प्राथमिक शिक्षणात मराठी,इंग्रजी,हिंदी किंवा आणखी इतर कुठलीही भाषा शिकतांना बोली भाषेचे महत्त्व देखील असाधारण असे म्हणता येईल. बोलीभाषा तसे पहिले तर मातृभाषा असा देखील आपण त्याचा उल्लेख का करू नये असे वाटते. कारण आपल्या आईची असणारी भाषा म्हणजे मातृभाषा. भाषिक विविधता असणाऱ्या आपल्या देशात बोलीभाषेला देखील मातृभाषा म्हणण्यास काय हरकत आहे असा प्रश्न पडतो अर्थात मातृभाषा म्हणजे राजभाषा किंवा राज्यभाषा असाही उल्लेख आहेच.
आपल्या खानदेशाचा विशेषतः जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर विद्यार्थ्यांची बोली भाषा जसे की अहिराणी, तावडी, गुर्जर भाषा, भिलाऊ किंवा भिल्ली, पावरी, तडवीभिल्ली यासारख्या भाषांनाही महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासात बोली भाषेची भूमिका खूप मोठी असते.
बोली भाषेमुळे आत्मीयता निर्माण होते. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत आपण पूर्णवेळ जरी बोलीभाषा वापरणार नसलो तरी प्रसंगी तिचा उपयोग करता येऊ शकतो कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो ते विविध शालेय सहशालेय उपक्रमात आणि कृतींमध्ये उत्साहाने सहभागी होतात असा अनुभव आहे. बोलीभाषा मातृभाषा यांच्या उपयोगाने इतर भाषा शिकतांना उपयोग होतोच पण इतर विषय शिकतांना ही होऊ शकतो असा अनुभव येतो.
बोली भाषा ही विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा आवाज असतो. तिच्या माध्यमातून शिक्षक जर प्रसंगानुरूप आवश्यकतेनुसार संवाद साधतील, तर शिक्षणाचा स्तर केवळ माहितीवर न थांबता समज-भावना-आत्मविश्वास-प्रश्न विचारण्याची तयारी यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे बोली भाषेचा योग्य वापर हा भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाला चालना देणारा एक परिणामकारक मार्ग ठरू शकतो कारण तो विद्यार्थ्याला त्याचा मत व्यक्त करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतो.
'
Teacher's Teacher, Do watch it 👇 <कारण विद्यार्थ्यांकडूनही आपल्याला खूप सार शिकायला मिळतं... आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला शिकायला मिळत म्हणून आपण शिक्षकापेक्षा विद्यार्थी आणि सुलभकाच्या भूमिकेत आहोत असं मी व्यक्तिशः मानतो आणि जाणतोही.
शिकण्यासाठी तत्पर असणाऱ्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा😇👍
No comments:
Post a Comment