Sunday, 2 March 2025

 छावा चित्रपट पाहण्याच माझ्याने धाडस होत नव्हतं परंतु मोठ्या हिमतीने माझ्या मित्रासोबत चित्रपट बघितला माझ्या मित्राला या गोष्टीची जाणीव होती की मी चित्रपटाचा क्लायमॅक्स बघू शकणार नाही... तरीही त्याने आग्रहा केला  चित्रपटावर मी काहीतरी लिहावं अशी परिवाराची इच्छा होती आणि मी चित्रपट बघितला.

चित्रपट संभाजी राजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला पूर्ण न्याय देणारा नाही असं वाटलं  छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्या खेरीज त्यांनी स्वतः रचलेले साहित्य त्यांची कवी कलश सोबतची मैत्री आणि रयते सोबतची घट्ट नाळ, त्यांच्या राज्यकारभारातून तसेच त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांच्या माध्यमातून समर्पकपणे दाखवता आली असती. 

संपूर्ण चित्रपटात तसं पाहिलं तर संवाद  कमीच होते जर छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण व्यक्तिरेखा पडद्यावर दाखवताना अधिक  संवाद देता आले असते.विशेषता राज्यकारभार करत असताना त्यांचा समतावादी विचार. त्याचप्रमाणे त्यांचं भाषा प्रभुत्व देखील चित्रपटात दाखवलं गेलं नाही त्यांनी कमी वेळात केलेला लिखाण,प्रचंड अभ्यास  चित्रपटात दाखवता आलं असतं असं मला वाटलं. 

बऱ्याच ठिकाणी चित्रपटातील संवाद पेक्षा चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक अधिक लाऊड वाटले. त्यामुळे महत्त्वाचे संवाद ऐकताना बॅकग्राऊंड म्युझिक चा व्यत्याय वाटत होता संवादा दरम्यान बॅकग्राऊंड म्युझिक कमी करता आले असते.

छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांच्या मित्र परिवाराशी आणि स्वराज्याच्या रयतेशी  असलेली नाड  कशाप्रकारे घट्ट होती हे देखील चित्रपटाचा कथानक दाखवत नव्हतं. वर्षानुवर्ष वर्णव्यवस्था ज्यांना शूद्र मानत होती त्या छत्रपतींच्या रयतेने छत्रपती संभाजी महाराजांवर आपल्या लाडक्या राजावर अंतिम संस्कार करणारा प्रसंग चित्रपटात दाखवता आला असता. 

असो.चित्रपट स्वराज्याची व्याख्या मात्र अतिशय योग्य, समर्पक करतो.

स्वराज ही काही फक्त एक सत्ता नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा सद् रक्षणाचा आणि खलनिग्रहणाचा मानवतावादी विचार आहे जो प्रत्येक मराठ्याच्या (मराठी मुलखातील सर्व जाती-धर्माचे लोक या अर्थाने मराठा )नसानसात आणि महाराष्ट्राच्या श्वासात आहे. असं औरंगजेबाला डोळ्यात डोळे घालून ठणकावून सांगणारा शंभूराजांचा रुबाब अंगावर मास चढवणारा होता. 

छावा चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा संवाद आणि वाक्य म्हणजे ज्या वेळेला औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारून आरामात आयुष्य जगता येईल असं सांगतो त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज देखील औरंगजेबाला प्रतिउत्तरात सांगतात की तुला देखील एक पर्याय उपलब्ध आहे तू देखील मराठा होऊ शकतो आणि आरामात आयुष्य जगू शकतो आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना, मराठा होत असतांना तुला तुझा धर्मही बदलावा लागणार नाही... हे वाक्य ऐकताना अंगावर शहरा आला. वाह क्या बात कही राजेसाहेब... असे उद्गार निघाले‌.‌

कारण

शिवरायांचा लढा कुण्या धर्माशी किंवा जातीशी नव्हताच तर शिवरायांचा लढा सर्वसामान्य कष्टकरी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तेविरुद्ध होता. 

शिवरायांचा लढा हा मानव कल्याणकारी राज्याचा होता ज्यात  कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी,शेत मजुर सर्वांनाच त्यांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करून देणारा धर्म आणि जात निरपेक्ष लढा होता.

स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य निर्माते आणि स्वराज्य रक्षक यांची बदनामी करू पाहणाऱ्या जातीयवादी  प्रवृत्ती ओळखून निषेध केला पाहिजे जगापुढे मांडलं पाहिजे. कारण त्या साम्राज्यवादी औरंग्या प्रवृत्ती एवढ्याच घातक आहेत.






No comments:

Post a Comment