्याचे शिल्प आढळते असेच शिल्प कर्नाटकातील पुलकेशीची राजधानी असलेल्या बदामीलाही आढळते.कांचीपुरम येथे जे चक्रवर्ती बळीचे मंदीर आहे त्या मंदीराचे नांव तिथल्या पुजार्याने वामन मंदीर सांगीतले मंदीरात बलदंड आणि महाकाय वामनाच्या पायाखाली बळीचे मस्तक असल्याची मुर्ती आहे.

 केरळमधे 'ओणम' हा सन बळीच्या स्मृतीसाठी साजरा केला जात असला तरी तिथेही वामनाचा प्रभाव निर्माण करण्यात वैदीक संस्कृती यशस्वी झाली आहे। एर्नाकुलमच्या जवळ "त्रिक्काकर" येथे वामनाचे मंदीर आहे. या शब्दाचा अर्थ पवित्र चरणभूमी असा होतो। या वर्षी (2003) मी ओणम या सनाच्या दिवशी मुद्धाम केरळमधे गेलो होतो.या सणाचे कार्यक्रम जवळजवळ 10 दिवस चालतात.यातील मुख्य दिवस "थिरु ओणम" हा असतो। त्याच्या आदल्या दिवशी मी या वामण मंदीरात गेलो होतो.तेथे दुपारच्या वेळी सहा हत्ती आणलेले होते,ते सोनेरी झुलींनी सजवीले होते आणि फुलांनी सजविलेल्या वामनाच्या मुर्तीची मिरवणूक हत्तीवरुन काढण्यात आली.या सर्व घटना पाहाता वैदीक संस्कृती बहुजनांच्या संस्कृतीला कशी गिळून टाकते ते स्पष्ट होते. बहुजनांचा सांस्कृतीक वारसा निष्प्रभ करुन, फिका करुन हळुहळू संपवून टाकायचा, आणि आपल्यापरीने आपल्या राशी, आपल्या देवता, आपले विजय, आपले पराक्रम यांचाच ठसा, बहुजनांच्या मनावर बिंबवायचा, हा डावपेच वैदीक संस्कृती यशस्वीपणे वापरते आहे.खरेतर वामन बळीला लाथेने ऊडवीत आहे या प्रकारची शिल्पे ज्यांनी आपल्या हातांनी कोरली असेल ते शिल्पकार बहुजनातीलच असणार यात काही शंका नाही. याचा अर्थ अत्यंत ऊच्च दर्जाचे शिल्प निर्माण करण्याची कला त्यांचेकडे होती.त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य त्यांच्या हातामधे होते. अपार कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. म्हणजे या महान कलाकृती त्याच्या श्रमातुन त्याच्या क्षमतेमधून तयार झालेल्या आहेत। पण त्या कलाकृती तयार करतांना त्या शिल्पकाराने "आपले फक्त हात वापरावेत, डोके मात्र वापरु नये" अशी व्यवस्था वैदीकांनी निर्माण केली होती.त्यामुळे कलाकृतीचा आशय कोणता असावा ? तिच्यातून लोकांना कोणता संदेश दिला जाणार ? हे मात्र तो प्रतिभावंत शिल्पकार ठरवीत नव्हता तर वैदीक व्यवस्थेचा एखादा पुरस्कर्ता, ब्राम्हणी व्यवस्थेचा एखादा ठेकेदार तो आशय ठरवीत असे। आणि त्याच्या आदेशानुसार तो शिल्पकार आपले शिल्प निर्माण करीत असे। " बळीराजा विषयी नितांत आदर असुनही त्याची विटंबना करणारी, त्याच्या पराभवामधे आनंद माणनारी अशी शिल्पे निर्माण झाली ती मानसिक, बौध्दीक गुलामगीरीनेच होय। " केरळमधे बळीराजाच्या गौरवाची गीते मल्याळम भाषेमधे आढळतात. या राजाच्या काळात ' सगळी प्रजा कशी आनंदी होती '* याचे वर्णन करतांना कवीचे मन बळीविषयीच्या आदराने फुलून आलेले दिसते। *" बळीच्या भेटी प्रित्यर्थ ओणम सारखा सन साजरा करायचा* आणि *तरी देखीलबळीला देवता मानण्या ऐवजी बळीचा पाडाव करणार्या वामनालाच देवता मानायचे, त्याची हत्तीवरुन मिरवणूक काढायची, आपल्या आवडत्या बळीला लाडक्या सदगुणी राजाला ज्याने कपटाने पाताळात गाडले त्याचे ते पाऊल पवित्र मानायचे, ते जिथे टेकले गेले ती भूमी पवित्र मानायची, या सगळ्या मागची मानसिकता आपण नीट समजून घेतली पाहीजे। आपण ज्याचे वारसदार आहोत त्या आपल्याच महान पुर्वजांचा कपटाने पराभव करणार्या आपल्या क्रुर शत्रूला आपण देवता मानू लागलो। एका दृष्टीने आपल्या वडीलांची हत्या करणार्या माणसाची एखाद्याने पुजा करावी आणि वडीलांचाच धिक्कार करावा अशी ही आत्मद्रोही घटना आहे। स्वतःचाच द्वेश करणारी, स्वतःलाच स्वतःचा शत्रू बनविणारी, स्वतःचा आत्मसन्मान आणि प्रतीष्ठा यांचा स्वतःच्या हाताने विध्वंस करणारी अशी ही घटना आहे। "* हे केवळ प्राचीन काळातील एखादी काल्पनिक कथा म्हणून आपण बाजूला सारु शकत नाही। कारण *जगातील कोणत्याही समाजाला आपला भविष्यकाळ ऊज्वल, स्वाभीमानी आणि प्रकाशाने न्हाऊन निघालेला असावा असे वाटत असेल, तर त्याने आपला वारसा देखील नीट समजून घेणे आवश्यक असते। कारण भविष्य काळासाठी आवश्यक असलेली प्रेरणा त्याला आपल्या भुतकाळातूनच मिळत असते। बहुजन समाजाला आपले स्वत्व, आपली अस्मीता, आपली खरीखूरी संस्कृती यांचे जतन करायचे असेल तर त्याने वैदीकांनी लादलेल्या सांस्कृतीक गुलामगीरीतून मुक्त व्हायला हवे। आपल्या शत्रृच्या देवता आपल्या देवता नाही, आपली दैवते असू शकत नाहीत। ज्यांनी बहुजनांच्या कल्याणासाठी लढता लढता प्राणही गमावले तेच आपल्या दृष्टीने पुजनिय पुर्वज होय, आपण त्यांचीच प्रतिष्ठापना केली पाहीजे। आणि हत्तीवरुन मिरवणूक काढायचीच असेल तर ती वामनाची काढण्या ऐवजी आपल्या प्रिय बळीराजाचीच काढली पाहिजे। आपला भविष्यकाळ सांस्कृतीक दृष्ट्या स्वातंत्र्याचा असणार की गुलामगीरीचा असणार, प्रकाशाचा असणार कि अंधाराचा असणार हे स्पष्टपणे ठरविण्याची आता वेळ आली आहे। आतातरी बहुजन समाजाने अंधाराची वाट सोडून देऊन प्रकाशाची वाट धरली पाहीजे असे मला वाटते।🌞 डाॅ.आ.ह.साळुंखे.