Saturday, 26 July 2025

 कार्यक्रम अहवाल

संगीतमय व्यायाम प्रकार – आनंददायी शिक्षणाचा एक अनोखा अनुभव

स्थळ: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी

दिनांक: शनिवार, २६ जुलै २०२५

तालुका: धरणगाव

जिल्हा: जळगाव

आज दिनांक २६ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे विद्यार्थ्यांसाठी एक संगीतमय व्यायामाचा (Musical Workout) विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदात आणि उत्साहात सहभागी होत शारीरिक हालचाली केल्या. व्यायामासोबत संगीत आणि नृत्य यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना इंग्रजीतील काही व्यायामप्रकार व इन्स्ट्रक्शन्स शिकवण्यात आल्या. "Jump", "Stretch", "Turn Around", "Clap", "Move Forward", "Sit Down", "Stand Up" अशा विविध आज्ञा नृत्याच्या माध्यमातून शिकवल्यामुळे मुलांना इंग्रजी शिकणे सहज आणि मजेदार वाटले.

या उपक्रमात शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ आणि श्री. भटू पाटील यांनी स्वतः कृतीयुक्त सहभागातून विद्यार्थ्यांकडून आनंददायी संगीतमय व्यायाम करून घेतला. मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी कृतीयुक्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी व शिक्षणात नाविन्य आणण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वंदना ताई पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे छायाचित्रं आणि छायाचित्रफिती शाळेतील शिक्षिका छायाताई घुगे यांनी आपल्या कॅमेरात सुरेखपणे टिपले.

सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहात भाग घेतला. नृत्य, संगीत आणि व्यायाम यांचे संयोगाने शिक्षण अधिक प्रभावी आणि आनंददायी बनले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासोबतच भाषिक  विकासासही हातभार लावणारा ठरला.

अहवाल लेखन शैलेश शिरसाठ, उपशिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी ता.धरणगाव जि.जळगाव.





No comments:

Post a Comment