राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात साजरी.
जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल डिगंबर पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर, उपस्थितांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विश्वास पाटील यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमात शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वंदना पाटील तसेच श्री. भटू पाटील, आणि श्री. शैलेश शिरसाठ यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रेरणादायी जीवनकार्याबाबत आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि राष्ट्रीय भावनेची चेतना निर्माण झाली.
विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या भाषणांमधून समाजसेवा, शिक्षण, आणि युवाशक्तीचा महत्त्वपूर्ण संदेश उमटला.
मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या कर्तृत्वाची शिकवण आणि विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी शिक्षिका दिव्या बेलदार यांनी आभार प्रदर्शन केले. अशा प्रकारे, जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शाळेत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment