वर्षभरात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना वर्षातील 365 दिवसांपेक्षाही अधिक वेळा घरी भेट देण्याचा आणि प्रत्यक्ष उपस्थिती वाढवण्याचा संकल्प.
अर्थातच.
ऑपरेशन थ्री 365+
"शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला चालना देण्यासाठी पालकांच्या भेटी घेतल्या जात आहे. या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीला प्रोत्साहन मिळेल." - शैलेश शिरसाठ.
लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे त्या अनुषंगाने आजचे पत्र तुम्हासाठी लिहीत आहे.
मी या जगात नसताना तुम्ही पितृपक्षात आपल्या वाडवडील आणि पूर्वजांची आठवण ठेवून काही विधी करणार किंवा नाही करणार हे मला माहीत नाही कारण तुम्ही तुमच्या तार्किक बुद्धीने, विवेकी विचाराने आणि तुमच्यात असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधाराने काय करावे किंवा काय करू नये हे ठरवालच.
आपल्या वाडवडिलांच्या आणि पूर्वजांच्या आठवणींसाठी तुम्ही नातवंडे आणि वंशज म्हणून एकत्र येणार असाल आणि जुन्या आठवणींमधून आधीच्या पिढीत केलेल्या चांगल्या विचारांचा आणि कामांचा आदर्श घेणार असाल तर चांगलेच आहे कारण चांगले विचार तुमच्यासह समाजाला दिशादर्शक ठरतील.
याखेरीज किमान मलातरी तुमच्याकडं कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या कर्मकांडांची अपेक्षा मुळीच नाही. आता राहिला मला मोक्ष किंवा शांती मिळण्याचा विषय तर त्याचा अनुभव मी माझ्या जिवंतपणीच काही चांगले मानवतावादी विचार आणि कार्याच्या माध्यमातून मिळवणार आहेच. माझी सदगती आणि मोक्षप्राप्ती वगैरे काही असल्यास ते माझ्या सत्कर्मातूनच घडणार असल्यामुळे माझ्या मोक्षाची आणि सद्गती ची जबाबदारी देखील पूर्णतः माझी आहे माझ्या येणाऱ्या पिढ्यांची नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी काही वेगळे कर्मकांड करण्याची मुळीच गरज नाही.माझ्या चांगल्या विचारांवर भविष्यात काम करता आले तर तेवढे करा आणि तेही करणार नसाल तरीही माझी काही हरकत नाही. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझ्या श्राद्धासाठी उठाठेव केल्यास मला काहीही मिळणार नाही तुम्हाला मात्र भजेवडे मिळतील त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा.माझ्या आठवणीत तुम्ही सर्व हेवेदावे भेदभाव विसरून एकत्र येत असाल आणि समता,बंधुता आणि स्वातंत्र्याची पाठीराखाण करत असाल तर चांगलेच आहे.
तुमच्यासाठी लिहिलेलं हे पत्र कागदावर आहेच पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक युगात आपण आहोत तुमच्या जन्म दात्यांचा बाप अर्थात तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे मी ही टेक्नोसॅव्ही आहेच म्हणून तुमच्यासाठी हे पत्र डिजिटल स्वरूपात माझ्या ब्लॉगवरही आहेच.
तुम्ही वापरत असलेल्या विविध गॅझेटसह स्वतःला अपग्रेड करत राहणारच आहात कारण आपल्याला हे जग जसं मिळालंय त्यापेक्षाही अधिक सुंदर करून जगण्याच्या रिले रेस मधून एक्झिट व्हायच आहे.
तुमचा आजोबा
शैलेश शिरसाठ.
खालीलपैकी कुठला मार्ग स्वीकारावा हे ज्याने त्याने आपल्या तर्कानुसार,विवेकानुसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या समाजानुसार किंवा नासमजानुसार स्वीकारावे.
बाप्पाच्या कालच्या आरती नंतर आनंद बक्षी यांचे गीत सहजच आठवले त्यात ते लिहितात....
'मझधार में नैय्या डोले, तो माझी पार लगाये
माझी जो नाव डुबोए
उसे कौन बचाये…'
Special Thanks to Saregam Music
Saturday, 7 September 2024
'विवेक जागर'
जागर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि मानवतावादाचा,समतेचा....
'विवेक जागर'
जागर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि मानवतावादाचा,समतेचा.... काय स्विकारणार ?
राष्ट्रीय एकात्मता आणि समाज प्रबोधनाच्या सुमधुर भक्ती भावाचा सार्वजनिक उत्सव की प्रचंड गोंगाट आणि कर्णकर्कश कल्ला.. हे आता आपल्याला ठरवायचे आहे कारण कुठलाही उत्सव साजरा करताना आवाज संहितेसह सर्वच आचारसंहितांचे पालन आपल्या सगळ्यांकडून झालं पाहिजे.
गेल्या काही वर्षात सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढले आहे यात ध्वनी प्रदूषणाची भर पडली आहे.
ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह विविध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना कारणीभूत ठरू शकतो. मोठ्या आवाजातील संगीत आणि कामाच्या ठिकाणच्या आवाजासह विविध स्त्रोतांकडून होणारे ध्वनी प्रदूषण थेट श्रवणशक्ती कमी करू शकते.
उत्सव कुठल्याही धर्माचा असो सर्वांनीच आवाज संहितेचे पालन करायला पाहिजे. सुमधुर भक्ती गीत की बीभत्स कर्णकर्कश गाणी हे ही ठरवावे लागेल.
चांगले भक्त अर्थात चांगले नागरिक अशी ओळख अधोरेखित करूया...
आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.