Monday, 16 June 2025

 आज दिनांक १६ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात आली होती व विद्यार्थ्यांसाठी आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्राथमिक उपशिक्षणाधिकारी मा. सौ. प्रतिमा सानप विशेष उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तसेच मा. सरपंच कैलासभाऊ पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व पायमोजे यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व शिक्षणात नियमित उपस्थित राहण्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले व विविध आनंददायी खेळांमधून पहिल्या दिवसाचा आनंद घेतला.

या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील यांनी संयोजन केले होते. कार्यक्रमास वरिष्ठ शिक्षिका सौ. वंदना पाटील, श्री. शैलेश शिरसाठ, श्री. भटू पाटील, श्री. विश्वास पाटील आणि श्रीमती. छाया घुगे आदी शिक्षक-शिक्षिका पालक वर्ग उपस्थित होता.

संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आनंद व प्रेरणा यांचे प्रतीक ठरला. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने संपूर्ण शिक्षकवृंदाने तसेच शालेय पोषण आहार मदतनीस आनंदा कोळी, कल्पनाताई कोळी यांनी योग्य  नियोजन करून प्रवेशोत्सव यशस्वी केला.




No comments:

Post a Comment