Saturday, 23 November 2024

बोकड्या कटेंगा और सबमें बटेंगा.

 संडे स्पेशल. (प्रासंगिक)

"बोकड्या कटेंगा और सबमें बटेंगा."

रविवारचा बेत आणि अब्दुल मियाची मटणची दुकान...


"अरे अब्दुल भाई तेरी भाभी के लिए सूप बनाना है गुर्दे के साथ चाप के पीस जादा डालना..." त्यावर मटण विक्रेता अब्दुल म्हणाला "अरे भैय्या बच्चो के लिये कलेजी अलग से डालदि है l"

काल-परवापर्यंत गल्लीत मुस्लिमांना कोसणारा,ग्रुपवर मुस्लिम विरोधी पोस्ट टाकणारा आणि वेगळ्या राष्ट्राच्या बाता करणारा रविवारी आवर्जून अब्दुलच्या मटन शॉप वर जातो आणि गोड बोलून सीना, चाप,गुर्दा आणि कलेजी मटणात योग्य प्रमाणात घेतो हे पाहून मी अवाक झालो. 

नंतर अब्दुल भाई त्याला म्हणाला की, भाई एक किलो कर दु क्या? 

त्यावर तो लाल  टिक्का लावलेला म्हणाला की," भाई कल सोमवार है और सोमवार को  उपवास रहता है इसलिये रविवार को पूरा मटन खतम करना होगा नही तो तुम्हारी भाभी चिल्लायेगी. मटन तीन पाव ही देना,"असं म्हणून त्याने वीस रुपये  नेहमीप्रमाणे कमी दिले आणि अब्दुलला म्हणाला अगले हप्ते दे दूंगा,तू तो मेरा भाई है अब्दुल. तू और तेरे हाथ का मटन एक नंबर  है मेरे दोस्त." असं म्हणत त्याने निषेधाची नव्हे तर मटणाची काळी थैली उचलली आणि तो घराकडे निघाला.

मटणासाठी लागलेल्या रांगेतून कुणीतरी म्हणालं, "मुझेभी चाप और कलेजी चाहिये अब्दुल भाई." त्यावर अब्दुल हसून म्हणाला "अरे दादा गर्दी मत करो,सबको मटन मिलेंगा.एक और बोकड्या कटेंगा और सब मे बटेंगा." यावर सर्व लोक जातीधर्म विसरून लटकलेल्या बोकडाकडे पाहून जोर जोरात हसू लागले...

- शैलेश शिरसाठ.



No comments:

Post a Comment