होय तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.
धूम्रपान निषेधाचा संदेश मान्य करत तिने
कुंभकर्णी मेळेतील गांजाने भरलेल्या चिलमीचा मात्र
श्रद्धेने स्वीकार केलाय.
होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.
तिचं सत्य नावाने असत्य कथांच पारायण
अन् माझ्या चिकित्सक प्रश्नांपासून तिचं पलायन झालय.
होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.
माझं जग विज्ञानावर आणि
तिच जग शेषनागावर आहे.
तिच्या पुस्तकात शेषनागावरील जग तरल्याचा निकष
अन् माझ्या पुस्तकात 'कोपर्निकस' आहे.
होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.
द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या
एकलव्यांच्या देशात सहजच काही होत नाही,
आणि म्हणूनच ब्रेकअप आहे.
जन्मानं मिळालेला धर्मासाठी तिच्या डोक्यात युद्ध
अन् माझ्या मेंदूत बुद्ध आहे.
होय,तिचा आणि माझा ब्रेकअप झालाय.
- शैलेश शिरसाठ
माझ्या कल्पनेतल्या चित्राला, संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात मदत करणाऱ्या Imagine ॲपचे आभार.
Courtesy- Imagine
No comments:
Post a Comment