Wednesday, 25 June 2025

 राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, ता. धरणगाव, जि. जळगाव
दिनांक: २६ जून २०२५

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल डिगंबर पाटील यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात श्री. शैलेश शिरसाठ  यांच्या सूत्रसंचालनाने करण्यात आली. त्यांनी  प्रास्ताविक करून सामाजिक न्याय दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रसंगी श्री. विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती सोप्या व प्रभावी भाषेत दिली. त्यांनी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, शिक्षण प्रसार, वंचित घटकांसाठी घेतलेले निर्णय याचे उदाहरणांसहित विवेचन केले.

कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल डिगंबर पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनपटाचे सखोल विश्लेषण करत, इतिहासातील संदर्भासह त्यांचे कार्य व दूरदृष्टी समजावून सांगितली. त्यांनी सामाजिक समतेच्या मूल्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती छाया घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थिनी गायत्री कोळी व गावातील विद्यार्थिनी वैष्णवी पवार उपस्थित होत्या.

कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे मूल्य रुजवण्यास निश्चितच मदत झाली.



No comments:

Post a Comment