Thursday, 11 September 2025

स्व.विजय हिम्मतराव चौधरी यांच्या कुटुंबाचे दातृत्व.

स्व.विजय हिम्मतराव चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी,ता .धरणगाव जि जळगाव.येथे आज शाळेचे दिवंगत शिक्षक विजय हिम्मतराव चौधरी सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्व.विजय चौधरी सर यांच्या कुटुंबीयांतर्फे विजय सरांच्या जन्मदिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामागील हेतू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होऊन त्यांच्या शिक्षणातील आवड वाढवणे हा होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री विश्वास पाटील यांनी व सूत्रसंचालन शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी दिवंगत शिक्षक विजय चौधरी यांच्या शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमा संबंधित आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री भटू पाटील सर यांनी आठवणींना उजाळा करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छायाताई घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात सांगितले की, पितृपक्षात श्राद्ध केले जाते त्याच भावनेतून कर्तव्यभावनेने समाजासाठी योगदान देणे अधिक महत्त्वाचे आहे आणि याच भावनेतून विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देऊन शिक्षकांच्या कार्याची आठवण करून देणे ही एक प्रेरणादायी कृती आहे असे प्रतिपादन केले.

 विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या सरांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेल्या शालोपयोगी वस्तूंच्या उपयोगाने शैक्षणिक स्वप्नांच्या पूर्ततेचा संकल्प केला. 

स्व.विजय चौधरींचे वडील हिंमतराव बोमटू चौधरी आणि आई सरलाबाई हिंमतराव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा पाठवल्या. याप्रसंगी विजय चौधरी सरांच्या पत्नी पल्लवी विजय चौधरी, मुलगा मयूर (साई)विजय चौधरी, मुलगी श्रद्धा विजय चौधरी, भाऊ निलेश हिंमतराव चौधरी, वहिनी योगिता निलेश चौधरी, विजय चौधरी सरांचे शालक हर्षल‌ भागवत चौधरी उपस्थित होते.

हा उपक्रम शाळेसाठी हृदयस्पर्शी आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना विजय सरांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरला.

Miss You विजू भैय्या.....


No comments:

Post a Comment