Thursday, 24 July 2025

 अहवाल: वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम

पाळधी उर्दू कन्या शाळेत वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सौ. मनीषा शैलेश शिरसाठ यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेचे महत्त्व, योग्य आहार, शरीरात होणारे बदल आणि मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली.

तसेच या संवादात त्यांच्या समवेत अर्चना महाजन यांनीही सहभाग घेत विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले.


या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी या विषयावर खुलेपणाने संवाद साधण्यास सुरुवात केली. शाळेतील शिक्षिका आणि उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

हा कार्यक्रम मुलींच्या आरोग्यविषयक शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.





No comments:

Post a Comment